मालिका ५ पंचमी
श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.
॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥ ) आणि (॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)
अभंग -१
श्री एकनाथ महाराज वाक्य--
मजुर राउताचें घृत नेतां । तो तुरंगी चढे मनोरथा ॥१॥
सबळ बारुचे उडडाण । ह्मणोनि उडो जाता आपण ॥२॥
बळे उडाला माझा घोडा । परी स्मरण नाही दगडा ॥३॥
उडी सरसी घागर पडे । एका जनार्दनी पाहुनी रडे ॥४॥ ॥धृ०॥
ज!ज्ज०अ०७ -- येर्हवी कोष कीटाकाचिया परी तो आपण या आपण वैरी । जो आत्मबुध्दि शरीरी ॥ चारुस्थळीं ॥७२॥
अभंग -२
श्री एकनाथ महाराज वाक्य--
डोळा फोडोनि काजळ ल्याला । नाक कापुन शिमगा खेळला ॥१॥
वेंचिता धन लक्ष कोटी ॥ आयुष्य क्षणाचि नोहे भेटी ॥२॥
मिथ्या बागुलाचे भयो ॥ बाळी सत्य मानिती पाहो ॥३॥
ऐसें मिथ्या नको मनीं ॥ एका शरण जनार्दनी ॥४॥॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- ना, तरी निर्दैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया अहाति सहस्त्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासू करी ॥ कां दरिद्रेचियो
तैसा ह्रदयांमध्ये मी रामु । असतां सर्व सुखाचा आरासु ॥ की भ्रांतीसी कासू । विषयांवरी ॥६०॥
बहु मृगजळ देखोनि डोळ्दा । थुंकिजे अमृताचा गिळतां गळाला । तोडिला परिसु बांधिला गळा शुक्ति कां लाभे ॥६१॥
ए०भा०अ०१२ -- उध्दवा बागुलाचे भय खोटे । परि बालकासी सत्य वाटे । तेवी मिथ्या संसार कचाटे । जीवी प्रगटे बद्धता ॥१३६॥
ज्ञा०अ०९ -- यालागी दुष्कृती जर्ही जाहला । तरी अनुतापतीर्थी न्हाला । न्हाउनि मज आंत आला । सर्व भावें ॥४२०॥
अभंग -३
श्री ज्ञानदेव महाराज वाक्य--
उपजोनि संसारीं आपुला आप्ण वैरी । मी माझे ॥ शरीरी होऊनि ठेले । यादेहप्ते ह्मणे मी पुत्रदारा धन माझे परि काळाचे
हे खाजें ऐसे नेणतु गेला ॥१॥
काम क्रोध मत्सराचे निगुणे ॥ बांधला आपण नेणें भ्रमितु जैसा ॥ मिथ्या मोहफांसा शुक नळिके जैसा मुक्त परि अपेसा
पळो नेणे ॥धृ०॥
जळचर आमीप गिळी जैसा की लागलासे गळीं ॥ आप आपणा पै तळमळी लुटिका नाही ॥ तैसें आरंभी विषयसुख गोड
वाटे इंद्रिया फळपाकी पापी या दु:ख्ह भोगी ॥२॥
राखोंडी फुंकितां दीप नलगे जया परी । तैसा शुध्द शुध्द ब्रह्म कुमारी ज्ञान नपवे व्रत तप दान वेचिले पोटा दंभाचा
खटपटा सिणतु गेला ॥३॥
मृगजळाची नदी दुरुनि देखोनि ॥ धांवेपरी गंगोदक नपवे तान्हेला जैसा ॥ तैसा विषय सुख नव्हेचि हित दु:ख भोगितो
बहुत ॥ परि सावधना नव्हे ॥४॥
परतोनि न पाहे धांवतो सैरा ॥ करितो येरझारा संसारीच्या ॥ ज्ञानदेव ह्मणी बहुता जन्माचा अभ्यासु ॥ तरीच होय सौरसु
परब्रह्मीं ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२८ -- केवळ जो निबीडा भ्रम ॥ संसार हें त्यांचे नाम ॥ येर्हवीं निखिल परब्रह्म ॥ तेथ जन्मकर्म असेना ॥६६॥
ए०भा०अ०२० -- ऐशी झालीया निजात्म प्राप्ती । सहजेचि राहे वृत्ति ॥ निवृत्तीसी होय निवृत्ति ॥ संसाराची शांति स्वयें होये ॥१॥
ऐसें नरदेहा येऊनि देख ॥ पुरुष पावले परम सुख ॥ हें न साधिती जे मूर्ख त्यांसि देवो देख निंदित ॥१६५॥
चौर्यांशी लक्ष जीव योनि त्यांत मनुष्य देहावांचूनि ॥ अधिकारी ब्रह्मज्ञानी ॥ आन कोणी असेना ॥१६६॥
जेणे देहें होय माझी प्राप्ती ॥ त्याला मी आद्य देहो यातें ह्मणती याची दुर्लभ गा अवप्ती भाग्ये पावती नरदेहा ॥१६७॥
अभंग -४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
गेले पळाले दिवस रोज काय म्हणतोसि माझें माझें ॥१॥
सळे धरोनि बैसला काळ फांको नेदी घटिक पळ ॥२॥
कांरे अद्यापि न कळे ॥ केश फिरले कान डोळे ॥३॥
हित कळोनि असतां हाती ॥ तोंड पाडूनि घेती माती ॥४॥
तुज ठाऊके मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥५॥
तुका ह्मणे वेगे ॥ पंढरीराया शरण रिघे
ज्ञा०अ०९ -- आणि आचार पाहतां सुभटा< । तो दुष्कृत्याचा करि सेलवांटा ॥ वरी जीवित वेचिले चोहटा ॥ भक्तीचिया की ॥४१६॥
अभंग -५
श्री तुकाराम महाराज वाक्य--
किती या काळाचा सोसावा वळसा ॥ लागला सरिसा पाठोवाटी ॥१॥
लक्ष चौर्यांशीची करा सोडवण ॥ तिघाया शरण पांडुरंगा ॥२॥
उपजल्या पिंडा मरण संगाते ॥ मरतें उपजतें सवें चित्ते ॥३॥
तुका ह्मणे माळ गुंफली राहाटी ॥ गाडग्याची सुटी फुटलिया ॥४॥॥धृ०॥
ज्ञा०अ०२ -- उपजे ते नाशे ॥ नाशले पुनरपि दिसे ॥ हें घटिका यंत्र तैसें ॥ परि भ्रमें गा ॥१५॥
अभंग -६
श्री नामदेव महाराज वाक्य--
भुषक हव्यासें चालूनी भूमीतें मांजर तयातें टपतसे ॥ तैसा तुज काळ टपे वेळो वेळां वेगीं त्य गोपाळा भजावें बापा ॥२॥
तैसा तुज ॥धृ०॥
भानूचेनि माप आयुष्य वो सरे अवचितां कांरे डोळां झांकी ॥३॥
नामाह्मणे अरे निश्चिती हे मूढा । हरि नाम दृढा सेविसीना ॥४॥धृ०॥
ए०भा०अ०९ -- दैह जै पासुनी जाहला । तै पासुनि मृत्यु लागला । जेवी सापें बेडुक धरिला ॥ गिळूं लागला लव निमिषे ॥३३६॥
साप बेडुकाते गिळी ॥ बेडुक मक्षीका कवळी ॥ तैसी मृत्युमुखी पडली विषय भुली झोंबती ॥३३७॥
अभंग -७
श्री नामदेव महाराज वाक्य--
शेवटली पाळी तेव्हां मनुष्यजन्म चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥
हेंचि जन्मीं ओळखी करा आत्माराम ॥ संसार सुगम भोगू नका ॥२॥
संसारी असावे असोनि नसावें ॥ कीर्तन करावे वेळो वेळां ॥३॥
नाम ह्मणे विठोभक्ताचिया द्वारी ॥ घेऊनिया करी सुदर्शन ॥४॥॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- सकळ देहामाजी पाहा हो अति दुर्लभ मनुष्यदेहो त्याचिया प्राप्तीचा संभवो ॥ तो अभिप्रायो अतिदुर्गम ॥२१४॥
तरावया भोळे भाळी जन ॥ मुख्य चित्तशुध्दीचे कारण ॥ जन्म कर्म हरिचे गुण ॥ करावे श्रवण अत्यादरे ॥५१६॥
अभंग -८
श्री तुकाराम महाराज वाक्य--
जिव्हा जाणे फिके मधुर कीं क्षार । येर मास पर हाता न कळी ॥१॥
देखवें नेत्री बोलावें मुखें ॥ चित्ता सुख दु:खे कळों येती ॥२॥
परीमळा घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नय ॥३॥
एक देहीभिन्न दावियेल्या कळा ॥ नाचवीं पुतळा सुत्रधारी ॥४॥
तुका ह्मणे ऐसी जयाची सत्ता ॥ कां तया अनंता विसरलती ॥५॥॥धृ०॥
ए०भा०अ०९ -- येथ आळसु जेणे केला । तो सर्वस्वें नागवला । थीता परमार्थ हातीचा गेला ॥ अवती पडला भवचक्री ॥३३८॥
ऐसें जाणोनि यदुराया । देहाचिया लवलाह्या ॥ परमार्थ साधावया ॥ ब्रह्मो पाया उद्यत व्हावें ॥३३९॥
अभंग -९
श्री एकनाथ महाराज वाक्य--
अभाग्य न भजती भगवती ॥ त्या पृथ्वी असे जडत्व देती ॥ जळे दीधली त्या अधोगती ॥ तेजे दिधली त्या संताप
वृत्ती ॥१॥
ऐसे कैसे नि भेटे भगवतु ॥ नरदेही मुकले नीज स्वार्थु ॥ जन्ममरणाचे भोगिती आवर्तु ॥ त्यासी विन्मुख होय
ह्र्दयस्तु ॥धृ०॥
वायुनें दिधले त्या चंचलत्वे ॥ नभे दिधले भाव शून्यत्वे ॥ महत्वें हारिले निजसत्वें ॥ माय दिधले त्या ममत्वे ॥३॥
सभोग भावे भगवंती ॥ त्यासी पृथ्वी देतसे निज शांति । जळे दिधली मधुर रस वृत्ती ॥ तेजे दिधली निज तेज प्रभादिप्ती ॥४॥
ऐसा सहजे प्रसन्न होय देवो ॥ जेणी सुताचा पालटे देहेभावो ॥ नीजी निजाचा वाढे निर्वाहो । जनी वि जनी अखंड ब्रह्म
भावो ॥५॥
वायु उपर नदे निश्वेलत्वे ॥ नभे दिधले त्या अलिप्तत्वे । महनत्वे दिधले शोधितसत्वे ॥ माये दिधले त्या सद्विद्या
परम तत्वे ॥६॥
एका जनार्दनी नीजभक्ती ते अलाभ्य लाभू होय प्रापी । भुते महाभुते प्रसन्न होती तेणें न भंगे ब्रह्मस्थिति ॥७॥
ए०भा०अ०२ -- जीवनी प्रवेशे । जग जीवन याकारणे अवरण तोची जाण । न शेषता उरे जीवन । हे लाघव पूर्ण हरिचे ॥९१॥
तेजाचे ठायी होऊनि रुप ॥ प्रवेशिला हारी सद्रुप ॥ यालागी नयनी तेज आमुप ॥ जठरी दैदीप्यें जठराग्नी जाहला ॥९२॥
रुप लवलाही हरि प्रवेशे तेजाच्या ठायी ॥ ते आवरण वायु माजी पाही । न मावळ कांही यालागी राया ॥९३॥
वायु माजी स्पर्शे योगे ॥ प्रवेशु कीजे श्री रंगे ॥ यालागी प्राण प्रयोगे ॥ वर्तची अंगे अनेक जीव ॥९४॥
वायुच्या ठायी ह्र्षीकेश ॥ स्पर्शे रुपे करी प्रवेश ॥ यालागी वायुचा ग्रास । सर्वथा आकाश करु न शके ॥९५॥
शुध्द गुणे हर्षकेश ॥ आकाशी करी प्रवेश ॥ यालागी भुतासी आवकाश सावकाश वर्तवावया ॥९६॥
शुध गुणे गगनी ॥ प्रवेशला चक्रपाणी ॥ यालागि ते निज करणी । लीन होऊनी जाऊन न शके ॥९७॥
महाभूती निरंतर ॥ स्वाभाविक नित्य वैर ॥ यरयराते ग्रासावया थोर ॥ अती तत्पर सर्वदा ॥९८॥
जळ वीरयु पाहे पृथ्वी ते ॥ तेज शोषू पाहे जळाते वायु प्रांशू पाहे तेजात ॥ आकाश वायु ते गीळु पाहे ॥९९॥
तेथें प्रवेशोनि श्रीधर । त्याते करुनीया निरवैर ॥ तेचि येरा माजी थेर ॥ उल्लासें नांदवी ॥१००॥
एवं पंच भुते साकारता ॥ आकारली भूता करता तेथें जीवरुपें वर्तता ॥ जाहला पै तत्वता प्रकृती संयोगे ॥१०१॥
यासी ब्रह्मांडी पुरुषें हे नांव पीडी त्याते ह्मणती जीव ॥ हा मायेचा निज स्वभाव ॥ प्रतीबिंबला देव जीव शिवरुपे ॥१०२॥
शिव जे योग माया विख्यांती जिवीतीते अविद्या ह्मणती । हेची मायेची मुख्येत्वें भ्रांती ॥ स्वप्नस्थिति संसारु ॥१०३॥
ईश्वराचे ह्मणती दीर्घ स्वप्न ॥ तो हा मायावी संसार संपूर्ण । निद्रेमाजी दिसे जे भान ते जिवाचे स्वप्न अविद्या योगे ॥१०४॥
येथे जागा जाहाल्या मीथ्ये स्वप्न ॥ बोधे जाहलीया मीथ्ये भवभान । हे अवघे मायेचे विदान ॥ राया तूं जाण निश्चित ॥१०५॥
अभंग -१०
श्री एकनाथ महाराज वाक्य--
गत ते आयुष्य गत तें धन । गत दृश्यमान पदार्थ तो ॥१॥
गत तें अंबर गत तो पवन । गत तें हवन गत होय ॥२॥
एका जनार्दनी अगत तें नाम । ह्मणोनि विश्राम योगीयांसी ॥३॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२२ -- गंधर्व नगरीं प्रचंड ॥ माडया सोपे उदंड ॥ क्षणा मारी विरस चड ॥ वात वितंड करी निर्वाळ ॥६२७॥
तेवी संसार हा काल्पनिक तेथील सुख आणि दु:ख । मिथ्या केवळ मायिक ॥ जाण निष्ठक निजभक्ता ॥६२८॥
अभंग -११
श्री एकनाथ महाराज वाक्य--
जें जें दिसें तें तें नासे ॥ अवघे वोसे जायाचे ॥१॥
नासिवंत सर्व काया । भेणे उपाया करा कांही ॥२॥
पदार्थ मात्र जातु असें कांही नसे आन दुजे ॥३॥
एका जनार्दनी सर्व वाव । धरा भाव विठठली ॥४॥
ज्ञा०अ०७ -- उदयास्ताचे लोंढें पाडीईत जन्ममरणाचे चोढे ॥ जेथ पांचभौतिक बुडबुडे ॥ होती जाती ॥७६॥
येथें एकचि लीला तरले जे सर्वभाव मजभजले ॥ तयां ऐलीच थडी सरलें ॥ मायाजळ ॥९७॥
अभंग -१२
श्री नामदेव महाराज वाक्य--
साठी घडी माजी । एक वेची देव काजी ॥१॥
आराणुक सारुनि काजी सर्वभावे केशव पूजी ॥२॥
हेंचि भक्तीचें लक्षण ॥ संतोषला नारायण ॥३॥
कोटीकुळे पावन तुझीं । नामा ह्मणी भाक माझी ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१ -- कैसे कर्म समगळू ॥ कानी पडतांचि आळूमाळु नासोनियां कर्मळु ॥ जाती तत्काळु श्रवणादरें ॥३०२॥
श्रवणें उपजे सद्भावो । सद्भावें प्रगटे, देवो तेणें निर्दळे अहंभवो । ऐसी, उदार पहाहो हरिकीर्ति ॥३०३॥
अभंग -१३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
संतांचिया पायी हा माझा विश्वास ॥ सर्वभावें दास झालों त्यांचा ॥१॥
तेचि माझें हित करिती सकळ ॥ जेणें हा गोपाळ कृपा करी ॥२॥
भागलिया मज वाहात्तील कडे त्याचियानें जोडे सर्व सुख ॥३॥
तुका ह्मणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिलें ते ॥४॥ ॥धृ०॥
भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाटाचे--मागणे हे एक तुजप्रती ।
भजन--ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद--पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजाआरती --
१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२ चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
मागील मालिकेप्रमाणे म्हणावे
पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम
N/A
References : N/A
Last Updated : December 06, 2019
TOP