मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| मालिका १२ द्वादशी ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक मालिका १२ द्वादशी श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaymarathiज्ञानोदयभजनमराठी ज्ञान महात्म्य Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥(॥ रुप पाहातां लोचनी॥ आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)अभंग - १श्रीज्ञानदेव वाक्य--सोनियाचा दिवस आजी अमृते पाहीला ॥ नाम आठवितां रुपी प्रगट पै जाला ॥१॥गोपाळा रे तुझे ध्यान लगो मना ॥ आनु न विसंबे हरि जगत् जीवना ॥धृ०॥तनु मनु शरण शरण विनटलो तुझ्या पाई ॥ रखुमादेवीवारा वांचूनि आनु नेणे कांही ॥२॥ए०भा०अ०२ - हरि चरित्रे अगाध ॥ ज्ञानमुद्राप्रबधे ॥ कीर्तनी गातां विशद ॥ परमानंद वोसंडे ॥५२८॥यापरी हरिकीर्तन ॥ देत परम समाधान ॥ हा भक्ती राजमार्ग पूर्ण ॥ ये मार्गी स्वयें रक्षण चक्रपाणी कर्ता ॥५३८॥अभंग - २श्रीज्ञानदेव वाक्य--त्रिभंगी देहुडा ठाण मांडूनिया माये ॥ कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥गोविंद वो माये गोपाळू वो ॥ सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानदू वो ॥धृ०॥सांवळे सगुण सकळा जिवाचे जीवन ॥ घनानंद मूर्ति पाहतां हारपले मन ॥२॥शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ ॥ बाप रखुमादेवीवरु विठठल सकळ ॥३॥ ॥धृ०॥ए०भा०अ०१९ - अमृत रुप ज्या माझ्या कथा ॥ श्रध्दा युक्त श्रवण करिता ॥ फिके करुनिया आमृता ॥ गोडीभक्तिपंता तत्काळ लागे ॥२१७॥अभंग - ३श्रीज्ञानदेव वाक्य--बरवा वो हरि बरवा वो ॥ गोविंद गोपाळ गण्दगरुवा वो ॥१॥सांवळा वो हरि सांवळा वो ॥ मदन मोहन कान्हो गोवळा वो ॥धृ०॥पाहतां वो हरि पाहतां वो ॥ ध्यान लागले या चित्ता वो ॥२॥पढिये वो हरि पढिय वो ॥ बाप रखमादेवीवरु धाडिये वो ॥३॥ ॥धृ०॥ए०भा०अ०१९ - सविता कथामृतसार ॥ मभ्दावी रंगले अंतर ॥ ते माझे गुण माझे चरित्र ॥ गाती सादर उल्लासे ॥२२०॥अभंग - ४श्रीज्ञानदेव वाक्य--काळा पैं गोवळू काळासि आलोट ॥ नाममृतें पाठ भक्ता देहीं ॥ नित्य सखा आह्मां तपांचिया कोडी ॥ नलगती परवडी व्रतें तीर्थे ॥१॥सुलभ सोपारे सर्वाघटी अससी ॥ साधुसंगे दिससी आह्मा रया ॥धृ०॥चैतन्या शेजारी मन पैं मुरालें ॥ सांवळे सानुले ह्र्दय घटी ॥ बाप रखमादेविसरू विठठलराज ॥ निवृत्तीनें बीज सांगितले ॥२॥ ॥धृ०॥ए०भा०अ०१९ - माझे नाम माझी पदे ॥ नाना छंदे अद्वैत बोधे ॥ कीर्तनी गाती स्वानंद्दे ॥ परमानंद डुलत ॥२२१॥अभंग - ५श्रीनामदेव वाक्य--हरि आला रे हरि आला रे ॥ संतसंगे ब्रह्मानंदु जाला रे ॥१॥हरि येथे रे हरि तेथें रे ॥ हरिवांचूनि न दिसे रितें रे ॥धृ०॥हरि पाही रे हरि ध्यांई रे ॥ हरि वांचूनि दुजें नाही रे ॥२॥हरि वाचे रे हरि नाचे रे ॥ हरि पाहतां आनंदु सांचे रे ॥३॥हरि आदि रे हरि अंति रे ॥ हरि व्यापुक सर्वाभूंती रे ॥४॥ हरि जाणा रे हरि बाना रे ॥ बाप रखमादेवीवरू राणा रे ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ०१२ - तीही धरुनि संतसंगती ॥ आले माझीया मदाप्रती ॥ देव द्विज त्यांते वंदिती ॥ अभिनव कीर्ती संताची ॥६८॥अभंग - ६श्रीनामदेव वाक्य--सांवळा सुकुमार लावण्य त्रिभुवनी ॥ अवचितां आंगणी देखिला रया ॥१॥आळवितां नयेचि सचेतनी अचेत ॥ भावेचि तृप्त माझा हरि ॥धृ०॥अज्ञानी न दिसे ज्ञानी येऊन उभा ॥ विज्ञानेसी शोभा दावी रया ॥२॥ज्ञानदेवा सार सांवळी ये मुर्ति ॥ निवृत्तीनें गुंती उगविली ॥३॥ ॥धृ०॥ए०भा०अ०१२ - माझी संगतीची अनन्य प्रीती ॥ तेचि त्यांस शुध्द भक्ती ॥ तेणें कृत कृत्य होऊनि निश्चिती ॥ माझी निजपद प्राप्ती पावले ॥११७॥अभंग - ७श्रीनामदेव वाक्य--झणे दृष्टी लागे तुझ्या सगुणपणा ॥ जेणें माझ्या मना बोध केला ॥१॥अनंता जन्मीचें विसरलों दु:ख ॥ पाहातां तुझें मुख पांडुरंगा ॥२॥योगियांच्या ध्यानीं ध्याता नातुडसी ॥ तो तूं आह्मांपाशी मागे पुढे ॥३॥नामा ह्मणे जीवीं करीन निंबलोण ॥ वीटीसहित चरण वोवाळीन ॥४॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०१२ - परि माते परम करुनि ॥ इये आर्थी प्रेम धरुनि ॥ हेचि सर्वस्व मानुनि ॥ घेती जे पै ॥१३३॥अभंग - ८श्रीनामदेव वाक्य--विश्वभर नाम तुझे कमळापती ॥ जगी श्रुति स्मृति वाखाणिती ॥१॥गौळयांचे घरीचे दही लोणी चोरुनी ॥ खातां चक्रपाणी लाजसीना ॥२॥आतां दीनानाथा तुझे ब्रीद साचे ॥ तरी भुषण आमुचे जतन करी ॥३॥ठेवा ठेवी कायसी आतां आह्मा । विनवितो नामा केशिराजा ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ - तो ह्मणे व्यासाचा जो निजगुरु ॥ आणि माझाही परमगुरु ॥ श्रीनारंद महामुनिश्वरु ॥ त्यासी अत्यादरु श्रीकृष्ण भजनी ॥२३॥अभंग - ९श्री तुकाराम महाराज वाक्य--गोड लागे परी सांगताचि नये ॥ बैसे मिठी सये आवडीची ॥१॥वेधलें वो येणें श्रीरंगरंग ॥ मी हे माझी अंगे हारपली ॥२॥परतेचि ना दृष्टी बैसली ते ठायी ॥ विसावोनि पायीं ठेलें मन ॥३॥तुकयाच्या स्वामी सवें झाली भेटी ॥ तेव्हां झाली तुटी मागिलाची ॥४॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०६ - तया एकवटलीया प्रेमा । जरी पाडे पाहिजे उपमा ॥ तरी मी देहे तो आत्मा ॥ हेचि होय ॥४८५॥अभंग - १०श्री तुकाराम महाराज वाक्य--आमुचे जीवन हें कथाअमृत ॥ आणिकही संतसमागम ॥१॥सारुं एके ठायी भोजन परवडी ॥ स्वादरसें गोडी पदोपदी ॥२॥धालिया ढेकर येती आनंदाचे ॥ वोसंडले वाचे प्रेमसुख ॥३॥पिकलें स्वरुप आलिया घुमरी ॥ राती ते अंबरी न समाय ॥४॥मोजितां तयाचा अंत नाही पार ॥ खुंटला व्यापार तुका ह्मणे ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ०१२ - जळी प्रतिबिंब अदोलाय मान ॥ तेवी जीवासी जन्ममरण ॥ श्रील्लरी चेद्र आडकला पूर्ण ॥ तेवी कर्म बंधन जीवासी ॥२९९॥थिल्लर जळ आटले ॥ तेथे चंद्रबिंब निमाले ॥ नाते चंद्रबिंब बिंबोनि ठेले ॥ जाहले निमाले दोनी मिथ्यां ॥३००॥अभंग - ११श्रीएकनाथ महाराज वाक्य--बरी ओळखी झालि आतां ॥ चित्त जडले अच्युता ॥१॥आह्मां डंखू आला काळ ॥ काळ झालासे कृपाळू ॥२॥नियमा नियम सांडोनि दोन्ही ॥ आह्मी रत हरिकीर्तनी ॥३॥सर्वाभूती भगवद्भाव ॥ भूतमात्री असे देव ॥४॥एकां जनार्दनाचे पायीं ॥ द्वैत भावाचि उरला नाहीं ॥५॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०१२ - तया सगाचेनि सुरवाडे ॥ मज विदेहादेह धरणे घडे ॥ किंबहुना आवडे ॥ निरुपमू ॥२२५॥तेणेंसी आह्मां मैत्र ॥ एथ कायसे विचित्र परि तयाचे चरित्र ॥ ऐकतीजे ॥२२६॥जो हा अर्जुना साद्यांत ॥ सांगितला प्रस्तुत ॥ भक्तियोगु समस्त योगरुप ॥२२८॥अभंग - १२श्रीएकनाथ महाराज वाक्य--काया ही पंढरी आत्मा हा विठठल ॥ नांदतो केवळ पांडुरंगा ॥१॥भाव भक्ति भीमा उदक ते वाहे ॥ बरवा शोभता हे पांडुरंगा ॥२॥दया शांति क्षमा हेचि वाळुवंट ॥ मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ॥ हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥दश इंद्रियाचा एक मेळा केला ॥ ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥देही देखिली पंढरी जनी वनी ॥ एकाजनार्दनी वारी करी ॥६॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - काढूनि आपुला डोळा ॥ दूरी ठेविला वेगळा । तो ह्र्दयस्थेवीण आंधळा देखणी कळा देवाची ॥११४१॥अभंग - १३श्रीज्ञानदेव वाक्य--आजि देखिले रे आजि देखिले रे ॥धृ०॥सबाह्य अभ्यंतरी ॥ अवघा ब्यापकु मुरारी ॥१॥दृढ विटे मन मुळी ॥ विराजित वनमाळी ॥२॥आजि सोनियाचा दिनु ॥ वरी अमृताते वरुषे धनु ॥३॥बरवा संतसमागमु ॥ प्रगटाला आत्मारामु ॥४॥बाप रखुमा देवीवरू ॥ कृपा सिंधु करुणाकरु ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - सगुण निर्गुण नेणें कांही ॥ परी देवो आहे ह्मणे ह्र्दयी ॥ जडत्व असे देहाच्या ठायी ॥ तें देवो पही वावीत ॥११३५॥यालागी देहाचे जें चळण ॥ ते ह्र्दय्स्थ करवी नारायण दृष्टाचे जें देखणेपण ॥ त्याचेनि होतसे ॥११४०॥अभंग - १४श्रीएकनाथ महाराज वाक्य--क्षीरा सागरी नवडे सुख ॥ क्षीरापती देख देव आला ॥१॥कवळ कवळ पहा हो । सुख पसरुनि धावतो देवो ॥२॥एकादशी देव आला क्षीरापती लागी टोकात ठेला ॥३॥द्वादशी क्षीरापती ऐकोनि गोष्टी ॥ आवडी देव देतसे मिठी ॥४॥क्षीरापती बालिता वैष्णंवो मुखी ॥ तेणे मुखे देह होतसे सुखी ॥५॥क्षीरापती सेविता आनंदू ॥ स्वानंद्दे भुलला नाचे गोविंनु ॥६॥क्षीरापती सेविता वैष्णवा लाहो ॥ मुखामाजी मुख घालितो देवो ॥७॥क्षीरापती चारा जनार्दन मुखी एका एकी तेणें होतसे सुखी ॥८॥ए०भा०अ०१२ - योग योग व्रतदान ॥ वेदाध्यायन व्याख्यान ॥ तप तीर्थ ज्ञान ध्यान ॥ संन्यासग्रहण सादरे ॥११९॥इत्यादि नाना साधनेसी ॥ निष्ठ्हा करितानि वर्धनें ॥ माझी प्राप्ती दुरास तेणें ॥ जीवे प्राणे न पावीजे ॥१२०॥यापरी शीणता साधनेसी ॥ माझी प्राप्ती नव्हे आती प्रियासी ते गोपी पावल्या अप्रियासी संत्संगासि लाहोनी ॥१२१॥भजनश्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥आरत्या ---१ झाले समाधान । तुमचे देखि० २ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी० ३मप्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४नआरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन ---घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥शेजआरती --१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार २. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम N/A References : N/A Last Updated : December 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP