मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| मालिका ११ एकादशी ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक मालिका ११ एकादशी श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaymarathiज्ञानोदयभजनमराठी एकादशीपर विचार Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥(॥ रुप पाहातां लोचनी॥ आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)अभंग - १श्री एकनाथ महाराज वाक्य--दशमी व्रताचा आरंभु ॥ दिंडी कीर्तन करा करा सामारंभु ॥ तेणे तो स्वयंभु ॥ संतोष पावे ॥१॥एकादशी जाग्रण । हरी पुजन नाम कीर्तन ॥ द्वादशी क्षीरापती जाण ॥ वैष्णव जन सेवीती ॥२॥ऐसे व्रत तीन दिन ॥ करी जो आदरे परीपूर्ण ॥ एका जनार्दनी बंधन ॥ तया नाही सर्वथा ॥३॥व्रतामाजी व्रत एकादशी पावन । दिंडी जागरण देवा प्रिय अष्टही प्रहर हरी कथा करी ॥ वाचे विठठल हरि वदोनिया ॥२॥टाळ मृदुंग वाजती गजरे ॥ विठठल प्रेमभरे नाचतसे ॥३॥एका जनार्दनी व्रताचा छंद ॥ तेणें परमानंद सुख पावे ॥४॥एकादशी एकादशी ॥ जय छंद आहे निशी ॥१॥व्रत करी जो नेमानें । तया वैकुंठीचे पेणे ॥२॥नामस्मरण जाग्रण ॥ वाचे गाय नारायण ॥३॥तोचि भक्त सत्य साचा ॥ एका जनार्दनी ह्मणे वाचा ॥४॥नामस्मरण हरी कीर्तन ॥ एकादशी व्रत हरि जाग्रण ॥ द्वादशी क्षीरापती सेवन ॥ सुकृता त्या पार नाही ॥१॥घडतां तिन्ही साधन ॥ कलीमाजी तो पावन ॥ त्याच्या आनुग्रहे करुनी ॥ तरती जन असंख्ये ॥२॥एका जनार्दनाची भाक ॥ पुन्हां जन्म नाही देख ॥ साधन आणीक ॥ दुजे कारण ॥३॥व्रत जे करीती तया जे निंदीती ॥ त्याचे पूर्वज जाती नरकामधी ॥१॥भाळे भोळे भक्त वेडे वाकुडें गाती ॥ तया जे हास्ती ते श्वानसम ॥२॥स्वमुखे देव आवडीनें सांगे ॥ तयाचिये मागे हींडे देवो ॥३॥एका जनार्दनी भोळा देव ॥ भक्ताचा गौरव करीतसे ॥४॥रुक्मांगदा कारणे एकादशीचा ॥ छंद तेणे परमानंद प्रगटला ॥१॥अंबऋषी कारणें द्वादशीचा छंद ॥ तेणें परमानंद प्रगटला ॥२॥एका जनार्दनी एक वीध छंदे ॥ तेणे परमानंद प्रगटला ॥४॥अभंग - २श्री तुकाराम महाराज वाक्य--आह्मां देणें धरा सांगतो ते कानी ॥ चिंता पाय मनी विठोबाचे ॥१॥तेणे माझे चित्त होय समाधान ॥ विलास मिष्टान्न नलगे सोने ॥२॥व्रत एकादशी द्वारी वृदांवन ॥ कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥३॥तुका ह्मणे त्याचे घरची उष्टावळी ॥ मज ते दिवाळी दसरा सण ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - जे पर्व प्रिय चक्रपाणी ॥ जे सकळ कल्याणाची श्रेणी ॥ उभय पक्षा तारणी ॥ वैष्णव जननी एकादशी ॥१२५९॥अभंग - ३श्री नामदेव महाराज वाक्य--एकादशीदिनी खाईल जो अन्न ॥ सुकर होऊनि येईल जन्मा ॥१॥एकादशीदिनी करील जो भोग ॥ त्यासी माता संग घडतसे ॥२॥एकादशी दिनी खळेल जो सोंगटी ॥ काळ हाणील खुंटी गुदस्थनी ॥३॥रजस्त्री शोणीत सेविल्या समान ॥ तांबुल चर्वण करील जो ॥४॥नामा ह्मणे नाही माझ्याकडे दोष ॥ पुराणी हे व्यास वाक्य आहे ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - जे शुक्लकृष्णपक्षविधी ॥ भक्त वाऊनिया खादी ॥ नेऊनियां सायुज्यपदी मोक्ष सिध्दी पाववी ॥१२६०॥अभंग - ४श्री तुकाराम महाराज वाक्य--एकादशीस अन्न पान ॥ जे नर करिती भोजन ॥ श्वानविष्टे समान ॥ अधम जन ते एक ॥१॥एका व्रताचे महिमान ॥ नेमे आचरती जन ॥ गाती ऐकती हरि कीर्तन ॥ ते समान विष्णुशी ॥२॥अशुध्द विटाळसीचे खळ ॥ विडा भक्षिती तांबूल ॥ सांपडले सबळ ॥ काळा हाती न सुटे ॥३॥शेज बाज विलास भोग ॥ करिती कामिनीचा संग ॥ तया जडे क्षयरोग ॥ जन्मव्याधी बळवंत ॥४॥आपण न वजे हरि कीर्तना ॥ आणिका वारी जाता कोना त्याच्या मापें जाणा ॥ ठेंगणा तो महा मेरू ॥५॥तया दंडी यमदूत जाले तयाचे अंकित ॥ तुका ह्मणे व्रत ॥ एकादशी चुकलिया ॥६॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - जो एकादशीचा व्रति माझा ॥ तो व्रत तप तीर्थाचा राजा । मज आवडे तो आधोक्षजा ॥ परिग्रहो माझा तो एक ॥१२६५॥अभंग - ५श्री तुकाराम महाराज वाक्य--जया नाही नेम एकादशी व्रत ॥ जाणावे तें प्रेअत सर्व लोकी ॥१॥त्याचें वय नित्य काळ लेखिताहे ॥ रागे दात खाय करकरा ॥२॥जयाचिये द्वारी तुळसी वृंदावन ॥ नाही ते स्मशान गृहजाणा ॥३॥जय कुळी नाही एकहि वैष्ण्दव ॥ त्याचा बुडे भवनदी ताफा ॥४॥विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचे ॥५॥तुका ह्मणे त्याचे काष्ट हातपाय ॥ कीर्तना न जाय हरिचिया ॥६॥ ॥धृ०॥ए०भा०अ०१२ - जो एकादशीचा व्रतधारी ॥ मा नित्य नोंद त्याच्या घरी सर्व पर्व काळाच्या शिरी ॥ एकादशी खरी पै माझा ॥१२६४॥अभंग - ६श्री तुकाराम महाराज वाक्य--पंधरा दिवसा एकादशी ॥ कांरे न करिसी व्रतसार ॥१॥काय तुझ्दा जीव जातो एकदिसें ॥ फराळाच्या मिषें धणी घेशी ॥२॥स्वहित कारण मानवेले जन ॥ हरिकथा पूजन वैष्णवांचे ॥३॥थोडे तुज घरी होती उजगरे ॥ देऊळासी कारे मरसी जाता ॥४॥तुका ह्मणे कांरे सुकुमार जालसी ॥ काय जाब देसी यमदूता ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - तेवी एकादशी पाही ॥ जो जो उत्सवो जे जे समयी ॥ तो तो उपतिष्ठे माझ्याठायी । संदेह नाही सर्वथा ॥१२६३॥अभंग - ७श्री तुकाराम महाराज वाक्य--करविती व्रत अर्ध पुण्य लाभे ॥ मोडता दोघे नरका जाती ॥१॥शुध्द बुध्दि दोघा एक मान ॥ चोरासवें कोण जीवे राखे ॥२॥आपुलें देउनी आपुलाची घात । न करावा थीत जाणोनिया ॥३॥वेच धाडी वाराणसी ॥ नेदावें चोरासि चंद्रबळ ॥४॥तुका ह्मणे तप तीर्थ व्रत याग ॥ भक्ती हे मार्ग मोडू नये ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - ऐक माझे भक्ताचें चिन्ह ॥ माझ्या पर्वाचें अनुमोदन ॥ करी करवी आपण ॥ दीनोध्दरण उपावो ॥१२५३॥अभंग - ८श्री तुकाराम महाराज वाक्य--एकादशी सोमवार न करिती ॥ कोण त्यांची गति होईल नेणें ॥१॥काय करु बहु वाटे तळमळ ॥ आंधळी सकळ बहिर्मुख ॥२॥हरिहरा नाहीं बोटभरी वती ॥ कोण त्यांची गति होईल नेणो ॥३॥तुका ह्मणी नाहीं नारायणी प्रीती ॥ कोण त्यांची गति होईल नेणों ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ - तो शुध्द झाला विष्णुच्या ध्यानी ॥ विष्णुश्याम शिवचिंतनी ॥ विनटले गुणी येरयरा ॥१२५॥अभंग - ९श्री तुकाराम महाराज वाक्य--आह्मी तेणे सुखी ॥ ह्मणा विठठल विठठल मुखी ॥१॥तुमचें येर वित्त धन ॥ तें मज मृत्तिके समान ॥२॥कंठी मिरवा तुळसी ॥ व्रत करा एकादशी ॥३॥म्हणवा हरीचे दास ॥ तुका ह्मणे मज ही आस ॥४॥ ॥धृ०॥अभंग - १०श्री तुकाराम महाराज वाक्य--उदार चक्रवर्ती ॥ वैकुंठीचा भूपति पुंडलिकाचिया प्रीती ॥ विटे उभा राहिला ॥१॥सर्वसिध्दीचा दातार ॥ सवें आणिला परिवार ॥ भक्ता अभय कर ॥ घ्या घ्या ऐसे म्हणतसे ॥२॥जेणे हे विश्व निर्मियले ॥ महर्षीदेवां संस्थापिले ॥ एकवीस स्वर्गाते धरिले ॥ सत्तामात्रें आपुलीया ॥३॥तुका ह्मणे कृपावंत ॥ इच्छिले पुरवी मनी ॥ रिध्दी सिध्दी मोक्ष देत ॥ शेखी संग आपुलीया ॥५॥ ॥धृ०॥अभंग - ११श्री नामदेव महाराज वाक्य--धन्य महाराज जन्मले संसारी । जे ध्याती अंतरी नारायण ॥१॥नारायण गाय नारायण ध्याय । धन्य त्यासि माय प्रसवली ॥२॥प्रसवली तया कुळाचा उध्दार ॥ तो तरे निर्धार नामा ह्मणे ॥३॥ ॥धृ०॥भजनश्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥आरत्या ---१ झाले समाधान । तुमचे देखि० २ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी० ३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन ---घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥शेजआरती --१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार २ चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम N/A References : N/A Last Updated : December 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP