मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| आरती ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक काकडा - आरती पहाटेचे भजन देव जागृति -पर Tags : bhajandnyanodaykakadamarathiकाकडाज्ञानोदयभजनमराठी पहाटेचे नित्य-पाठ Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥अभंग - १श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--रुप पाहतां लोचनी ॥ सुख झालें वो साजणी ॥ इत्यादि मागील प्रमाणे अभंग - २श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--विष्णुविण मार्ग घेसील अव्यंग वेरी वायांचि सोंग करणी तुझी ॥१॥येऊनि संसारा वायांचि ऊंजीगरा ॥ कैसेनि ईश्वरा पावसी हरि ॥धृ०॥नरदेहा कैचे तुज होय साचे ॥ नव्हेरें हिताचें सुख तुज ॥२॥ज्ञानदेव ह्मणें शरण रिघणें ॥ वैकुंठीचें पणें अंती तुज ॥३॥ ॥धृ०॥अभंग - ३श्रीनामदेव महाराज वाक्ये--स्वप्नी तेनी सुखे मानीताहि सुख ॥ घेतलीया विक चाईल देहें ॥१॥मोलाचे आयुष्य दवडीता देवाया ॥ मध्याह्याची छाया जाय वेगी ॥२॥वेगी करी भजन काळमये श्रेष्ठ ॥ कैसेनी वैकुंठ पावसी जेणें ॥३॥बाप रुखमा दैवीवरू विठठल हा उभा ॥ डर्वत्र घटी प्रभा त्याची आहे ॥४॥अभंग - ४श्री तुकाराम महाराज वाक्य--कामें नलौचित नेदी अवलोकुं मुख ॥ बहुवाटे दु:ख फुटो पाहे ह्रदया ॥१॥कांजी सासुरवासी मज केलें भगवंता ॥ आपुलीया सत्ता त्वाधिनता ते नाही ॥२॥प्रभा तेंसी वाटे तुमच्या यावे दर्शना ॥३॥येथें न चलें चोरी उरली राहे वासना ॥४॥येथें अवघें वाया गेलें दीसती सायास ॥ तुका ह्मणे नाम दिसे जाल्या वेशाचा ॥५॥अभंग - ५श्री तुकाराम महाराज वाक्य--ऐसा वाट पाहे कांही निरोप कां मूळ ॥ कांहो कळवळा तुह्मां उमटेचीना ॥१॥आहो पांडूचंगे पंढरीचे निवासे ॥ लावुनिया आसे चाळवूनी ठेविलें ॥२॥काय जन्मा येऊनीयां केली म्या जोडी ॥ ऐसा घडीघडी चिंता येतों आठव ॥३॥तुका ह्मणे खरा नपवेचि विभाग ॥ धिक्कारीते जग हेंचि लाहो हिशोबे ॥४॥अभंग - ६श्री तुकाराम महाराज वाक्य--कांगा केविलवाणा केलो दिनाच्या दीन ॥ काय तुझी हीन शक्ति जालीसी दासें ॥१॥लाय येतें मना तुझा म्हणविता दास ॥ गोडी नाही रस बोलिलीया सारखी ॥२॥लाजविली मांगे संताचीही उत्तरें ॥ कळो येतें खरें दुजें एकावरुनी ॥३॥तुका ह्मणी माजा कोणि वदविली वाणी प्रसादा वांचुनी तुमचीया विठठला ॥४॥ अभंग - ७श्री तुकाराम महाराज वाक्य--जळो माझे कर्म वाया केली कटकट ॥ जालें जैसें तंट नादी आले अनुभव ॥१॥आता पुढें धीर काय देऊं या मना ॥ ऐसें नारायण प्रेरिले ते पाहिजे ॥२॥गुणवंत केलों दोष जाणाया साठी ॥ माझें माझे पोटी वळकट दुषण ॥३॥तुका ह्मणी अहो केशीराजा दयाळा ॥ बरवा हा लळा पाळियेला शेवटी ॥४॥अभंग - ८श्री तुकाराम महाराज वाक्य--माझें चित्त तुझे पायी ॥ राहे ऐसें करी कांही ॥ धरोनियां बाही ॥ भव हा तारी दातारा ॥१॥चतुरा तु शिरोमणि ॥ गुणलावण्यची खाणी ॥ मुगुट सकळां मणि धन्ये तूचि विठोबा ॥२॥करीं तिमिरांचा नाश ॥ उदया होऊनि प्रकाश ॥ तोडी आशा पाश ॥ करि वास ह्र्दयी ॥३॥पाहें गुंतलो नेणता माझी असो तुज चिंता ॥ तुका ठेवी माथा पायी आतां राखावें ॥४॥अभंग - ९श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--पूर्व जन्मी पाप केले ते हे बहुत विस्तारले ॥ विषयसुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले ॥ चौर्यांशि लक्ष योनी फिरता दु:ख भोगिलो ॥ ज्ञान दृष्टी हरपली ॥ दोन्ही नेत्र आंधळे ॥१॥धर्म जागो सदैवाचा जे बा पर उपकारी ॥ आंधळ्या दृष्टी दाते ॥ त्याचे नाम मी उच्चारी ॥धृ०॥संसार दु:ख मुळ ॥ चहुकडे ईंगळ ॥ विश्रांति नाही कोठे ॥ रात्र दिवस तळमळ ॥ काम क्रोध लोभशूनी ॥ पा्ठा लागली वोढाळ कवणा शरण जाऊ ॥ आता दृष्टा देईल निर्मळ ॥२॥माता पित बंधु बहीणी कोणी न पवती निर्वाणी ॥ इष्ट मित्र सज्जन सखे ॥ हे तो सुखाची मांडणी ॥ एकला मी दु:ख भोगी कुंभ पाक जाचणी ॥ तेथे कोणी सोडीविना एक सद्गुरु वाचूनि ॥३॥साधू संत मायबाप तीहि दिले कृपादान ॥ पंडरीराया यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान ॥ पुंडलिक वैद्यराज पूर्वी साधिले साधन वैकुंठीचे मुळ मीट डोळा ल्यालो ते आंजन ॥४॥कृष्णा जन एक वेळा डोळा घालीता आढळ ॥ तिंमिर दु:ख गेले फीटले भ्रांती पडल ॥ श्रीगुरु निवृत्ती राजे मार्ग दाखविला स्वेजळ ॥ बाप रुखमा देवीवर विठठल दिनाचा दयाळ ॥५॥ अभंग - १०श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--मृत्यु लोका माझारी गा एक सद्गुरु साचार त्याचेनि गा दर्शने तुटला हा संसार ॥ पांगुळा हस्त पाद देतो कृपाळु उदार ॥ या लागी नांव त्याचे वेदा न कळे पार ॥१॥धर्माचे बसतिघर ठाकियले बा आम्ही ॥ दान मागी ब्रह्म साचे नेधी द्वैत या उर्मी ॥धृ०॥विश्रांति विजन आह्मा एक सदगुरु दाता ॥ सेविता चरण त्याचे फिटले इंद्रियाची व्यथा ॥ निमाली कल्पना आशा इळ परिसि झगडता ॥ कैवल्य देह जाले उपरति देह अवस्था ॥२॥मन हे निमग्न जाले ॥ चरण स्पर्शेतत्ला ॥ ब्रह्माह स्फूर्ति आधी भावो उमटला उलथा ॥ पांगुळले गह्य ज्ञान ब्रह्म रुपें तेथे कथा ॥ अंध माग दृढ जालो निमाल्या विषयाच्या वार्ता ॥३॥ऋध्दिसिध्दी दास्य संख्या आपोआप वोळली ॥ दान मान मंद बुध्दि ब्रह्मरुपी लीन झाली वोळली कामधेनु पंगु तनु वाळली ॥ पांगुळा जिवन मागु सतराव हे वोळली ॥४॥वाळली मी कल्पनेचा पंगु जाली पैमनें ॥ वृत्ति हे हारपली एका सदगुरु ध्याने ॥ निवृत्तीसी कृपा आली शरण गेलो ध्येय ध्याने ॥५॥अभंग - ११श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--देवा तुज चुकले गा ॥ गेणें दृष्टी आले पडळ ॥ विषय ग्रंथि गुतलेसे ॥ तेणें होतसें विव्हळ ॥ अंध मंद दृष्टी झाली ॥ गिंळु पाहे हां काळ ॥ अवचिते दैवयोगें ॥ निवृत्ती भेटला कृपाळ ॥१॥धर्म जागओ निवृत्तीचा ॥ तेणें फेडीले पडळ ॥ ज्ञानाचा निजबोधु ॥ विज्ञान रुप सकळ ॥धृ०॥तिंहींलोकी विश्वरुप ॥ दिव्य दृष्टी दिधली ॥ द्वैत हे हरपले ॥ अद्वैतपण माउली ॥ उपदेशु निज ब्रह्म ॥ ज्ञानां जन साउली ॥चिद्रुप पाहे तेथें ॥ तनुमनु निवाली ॥२॥दान हेंचि आह्मा गोड ॥ देहीं दृष्टी मुराली ॥ देह हे हरपलें ॥ विदेहवृत्ति मुराली ॥ विज्ञान हें प्रगटले ॥ ज्ञये ज्ञाता निमाली ॥ दृश्यते तदाकार ॥ ममता तेथें बुडाली ॥३॥नेणता माझी आसो तु चिंत ॥ तुका ह्मणे ठेवी माथा पाय़ी आता राखावें ॥४॥॥धृ०॥अभंग - १२श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--उठि उठि गोपाळा ॥ उधडी स्वरुप लोचना ॥ सरली अविद्या राती ॥ उहयो जाला रविकिरण ॥धृ०॥इंद्रिये गोधनें निर्गुणावाना ॥ सुटली पन वास्रें ॥ तुज विण नाकळती कोणा ॥१॥प्रबोध पहांट जाली ॥ सरले त्रिविध तमरज ॥ गुरुकृपेचा अरुणोदय पाहां सुरंग सुतेज ॥ आत्मा दिनकर पाटी उगवें तत्काळिक सहज ॥ जिव चंद्राचे मंडळ ॥ सहजा सहज निस्तेज ॥३॥दृश्यभास चांदाणिया ॥ असती ठायी लोपलिया लिंगदेह कमळिचे ॥ मधुकर सुटती आपैसया ॥४॥ बुध्दि बोध चक्र वाकें मिनली आपणिया ॥ देह बुध्दी कुमादिनी सुकोनी गेलीसे विलया ॥५॥वैराग्य रश्मी ज्वळ ॥ चिन्मय रविकांत ॥ धरीतां प्रगटे वाह्रे ॥ विषय वन हे जळित ॥५॥तृष्णेच्या श्वापदां ॥ प्रळय वतें अभ्दुत ॥ विषह मृगजळ मुढां आसे भ्रमावित ॥७॥योग विद्येच्या पंथे साधकवृंदे चालियली ॥ उपनिषदाचा आर्थ ॥ शुध्द करिती कोकिळी ॥८॥वाग्वद्याची उलुकें ॥ निघाली मौन्याच्या ढोली ॥ विकल्पाच्या अंगी चारी माही लोपलि ॥९॥सर्वही व्यसनें दवडुनि ॥ उदित जालासे नर ॥ वासना वैश्येचा ॥ जेणें त्याजीला व्यापार ॥१०॥ह्मणे ज्ञानेश्वर योगी जालासे नर ॥ निवृत्ती प्रसादे ॥ समाधि सर्व गत स्थिर ॥११॥ ॥धृ०॥अभंग - १३श्रीनामदेव महाराज वाक्ये--बाबा अहंकार निशी घनदाट ॥ गुरु वचनी फुटली पहाट ॥ भक्ती माता भेटकी बर वंट ॥ तीनें मार्ग दाखविला चोखाट गा ॥१॥नर हरि रामा गोविंदा वासुदेवा ॥ एक बोला सस्पष्ट बोलवा ॥ वाचें हरिहरि म्हणावा ॥ संत समागमू धरावा ॥तेणें ब्रह्मानंद होय आधवा गा ॥२॥आला शीतळ शांतीचा वारा ॥ तेणें सुख झाले शरीरा ॥ तुटला पातकांचा थारा ॥ काळेकाळासी धाक दरारा गा ॥३॥अनुहत वाजती टाळ ॥ अनुक्षर गीत नृत्य रसाळ ॥ अनुभव तन्मय सकळ नामा ह्मणें केशव कृपाळू गा ॥४॥ ॥धृ०॥ अभंग - १४श्री तुकाराम महाराज वाक्य--रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवित ॥ छंदे आपुलिया नांचत ॥ नीज घेऊनी फिरत गा ॥१॥जनी वनी अवघा देव ॥ वासनेचा पुसावा ठाव ॥ मग वोळगा तो वासुदेव ॥ ऐसा मनी वसुं द्या भाग गा ॥२॥निज दानाची थोर आवडी ॥ वासुदेवासी लागली गोडी ॥ मुखी नाम उच्चरी घडो घडी असा करा वासुदेवी जोडी गा ॥३॥अवधा शारुन शेवट झाला ॥ प्रयत्न न चलें काही केला जागा होई मोडुनी झोपेला ॥ दान देई वासुदेवाला गा ॥४॥तुका ह्मणे धन्ये त्याचें जीणीं ॥ जिही वासुदेवा घातलें दान त्यान लागे येणें जाणे झाले वासुदेवा राणे गा ॥५॥॥धृ०॥अभंग - १५श्रीनरहरी महाराज वाक्य--उठा बा होय जागा पहा वासुदेवाला ॥ सुदिन उगवला दान आपुलें घाला ॥१॥आणिक हिता गा आला अवचितं फेरा हें घडी सांपडेना कांही दान पुण्य करा ॥२॥ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृतें भर ॥ भक्तासी भय नाही संत संगती धर ॥३॥संसार सार नोहे माया मृगजळ भासे ॥ क्षणांत भ्रांती याचा काय विश्वास ॥४॥घे करी टाळ दिंडी होय विठठलाचा दास ॥ सावधान नरहरि विठो चरणी निज ध्यास ॥५॥ ॥धृ०॥अभंग - १६श्रीएकनाथ महाराज वाक्य--रात्रंदिवस घोकितों तुह्यी सावध असा ॥ तुमच्या नगरीचा आह्मां नाहीं भरंवसा ॥ उजड पडताना गळां पडल फांसा ॥१॥उठा की जी माय बाप कशीं लागली झोप हुजुर नाउनिया ॥ येवढी चुकवा खेप ॥२॥ ॥धृ०॥तुमच्या नगरीची नाही नादणूक बरी ॥ तुमच्या सेजेला दो लोभिष्ट नारी ॥ त्यांच्या योगे दु:खें तुमच्या नगरांत भारी ॥३॥हिंडतां देशांतरि चौर्यांशी जागा ॥ अझुनी सांपडला नाही नीट सुमार्ग ॥ कोणतें हित केले बापा सांग ॥४॥जुन्य ठेवण्याचा तुह्मी पुर्जा काडा ॥ त्याच्या आधारें बोलों न घड घडा ॥ एका जनार्दनी धरा बळकट मेढा ॥ चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा ॥५॥ ॥धृ०॥अभंग - १७श्रीनामदेव महाराज वाक्ये--उठा जाग्गे व्हारे आतां ॥ स्मरण कारा पंढरीनाथा ॥ भावें चरणी ठेवा माता ॥ चुकवी व्यथा जन्माच्या ॥१॥धन दारा पुत्रजन ॥ बधु सोईरे पीसोन ॥ सर्व मिथ्या हे जाणुन ॥ शरण रिधा देवासी ॥२॥माया विघ्नें भ्रमलो खरें ॥ म्हणता मी माये घरे ॥ देतो संपत्तीचे वारे ॥ साच कारे जाईल ॥३॥आयुष्य जात आहे पहा ॥ काळ जपतसे माहा ॥ स्वहीताचा धीर वाहो ॥ ध्यानी राहा श्रीहरिच्या ॥४॥संत चरणी भाव धराअ ॥ क्षण क्षणा नाम स्मरा ॥ मुक्ती सायुज्यतावरा ॥ हेची कारा बांपानो ॥५॥विष्णुदास विनवीनामा ॥ भुलू नाका भव कामा ॥ धर अंतरि नीज प्रेमा ॥ न चुका नेमा हरि भक्त ॥६॥अभंग - १८श्रीनामदेव महाराज वाक्ये--उठा साधुसंत ॥ साधा आपुलें हीत ॥ गेला गेला हा नरदेह ॥ मग कैंचा भगवंत ॥ उठोनिया पाहांटे ॥ विठठल पहा उभा विटे ॥ चरण तयाचे गोमटे ॥ अमृत दृष्टि होईल अवलोका ॥१॥जागे करा रुक्मिणी वर ॥ देव आहे निदसुरा ॥ वेगेंलिंबलोण करा ॥ दृष्टि होईल तयासी ॥२॥पुढें वाजंत्रं वाजती ॥ ढोल दमामे गर्जती ॥ होती कांकड आरती माझे पांडुरंग रायाची ॥३॥शिवनाद शंख भेरी ॥ जर होतो महाद्वारी ॥ केशव राज विटेवरी ॥ नाम चरण वंदितों ॥४॥ ॥धृ०॥अभंग - १९श्रीनामदेव महाराज वाक्ये--उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ॥ झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥१॥संत साधु मुनि अवघे झालेती गोळ । साडा शेजे सुख आता पाहुंद्या मुखकमळा ॥२॥रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी ॥ मन उतावळे रुप पहावया दृष्टि ॥३॥राई रखमाबाई तुह्मां येऊं द्या दया ॥ शेजें हाल उनि जागे कारा देवराया ॥४॥गरुड हनुमंत उभे पाहाती वाट । स्वर्गीचे सुरवर घेउनी आले बोभाट ॥५॥झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ॥ विष्णुदास नामा उभा घेउनि काकडा ॥६॥ ॥धृ०॥अभंग - २०श्रीनामदेव महाराज वाक्ये--उठा अरुणोदय प्रकाश जाहला घंटी गजर गर्जिला ॥ हरि चौघडा सुरु जाहला ॥ काकड आरती समयाचा ॥धृ०॥महाद्वारी वैष्णव जन ॥ पूजा सामुग्री घेउन ॥ आले व्हावें तयासी दर्शन ॥ बंदीजन गर्जती ॥१॥ सभा मंडपी कीर्तन घोष ॥ मृदंग टाळ विणे सुरल ॥ आनंदें नाचती हरिचे दास ॥ परम उल्हास करुनिया ॥२॥चंद्र्भागे वाळवंडी ॥ प्रात: स्नानाचि जन दाटी ॥ आतां येतिल आपुले भेटी ॥ उठी उठू गोविंदा ॥३॥ऐसें विनवी रुक्मि ॥ जागृत जाहाले चक्रपाणी ॥ नामा वंदी जुळी जोडूनि ॥ चरणी माथा ठेवितसे ॥४॥ ॥धृ०॥अभंग - २१श्री तुकाराम महाराज वाक्य--उठा सकळ जन उठीलें नारायण ॥ आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥करा जय जयकार वाद्यांचा गजर ॥ मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२॥जोडोनियां कर मुख पाहा सादर ॥ पायावरी शिर ठेवूनियां ॥३॥तुका ह्मणे काय पढियेतें मागा ॥ आपुलाले सांगा दु:ख सकळ ॥४॥ ॥धृ०॥अभंग - २२श्री तुकाराम महाराज वाक्य--घडिया घालुनी तळी चालती वनमाळी ॥ उमटती कोमळी कुंकुमाची ॥१॥वंदाचरणरज अवघे सकळ जन ॥ तारियेले पाषाण उद्कीं जेणें ॥२॥पैस धरुनी चाला ठाकत ठायी ठायी ॥ मौन धरुनि काह न बोलावें ॥३॥तुका अवसरु जाणवितो पुढें ॥ उघढली महाल मंदिरें कवाडें ॥४॥ ॥धृ०॥अभंग - २३श्री तुकाराम महाराज वाक्य--चाल घरा उभा राहे नारायणा ठेवूदे चरणांवरी माथा ॥१॥वेळोदेईक्षेम आळींगन ॥ कर्म अवलोकन कृपा दृष्टि ॥२॥प्रक्षाळूदे पाय बैस माजघरीं ॥ चित्त स्थिर करी पांडुरंग ॥३॥आहे त्या संचितें करविन भोजन ॥ काय न जेवण करिसी आतां ॥४॥करुणा करें नाहीं कळों दिलें वर्ष ॥ दूरी होता भ्रम कोण वारी ॥५॥तुका ह्मणी आतां अवडीच्या सत्ता बोलिलों अनंता करवितें ॥६॥॥धृ०॥अभंग - २४श्री तुकाराम महाराज वाक्य--भीतरी गेलें हरी सहा गुण भरी ॥ होईल फळ धीर करा ॥१॥न करी त्वरा ऐकें मात ॥ क्षणएक निवांत बैसोनी ॥२॥करुनि मर्दन सारिलेंपाणी ॥ न्हाले देव अंग पुसी भवानी ॥३॥नेसला सोनसळा विनवी रखुमाई ॥ वाढिले आतां ठायी चलावेजी ॥४॥ करुनिया भोजन घेतले आंचवण ॥ आनंदें नारायण पहुडले ॥५॥ तुका मात जाणावी आतां सकळां बहुता होती चित्ती ॥६॥अभंग - २५श्री तुकाराम महाराज वाक्य--झाली पाक सिध्दी वाट पाहे रखुमाई ॥ उदके तापलें डेरा चिकसा मर्दु द्या पाई ॥१॥उठा पांडुरंगा उशीर झाला भोजना ॥ उभ्या आंचवणा गोपी कळ्दस घेऊनी ॥२॥आवघ्या सावचित्त सेवे लागी सकळ्दा ॥ उद्धव अक्रूर आले पाचारां मूळा ॥३॥सांवरलि सेज मुमन याति सुगंध ॥ रत्न दीप ताटी वाळा विडिया विनोदा ॥४॥तुला विनंति करी पाहें पंढरीराणा ॥ असा साव चित्त सागे सकळां जना ॥५॥अभंग - २६श्री तुकाराम महाराज वाक्य--रत्न जडीत सिंहासन ॥ वरी बैसले आपण ॥१॥कुंचे ढळद्ती दोन्ही बाही ॥ जवळी राही रखुमाई ॥२॥नाना उपचारी ॥ सिध्दी बोळगती कामरी ॥३॥हाती घेउनी पादुका ॥४॥उभा बंदीजन तुका ॥५॥अभंग - २७श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--योगिया दुर्लभ ती म्या देखिला साजणी ॥ पाहाता पाहाता मना न पुरे धणी ॥१॥देखिला दोखला माये देवाचा देवा ॥ फिटला संदेहो निमले दुजेपण ॥धृ०॥अनंत रुपे देखाले म्या त्यासी ॥ रखुमा देवीवरी खुण बांणली कैसी ॥२॥अभंग - २८श्री तुकाराम महाराज वाक्य--जोडुनियां कर चरणी ठेविला माथा ॥ परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥१॥असो नसो भाव आलो तुझिया ठाया ॥ कृपादृष्टि पाहें मजकडे पंढरीराया ॥२॥अखंडित असावे ऐसें वाटतें पायी ॥ साहोनी संकोच ठाव थोडासा देई ॥३॥तुका ह्मणे आह्मी तुझी वेडी वांकुडी ॥ नापे भव पाश हस्तें आपुल्या तोडी ॥४॥ ॥धृ०॥अभंग - २९श्री तुकाराम महाराज वाक्य--तुझे दास्य करुं मागूं आणिका खावया ॥ धीग जीणें झाले माझें पंढरीराया ॥१॥काय गा विठोबा तुज आता ह्मणावें ॥ शुभा शुभ कर्मे तुह्मां थोरांच्या दैवें ॥२॥संसाराचा धाक निरंतर आह्मांशी ॥ मरणें भलें परी काय अवकळा ऐसेई ॥३॥तुझा शरणांगत शरण जाऊं आणिंकासी ॥ तुका ह्मणे लाज हे कां कोणा नेणसी ॥४॥ ॥धृ०॥अभंग - ३०श्री तुकाराम महाराज वाक्य--जळोत ती तेथें उपजविती अंतराय ॥ सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥आतां मज साह्य येथें करावें देवा ॥ तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनी ॥२॥भोगें रागा जोडोनिया दिलें आणिकां ॥ अरुचि ते हो कां आता सकळापासूनी ॥३॥तुका ह्मणे असो तुझें तुझें मस्तकी ॥ नाही इहलौकिकीं आतां मज वर्तणें ॥४॥ ॥धृ०॥अभंग - ३१श्री तुकाराम महाराज वाक्य--क्षुधार्थी अन्नें दुष्काळे पिडिले ॥ मिष्टान्न देखीले तेणी जैसे ॥१॥तैसे तुझे पायी लाचावले मन ॥ झुरे माझा प्राण भेटावया ॥२॥मांजरें देखीले लोणीयाचा गोळा ॥ लावोनि डोळा बैसलासें ॥३॥तुका ह्मणे आतां झडिघालु पाहे ॥ पांडुरंगे माये तुझें पायी ॥४॥ ॥धृ०॥अभंग - ३२श्री तुकाराम महाराज वाक्य--देवासी अवतार भक्तांसी संसार ॥ दोहींचा विचार एकापणें ॥१॥भक्तांसी सोहळे देवाचिया अंगे ॥ देवत्यांच्या संगे सुख भोगी ॥२॥देवें भक्तारुप दिलासें आकार ॥ भक्ती त्याच्या फार वाखाणिला ॥३॥एका अंगी दोन्ही जाली ही निर्माण ॥ देव भक्तपण स्वामि सेवा ॥४॥तुका ह्मणे येथें नाही भिन्न भाव ॥ भक्त तोचि देव देवभक्त ॥५॥ ॥धृ०॥अभंग - ३३श्रीएकनाथ महाराज वाक्य--ब्रह्म निर्गुण निराकार ॥ विठठल सगुण साकार ॥ अवतरलें परात्पर ॥ परब्रह्म सांवळे ॥धृ०॥विठठल संताचे रुपडें ॥ प्रत्यक्ष पाहे नेत्रापुढें ॥ तयासि न जाणता मुडःऎ ॥ माया जाळीं गुंतलें ॥१॥मुक्ताबाई सकळ तनु ॥ दिप्ती सांवळा तो भानु ॥ प्रभा बळश्विर जगज्जीवनु ॥ आंती लावण्य शोभतसें ॥२॥ज्ञानदेव मुख कमळ ॥ निवृत्तीराज मुगटाचा झळाळ ॥ सोपानदेव तो निढळ ॥ आदि पुरुष रायाचें ॥३॥मुकुंदराज तो अवधारी ॥ श्रावण देव तो निर्धारी चांगदेव विसोबा खेचारी ॥ स्वयं प्रकाश झळकतसे वडवाळ सिद नासपुट ॥ कबीर नामा दोन्ही ओठे ॥ जिव्हा तोचि मुद्रुल भट ॥ निंबा घांट गर्जतसें ॥५॥बाहु दंड चोखा मेळा ॥ बहिरा पिसा वक्ष स्थळा ॥ जगमित्र कंठनळा ॥ जोगा माळा प्रेमाची ॥६॥ह्रदयानंद योगी जाण ॥ अच्युत सारंग दोन्ही स्तन ॥ ह्र्दयी रेणुका नंदन ॥ नाभी नृसिंह मेहता ॥७॥कान्ही पाटक कंट प्रदेश ॥ मुकुंद तो पीतांबर सुरस ॥ चरणी आले रोहिदास ॥ मुरदास सावाता ॥८॥नार माहादा गोंदा विठा ॥ ह्या देवांच्या क्षूदे घंटाअ ॥ जनीवाकी वाळे वाजता तोडार एका जनार्दनी ॥९॥ ॥धृ०॥अभंग - ३४गौळण कोठें मी तुझा धरू गेला संग ॥ लावियले जग माझ्या पाठी ॥१॥सर सर रे परता आवगुणाच्या गोवळा ॥ नको लावू चाळा खोटा येथें ॥२॥रुपाच्या लावण्या नेली चित्तवृत्ति ॥ न देखें भोवती मी ते माझी ॥३॥तुकयाचा स्वामी माझे जीवीच बैसला ॥ बोलीच अबोला करुनिया अभंग - ३५श्रीनामदेव महाराज वाक्ये--ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरलें ॥ उध्दरावया आलें दिन जना ॥१॥ब्रह्मादिक त्यांचे वंदीती पायवांणी ॥ नाम घे वदनीं दोषजाती ॥२॥होकां दुराचारी विषयीं आसक्त ॥ संत कृपे त्वरित उध्दर्तो ॥३॥अखंडीत नामा त्याचा वास पाहे ॥ निशिदिनी ध्याय संत्संगती ॥४॥॥धृ०॥अभंग - ३६श्री तुकाराम महाराज वाक्य--लेकुराचें हित ॥ वाहे माउलीचें चित्त ॥१॥ऐसी कळवळ्याची जाती ॥ करीं लाभाविण प्रीति ॥२॥पोटी भार वाहे ॥ त्याचें सर्वस्वही साहे ॥३॥तुमा ह्मणे माझे ॥ तैसे तुह्मां संतावरी ओझें ॥४॥अभंग - ३७श्री तुकाराम महाराज वाक्य--बोलिले लेंकुरें ॥ वेडी वांकुडी उत्तरे ॥१॥करा क्ष्मा अपराध ॥ महाराज तुह्मी सिध्द ॥२॥नाही विचारिता ॥ आधिकार म्यां आपुला ॥३॥तुका ह्मणे ज्ञानेश्वर ॥ राखा पायापें किंकरा ॥४॥अभंग- ३८ तुकाराम वाक्य --जहाले समाधान ( मागील प्रमाणे ) अभंग- ३९ तुकाराम वाक्य -- करुनि आरती अभंग - ४० नामदेव वाक्य --प्रेमसप्रेम आरती अभंग - ४१ काकडा आरती श्री एकनाथ महाराज वाक्य--सहस्त्र दीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा ॥ उजळल्या दिशा गगना आलीसे शोभा ॥१॥काकड आरती माझ्या कृष्णा सभागीया ॥ चराचर मोहरलें तुझी मुर्ती पाहया ॥ कोंदलेंसे तेज प्रभा जालीसे एक ॥ नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख ॥३॥आरती करितां तेज प्रकाशले नयनी ॥ तेणें तेजें मिनला एका एकी जनार्दनी ॥४॥ ॥धृ०॥अभंग - ४२श्री तुकाराम महाराज वाक्य--भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योति ॥ पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ॥१॥ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ॥ दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥२॥काय महिमा वर्णू आतां सांगणें ते किती ॥ कोटी ब्रह्महत्या मुख पहातां जाती ॥३॥राहीरखुमाई दोघी दो बाही ॥ मयूरपिच्छ चामरें ढाळिती ठायी ठायीं ॥४॥तुका ह्मणे दीप घेउनि उन्मनती शोभा ॥ विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा ॥५॥ ॥धृ०॥(अभंग ४३) नामदेव वाक्य-- घालिन लोटांगण (अभंग ४४) श्रीतुकाराम वाक्य--मागणें एक तुजप्रत ==भजनश्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥आरत्या ---१ झाले समाधान । तुमचे देखि० २ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी० ३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन ---घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥अभंग नाचाचे -- मागणे हे एक तुजप्रती ।भजन--ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम प्रसाद --पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥शेजआरती -१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार २. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम N/A References : N/A Last Updated : December 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP