मालिका ७ सप्तमी

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥ ) आणि (॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)

अभंग - १
श्री नामदेव वाक्य--
सांडोनी अभिमान झालो शरणांगत ॥ ऐसीयाचा अंत पहासी कांई ॥१॥
माझे गुण दोषमनी गां न धरी ॥ पतीत पावन जरी ह्मणविसी ॥२॥
पडलियी पापराशी झणी देवा ॥ हे लाज कैशवा कोणासजी ॥३॥
नामा ह्मणे देवा चतुरा शिरोमणी ॥ नि:कुरा होसी झणी मायबाप ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२९ -- कायावाचा आणि मन ॥ सद्भावेसदा संपूर्ण ॥ ऐशिया भक्ता तुझे चरण ॥ स्वानंद पूर्ण दुभती ॥६॥

अभंग - २
श्री तुकाराम महाराज वाक्य--
मागें शरणागत तारिले बहुत ॥ ह्मणती दीनानाथ तुज देवा ॥१॥
पाहिले अपराध नाही याती कुळ ॥ तारिला अजामेळ गणिका भील्ली ॥२॥
अढळपदी बाळ बैसविला धुरु ॥ क्षीराचा सागरु उपमान्या ॥३॥
गजेंद्रपशु नाडीला जळचरे ॥ भवसिंधुपार उतरिला ॥४॥
प्रल्हाद अग्नीत राखिला जळता ॥ विषाचे अमृत तुझ्या नामे ॥५॥
पांडवां संकट पढतां जडभारी ॥ त्याच तु कैवारी नारायणा ॥६॥
तुका ह्मणे तुया अनाथाचा नाथ । ऐकोनि यां मात शरण आलो ॥७॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२६ -- करितां नामस्मरण ॥ सहजें निवारे जन्म मरण । त्या मजारीलिया शरण ॥ बाधी दु:ख कोण बापुडे ॥४३१॥
ए०भा०अ०१० -- मागां दुध हे ह्मणतलियासाठीं ॥ आघावियाचि क्षीराब्धीची करुनि वाटी ॥ उपमन्यू पुढें धूर्जटी । ठेविली जैसी ॥१७॥
ना तरी वैकुंठ पीठनायकें ॥ रुसला ध्रुव कवतिके ॥ बुझाजिविला देऊनि भातुकें ॥ ध्रुवपदाचें ॥१८॥
ए०भा०अ०१४ -- इतर साधनें व्युप्तत्ती ॥ दुरी सांडूनी परती ॥ श्रध्दायुक्त माझी भक्ती ॥ धरिल्या हाती मी लागें ॥२६३॥
निर्विकल्प नि:संदेहो ॥ सर्व भूती भगवद्भावो । हा भक्तीचा निजनिर्वाहो भजन भावो या नांव ॥२६४॥
होऊनि सर्वार्थी उदासू माझ्या भजनाचा उल्हासु न घरी मोक्षाचा अभिळषू ॥ एवढा विश्वासू मद्भजनी ॥२६५॥

अभंग - ३
श्री नामदेव वाक्य--
वासनेचा फांसा पडिला माझे कंठी ॥ हिंडलों जग जेठी नाना योनी ॥१॥
सोडवी गा देवा दीन दया निधी ॥ मी एक अपराधी दास तुझा ॥२॥
शरण आलियाचे न पाहसी अवगुण ॥ कृपेचें लक्षण तुज साजे ॥३॥
त्रिभुवनी समर्था उदार मनाचा ॥ कृपाळू दीनाचा ॥ व्रीद तुझे ॥४॥
गजेंद्र माणिकेची राखिली तुवांलाज ॥ उध्दरिला द्विज अजामेळ ॥५॥
नामा ह्मणे देवा अव्हेरिसी मज ॥ जगी थोरलाज येईल तुला ॥६॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- तो आधी जरी दुराचारी ॥ तरी सर्वोत्तमचि अवधारी । जैसा बुडाला महापूरी । न मरत निघाला ॥४१८॥
तयाचे जिवित एलथडिये आले ॥ ह्मणोनि बुडाले पण जेवि वाया गेले । तेवि नुरेचि पाप केले ॥ सवटलिय भक्ती ॥४१९॥
यालागी दुष्कृती जर्‍ही जाहला ॥ तरी अनुतापतीर्थी न्हाला । न्हाउनि मजाआंत आला ॥ सर्वभावे ॥४२०॥

अभंग - ४
श्री एकनाथ महाराज वाक्य--
काम क्रोध वैरी हे खळ ॥ लोभ अहंकार आशा बरळ ॥ कर्म बळीवंत लागलें सबळ ॥ तेणे बेधिले आमुते निखळ ॥१॥
नको नको वियोग हरि । येई येई तूं झड्करी ॥ आम्हां भेटे नको धरु दुरी ॥ वियोग झाला तो आंवरी ॥२॥
तुझिया भेटीचें आंर्तमनी ॥ करणे विरहा बोलणे वाणी । एका शरण जनार्दनी ॥ वियोग गेला पाहाता
समचरणी ॥३॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- आणि आचार पाहतां सुभटा ॥ तो दुष्कृत्याचा करि सेलवांटा । परि जिवित वेचिले चोहटां ॥ भक्तीचिया की ॥४१६॥
अगा नांवे घेतां ओखटी । जे आघवेया अधमाचिये शेवटी ॥ तिये पापयोनीही किरीटी ॥ जन्मले जे ॥४४३॥
ते पापयोनि मूढ ॥ मुखे जैसे कां दगड ॥ परि माझ्याठायीं दृढ ॥ सर्व भावें ॥४४४॥
जायांचिय वाचे माझे आलाप ॥ दृष्टी भोगी माझेचि रुप ॥ जयांचे मन संकल्प ॥ माझाचि वाहे ॥४४५॥

अभंग -५
श्री एकनाथ महाराज वाक्य--
गुंतलो प्रपंची सोडविगा देवा । देई तुझी सेवा जीवे भवें ॥१॥
नलगे धन मान पुत्र दारा वित्त । सदां पायी चित्त जडोनी राहो ॥२॥
वैष्णवांचा दास कामारी नि:शेष हेचि पुरवी आस दुजे नको ॥३॥
एकाजनार्दनी करीत विनंती ॥ मागणें श्रीपती हेचि द्यावें ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- हे असो बहुत पार्था । तो उतरला कर्मे सर्वथा ॥ ज्याची अखंड गा अस्था ॥ मजचिलागी ॥४२३॥
अवघिया मनोबुध्दिचिया राहाटी । भरोनि एकनि ची पेटी ॥ मजमानि किरीटी ॥ निक्षेपिली जेणे ॥४२४॥

अभंग - ६
श्री तुकाराम महाराज वाक्य--
विनवितो चतुरा तुज विश्वेंभरा । परि यशी दातारा पांडुरंगा ॥१॥
तुझे दास एसें जगीं वाखाणिलें ॥ आतां नव्हें भलें मोकलिता ॥२॥
माझे गुण दोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझें ॥३॥
लोभ मोहमाया आम्हा बांधवितां ॥ तरि हा आनंता बोल कोणा ॥४॥
तुका ह्मणे मी तो पतितचि खरा । परि आलो दातारा शरण तुज ॥५॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- नमितां मानाभिमान गळाले ॥ म्हणोनि अवचिता ते मीचि जहाले । ऐसे निरंतर मिसळले ॥ उपासीत ॥२२७॥

अभंग -७
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥
ऐसा न देखें मी कोणा । दुजा तिही त्रिभुवनी ॥२॥
पाहिली पुराणें ॥ धांडोळिली दरुषणें ॥३॥
तुका ह्मणे ठायी । जडून ठेलो तुझ्या पायी ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१४ - भक्तांच्या उपकारता । मी थोर दाटलो तत्वता ॥ नव्हेचि प्रत्युपकारता ॥ आधीन सर्वत्र यालागी ॥२७९॥

अभंग -८
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तुझा म्हणवूनि दिसतों गा दीन । हाचि अभिमान सरे तुझा ॥१॥
अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणी कोण पावे ॥२॥
तैसा विठो तुजविण परदेशी । नको या द:खासी गोवू म्ज ॥३॥
तुका ह्मणी मज सर्व तुझी आशा आगा जगदीशा पांडुरंगा ॥४॥॥धृ०॥
ज्ञा०अ०८ - डोळां जे देखावें ॥ कां कानी हन ऐकावे ॥ मनी जें भाववे ॥ बोलावे वाचें ॥७६॥
तें आतं बाहेरी आघवें । मिचि करुनि घालावें । मग सर्व काळी स्वभावें ॥ मीचि आहे ॥७७॥

अभंग -९
श्री तुकाराम महाराज वाक्य--
मायें मोकलिलें कोठें जावे बाळें ॥ आपलिया बळे न वांचे ते ॥१॥
रुसोनिया पळे सांडूनिया ताट ॥ मागे पाहे वाट यावी ऐसी ॥२॥
भांडवल आम्हां आळी करावी हे । आपणची धाये धावशील ॥३॥
तुका ह्मणे आळी करुनियां निकी ॥ देशील भातुकी बुझउनी ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - शरण रेघताचित्काळ ॥ तु झालाहसी माझेबाळ ॥ तेव्हां भव भय पळे सकळ तुज कळिकाळ कापती ॥२६३॥

अभंग -१०
श्री तुकाराम महाराज वाक्य--
धेनु चरे वनांतरी ॥ चित्त बाळ्कापे धरी ॥१॥
तैसे करी वो माझे आई । ठव देऊनि राखे पायीं ॥२॥
काडितां तळमळी । जिवना बाहेरी मासोळी ॥३॥
तुका ह्मणे कुडी ॥ जिवा प्राणाची आवडी ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२८ - खरीता भगवद्भक्तजन । भक्तीसी बाधीना विघ्न ॥ भक्तीचे महीमान ॥ स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६७२॥

अभंग - ११
श्री तुकाराम महाराज वाक्य--
मागे बहुतां राखिले आडणि ॥ धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥
ऐसे ठावे झाले मज बरव्या परी ॥ ह्मणऊनिकरी धांवा तुझा ॥२॥
माझेविशी तुज पडिलो विसरू ॥ आतां काय करु पांडुरंगा ॥३॥
अझुनि कां नये तुह्मांसी करुणा ॥ दुरी नारायणा धरिले मज ॥४॥
तुका ह्मणे जीव जाऊ पाहे माझा ॥ आतां केशीराजा घाली उडी ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२८ - संकट मांडीले आंवरी पासी ॥ तै म्या अपमानीले दुर्वासासी । दाही गर्भवासी मी सोशी । उणे भक्तासी येऊ नेदी ॥६७७॥

अभंग - १२
श्री तुकाराम महाराज वाक्य--
धांवा केला धांवा ॥ श्रम होऊ नेदी जीवा ॥१॥
वर्षे अमृताच्या धारा । घेई वोसंगा लेकरा ॥२॥
उशीर तो आतां ॥ न करावा हेचि चिंता ॥३॥
तुका ह्मणे त्वरें । वेग करी विश्वंभरे ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१४ - तैशी नव्हे भक्ती । चढती वाढवून माझी प्रीत्ती ॥ तत्काळ करी माझी प्राप्ति नव्हे पगिस्ती आणिकाची ॥२५९॥

अभंग - १३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
धांव धांव गरुडध्वजा ॥ आह्मां अनाथांच्या काजा ॥१॥
बहु झालों कासावीस । ह्मणोनि पाहें तुझी वास ॥२॥
पाहे पाहे त्या मारगें ॥ कोणी येतें माझ्या लागे ॥३॥
असोनियां ऐसा ॥ तुजसारिखा कोंवसा ॥४॥
न लागावा उशीर ॥ नेणों कां हो केला धीर ॥५॥
तुका ह्मणे चाली ॥ नको चालूं धांव घाली ॥६॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०७ - धांव पाव गा श्री हरी कृपा करी दीनावरी ॥ मज उध्दरी भवसागरी । भक्त कैवारी श्रीकृष्ण ॥२३०॥

अभंग - १४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
आपुल्या महिमाने ॥ धातु परिसें केलें सोनें ॥१॥
तैसे न मानीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥२॥
गांवाखालील वोहळ ॥ गंगा न मानी अमंगळ ॥३॥
तुका ह्मणे माती । केली कस्तुरीणे सरती ॥४॥॥धृ०॥
जैसे तवची वहाल वोहळ । जव न पावती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ ॥ गंगारुप ॥४५८॥
ज्ञा०अ०९ - अंगावरी फोडावयाची लागी ॥ लोहो मिळो का परिसाचे आंगी ॥ कां जे मिळतिये प्रसंगी सोनेंचि होईल ॥४६४॥

अभंग - १५
श्री तुकाराम महाराज वाक्य--
आतां न ह्मणे मी माझे । नघें भार कांही ओझे ॥१॥
तुंचि तारीता मारिता ॥ कळो आलासी निरुता ॥२॥
अवघा तूचि जनार्दना । संत बोलती वचन ॥३॥
तुका ह्मणी पांडूरंगा ॥ तुझ्या रिघालो वोसंगा ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०५ - ते अज्ञान जै समूळ तुटे ॥ तै भ्रांतिचें मसेरे फीटे ॥ मग अकर्तृत्व प्रगटे ॥ ईश्वराचें ॥८३॥
एथ ईश्वरू एकु अकर्ता एसे मानले जरी चित्ता ॥ तरी तोचि मी हें स्वभावता आदिचि आहे ॥८४॥

अभंग -१६
श्री तुकाराम महाराज वाक्य--
देह तुझ्या पायीं ॥ ठेवूनि जालो उतराई ॥१॥
आतां माझ्या जीवा । कारणे तें करी देवा ॥२॥
बहुत अपराधी ॥ मतिमंद हीन बुध्दि ॥३॥
तुका म्हणे नेणों ॥ भाव भक्तीची लक्षणे ॥४॥
ए०भा०अ०२९ - जिही भक्तीसी विकूनिचित्त ॥ जाहले अनन्य शरणागत ॥ त्यासि तारिता तू जगन्नाथ ॥ निजसुखे निज भक्त नांदविशी ॥९५॥

अभंग - १७
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तुमचे स्तुति योग्य कोठे माझी वाणी ॥ मस्तक चरणी ठेवी तसे ॥१॥
भक्तिभाग्य तरी नेदी तुळशीदळ ॥ जोडूनि अंजुळ उभा असे ॥२॥
कैचे भाग्य एसे पविजे संनिध ॥ नेणे पांळूं विधकरुणा भाकी ॥३॥
संतांचे शेवटी उच्छिष्टाची आस ॥ करुनियां वास पाहातासे ॥४॥
करी इच्छा मज म्हणोत आपुले एखदिया बोलें निमित्याच्या ॥५॥
तुका ह्मणे शरण आलों हे साधन ॥ करितो चिंतन रात्रंदिवस ॥६॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ - तैसे लक्ष्मियचें थोरपण न सरे । जेथ शंभुचेही तप न पुरे ॥ तेथ येर प्राकृत हें दरे ॥ कवि जाणो लाहे ॥३८०॥
ज्ञ०अ०९ - यालागी शरीर सांडोवा कीजे ॥ सकळगुणांचे लोण उतरिजे ॥ संपत्ती मद सांडिजे ॥ कुरवंडी करुनि ॥३८१॥

अभंग - १८
श्री तुकाराम महाराज वाक्य--
कल्पतरू या नव्हती बाभुळा ॥ पुरविती फळ्दा इचितिया ॥१॥
उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळया ॥ परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥
तुका ह्मणे देव दाखविल दृष्टी ॥ तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२६ - इंद्र पदादी ब्रह्मसदन । ये प्राप्ती नांव भाग्य गहन ॥ तेही सत्संगा समान । कोट्यंशें जाण तुकेना ॥३५४॥
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे--मागणे हे एक तुजप्रती ।
भजन--ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद--पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजाआरती --
१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२ चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम  

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP