मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| मालिका ६ षष्टी ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक मालिका ६ षष्टी श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaymarathiज्ञानोदयभजनमराठी श्रध्दा अश्रध्देचे विचार Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥(॥ रुप पाहातां लोचनी॥ ) आणि (॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)अभंग -१श्री तुकाराम महाराज वाक्य--करणे ते हेंचि करा ॥ नरका अघोरा कां जातां ॥१॥जयामध्यें नारायण ॥ शुध्द पुण्य तें एक ॥२॥शरणांगतां देव राखे ॥ यरां वाखे विघ्रांचे ॥३॥ तुका ह्मणे लीन व्हावे । कळे भावें वर्म हे ॥४॥ए०भा०अ०२ -- जेथें सप्रेम नाही माझी भक्ती ॥ तेथे कर्मे अवश्य बाधिती । कर्मास्तव अन्यथा गती अभक्त पावती उध्दवा ॥४०९॥ए०भा०अ०९ -- देहसुखाचिया चाडा । पडे पर गृहाचे खोडा ॥ दार गृहलोभे केला वेडा । न देखे पुढा निज स्वार्थु ॥३०९॥एव इंद्रियाशी विषयासक्ती ॥ तेणे वासना दृढ होती ॥ त्या देह देहांतरा प्रती । पुरुषाशी नेती सर्वथा ॥३१९॥यालागी करवया विषय त्यागु ॥ अवश्य छेदावा देहसंगु ॥ ईये आर्थी मनुष्यदेह चांगु । ज्ञान विभागु या देही ॥३२०॥अभंग -२श्री एकनाथ महाराज वाक्य--भक्ति वे उदरी जन्मले ज्ञान । भक्तीनें ज्ञानासी दिधले महि मान ॥१॥भक्ती ते मुळ ज्ञान तें फळ । वैराग्य केवळ तेथीचे फुल ॥२॥फूल फळ दोन्ही येरयेरां पाठीं । ज्ञान वैराग्य तेवि भक्तीचे पोटी ॥३॥भक्तीविण ज्ञान गिवसिती वेडे ॥ मूळ नाहीं तेथें फळ केविं जोडे ॥४॥भक्तीयुक्त ज्ञान तेथें नाही पतन भक्ती माता तया करितसे जतन ॥५॥शुध्दभक्तिभाव तेथें तिष्ठे देव ॥ ज्ञानासीतो ठाव सुखवस्तीसी ॥६॥शुध्दभाव तेथे भक्तियुक्त ज्ञान तयाचेनी अंगे समाधी समाधान ॥७॥एका जनार्दनी शुध्द भक्तीक्रिया ॥ ब्रह्मज्ञान त्यांच्या लागतसे पायां ॥८॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०९ -- भक्त माझियाकडे दावी । आणि मी दोन्ही हात बोडवी ॥ मग देंठ न फोडितां सेवी आदरेसी ॥३८३॥हे सांगावे काय किरीटी । तुवाची देखिले आपुलीया दिटी । मी सुदाम याचिया सोडी गांठी पहावया लागी ॥३९४॥पै भक्ती एकी मी जाणे ॥ तेथ सान थोर न ह्मणे आम्ही भावाचे पाहुणे ॥ भलतेया ॥३९५॥अभंग -३श्री एकनाथ महाराज वाक्य--सोंगें छंदें कांही ॥ देव जोडे ऐसें नाही ॥१॥सारा अवघें गाबाळ ॥ डोळ्या आडील पडळ ॥२॥शुध्द भावावीण जो जो केला तो तो सीण ॥३॥तुका ह्मणे कळे परी होताती आंधळे ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- येथें भावेंवीण तत्वता ॥ परमार्थ नये हाता ॥ सकळ साधनांचे माथा ॥ जाण तत्वता सद्भावो ॥७७०॥अभंग - ४श्री तुकाराम महाराज वाक्य--चिरगुटें घालुनी वाढविले पोट । गर्हवार बोभाट जनामध्यें ॥१॥लटिकेचि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनी पोर पोटी नाही ॥२॥तुका ह्मणे अंती वांचचि ते खरी फजिती दुसरी जनामध्यें ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- सद्भाव नाही अंतरी ॥ ब्रह्मभक्ती भावेची करी । ते भावानुसारे संसारी ॥ नाना परी स्वयें ठकती ॥४४८॥ठकले ते मनुष्यगती ॥ ठकले ते निजस्वार्थी ॥ ठकले ते ब्रह्मप्राप्ती । दंभे हरिअभक्ती कदां नुपजे ॥७७९॥अभंग -५श्री तुकाराम महाराज वाक्य--फोडुनि सांगडी बांधीली पाटीसी ॥ पैलथडी कैसी पाये सहजी ॥१॥आपला घात आपणची करी आणिक सांगतां नाइके तरी ॥२॥भुके भेणी विष घेऊं पाहे आतां ॥ आपल्याचि घाता करु पाहे ॥३॥तुका ह्मणे एक चालतील पुढें ॥ तयांसी वांकडे जातां ठके ॥४॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०१८ -- नाना उसांची कणसें का नपुसकें माणसें ॥ वन लागले जैसे ॥ सावरीच ॥५७६॥ज्ञा०अ०९ -- तैसे ज्ञानजात तयां ॥ आणि जे कांही आचरले गा धनंजया । ते अघवेंचि गेले वाया । जे चित्तहीन ॥७८॥आवचटे आ साधु संगती ॥ जोडल्या वाटे विषयासक्ती ॥ तेण उटी आधर्म रीती ॥ विवेक स्फूर्ति घाताक ॥४५॥वाढल्या विषयासक्ती ॥ आंध होय ज्ञानस्फूर्ति ॥ आपण आपली न देखे गती । जेवी आंधळि राती आंधळेंची ॥४६॥अभंग - ६श्री तुकाराम महाराज वाक्य--इंद्रियासी नमेनाही मुखी राम ह्मणोनि कांई ॥ जेवी मासी सवें अन्न ॥ सुख नेदी तें भोजन ॥२॥कीर्तन करावें ॥ तैसें करुनि दावावें ॥३॥ही तों अंगी नाही चिन्ह गाईले वेश्येच्या ढव्यानें ॥४॥तुका ह्मणे रागा । संत शिवूं ने दिती अंगा ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२५ -- चित्तवृत्ती क्रियचरण ॥ त्या नांव गा कर्म जाण ॥ तेथ निरपेक्ष तें माझे भजन ॥ स्वधर्म संपूर्ण या नांव ॥१६२॥अंतरी अनिवार कामना ॥ बाह्य विरक्ती दावी जना ॥ ते सहवया विटंबना ॥ त्याग विचक्षणा तो नव्हे ॥५४॥अभंग -७श्री तुकाराम महाराज वाक्य--विषयांचे लोलिंगत ॥ ते फजीत होतील ॥१॥न सरे तेथे यातिकुळ ॥ शुध्द मूळ बीज व्हावें ॥२॥शिखा सुत्र सोंग वरी ॥ दुराचारी दंड पावे ॥३॥तुका ह्मणे अभिमान ॥ नारायन न सोसे ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२२ -- विषयांचे गोडपण । ते विखहुनि दारुण ॥ विष एकदा आणि सरण ॥ पुन: पुन: मरण विषयाचे ॥१६१॥पुढती जन्म पुढती मरण ॥ संसाराचे सबळ । विषयाधीन उध्दवा ॥१६२॥ज्ञा०अ०८ -- जे विषयासी तिळांजळी देऊनी ॥ प्रवृत्ती वरी निगड वाउनी ॥ माते ह्र्दयी सुनी ॥ भोगिताती ॥१२४॥अभंग - ८श्री तुकाराम महाराज वाक्य--धाई अंतरीच्या सुखें ॥ काय बडबड वाचा मुखें ॥१॥विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभव गोडी ॥२॥वाढे तळमळी उभयतां ॥ नाही देखिले अनुभवितां ॥३॥आपुल्या मतें पिसें ॥ परी तें आहे जैसें तैसे ॥४॥साधनाची सिध्दी ॥ मौन करा स्थिर बुध्दि ॥ तुका ह्मणें वादें ॥ वायां गेली ब्रह्मवृंदे ॥५॥ए०भा०अ०१७ -- माझा भाव नाही जिव्हारी ॥ अहच वाहाच माझी भक्ती करी ॥ तो आंधळ्या गारुडयाचे परी उडे परी निर्धारी स्थन नेणें ॥११८॥माझा भावार्थ जेथे होये ॥ तेथ मी जाती कुल न पाहे ॥ मी भावाचेनि लवलाहे ॥ वश्य होये निजभक्ता ॥११९॥ अभंग -९श्री नामदेव महाराज वाक्य--चंद्र सूर्यादी बिंबे लिहिताती सांग ॥ परि प्रकाशाचे अंग लिहितां नये ॥१॥सन्यासाची सोंगे अणिताति सांग ॥ परि वैराग्याचें अंग नये ॥२॥नामा ह्मणे कीर्तन करिताति सांग । प्रमाचे तें अंग आणितां नये ॥३॥ ॥धृ०॥ए०भा०अ०१ -- संन्यास घेतां पूर्वदृष्टी । जें वैराग्य होतें पोटी ॥ ते संन्यास घेतल्या पाठी ॥ उठाउठी पळालें ॥२९१॥ज्ञानेंद्रियें पांच सहावें मन । हेचि अरि षड्वर्ग जाण । यांचे न करितां निर्दळण ॥ संन्यासपण विटंबू ॥२९२॥अभंग -१०श्री नामदेव महाराज वाक्य--बाळ वृध्द तरून काया हे जर्जर ॥ वेगी हा पाम्र अळशी झाला ॥१॥काय करुं देवा नाही यासि भावो । न करि हा उपावो तुझ्या भजनी ॥२॥मन ठेवी ठायीं रंगे तूं श्रीरंगीं ॥ गोष्टी त्य वाउगी बोलूं नको ॥३॥नामा ह्मणे श्रीरंगु चित्ती पां चोखडा ॥ उघडा पोवाडा सांगितला ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- तैसें नरदेहा येऊनि नरा ॥ करीताति आयुष्याचा मातेरा ॥ पूर्ण व्यवसाय शिश्नोदरा ॥ उपहस निद्रा कां निंद्रा ॥२५॥अभंग - ११श्री नामदेव महाराज वाक्य--अद्वैत सुख कैसोनि आतुडे ॥ जंववरी न संडे मीतुंपण ॥१॥शुध्द चित्रकथा सांगती पाल्हाळ ॥ मन नाही केवळ विठठलदेवी ॥२॥अणुचे प्रमाण असातां दुजेपण ॥ मरुते समान देईल दु:ख ॥३॥नामा ह्मणी सर्व आत्मरुप पाही ॥ तरीच ठायीच्याठायीं निवशील ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- जेवी कां भुकेलिया पाशी ॥ ताट वाढिले षड्सी ॥ तो पुष्ठी तुष्टी क्षुधानासी । जेवी ग्रासो ग्रासी स्वयेचि पावे ॥६०२॥जितुका जितुका घेईजे घास ॥ तितुका तितुका क्षुधेनाश ॥ तितुकाची पुष्टी विन्यास ॥ सखो उल्हास तितुकाची ॥६०३॥अभंग -१२श्री तुकाराम महाराज वाक्य--खोटयच विकरा ॥ येथें नव्हे कांच हिरा ॥२॥काय दावायचें काम ॥ उगाच वाढवावा श्रम ॥२॥परीक्षकांविण ॥ मिरवों जतां ते तें हीण ॥३॥तुका पायां पडें ॥ वाद पुरे हे झगडे ॥४॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०९ -- कां रुपवयसा माजा ॥ आथिलेपणें कागाना ॥ एक भाव नाही माझा ॥ तरी पाल्हाळ ते ॥४३२॥कणेवीण सोपटें ॥ कणसें लागली घनदाटें ॥ काय करावें गोमटे ॥ वोस नगर ॥४३३॥अभंग - १३श्री तुकाराम महाराज वाक्य--निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म ॥ निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥निष्कमनिश्वळ विठठली विश्वास ॥ पाहो नये वास आणि कांची ॥२॥तुका ह्मणे ऐसा कोण उपेक्षिला ॥ नाही ऐकिला ऐसा कोणी ॥३॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०१२ -- ऐसा बोधुची केवळ ॥ जो होऊनी असे निखळु ॥ त्याही वरी भजन शीळु ॥ माझ्या ठायी ॥१९५॥तरी तया ऐसें दुसरें ॥ आम्हां पढयिते सोयरे ॥ नाही गा साचो कारे । तुझी आण ॥१९५॥अभंग -१४श्री एकनाथ महाराज वाक्य--भावापुढें बळ ॥ नाही कोणाचें सबळ ॥१॥करी देवा वरी सत्ता । कोण त्याहुनि परता ॥२॥बैसे तथें येती ॥ न पाचारितां सर्व शक्ती ॥३॥तुका ह्मणें राहे ॥ तया कडे कोण पाहे ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- तेवी भक्तीचिया प्रेमप्रीती ॥ ह्र्दयीं कोंडिला श्रीपती ॥ तेथें खुंटल्या सामर्थ्यशक्ती ॥ भावर्थ प्रती बळ न चलें ॥७७५॥अभंग -१५श्री एकनाथ महाराज वाक्य--भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा ॥ अभिमान नित्य नवा तया माजी ॥१॥प्रेमसुख देई प्रेमसुख देई ॥ प्रेमविण नाही समाधान ॥२॥रांडवेनें जेवी शृंगारु केला ॥ प्रेमाविण झाला ज्ञानी तैसा ॥३॥एका जनार्दनी प्रेम अति गोड ॥ अनुभवी सुखाड जाणतील ॥४॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०१२ -- यावे उत्तमासी मस्तक । खालाविजे हे काय कौतुक ॥ परी मानु करीती तीन्ही लोक ॥ पायवणीया ॥२१५॥तरी श्रध्दा वस्तुसी आदरु ॥ करीता जाणीजे प्रकार ॥ जरी होय श्रीगुरु ॥ सदाशीवु ॥२१६॥अभंग - १६श्री ज्ञानदेव महाराज वाक्य--सुची अंबुल ज्ञान घाराचचु ॥ भक्ति हे साकारु आवडली ॥१॥काय सांगू माये निर्गुण अंबुला ॥ शून्यीं मिळाला नाही ठाई ॥२॥ ॥धृ०॥ रखुमादेवी वरु साकार अंबुला । मज पर्ण आला बाईयांनो ॥३॥॥धृ०॥ ए०भा०अ०२ -- ह्मणा तेवी निजभक्त लळेवाड ॥ त्यांचे प्रेम अत्यंत गोड ॥ निघावयाची विसरोनिचाड ॥ ह्र्दयीसुखाड मानी हा ॥७७७॥अभंग - १७श्री तुकाराम महाराज वाक्य--तुमचिये दासाचा दास करु नि ठेवा ॥ आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥नवविधा काय बोलिली जे भक्ती ॥ घ्यावी माझ्या हाती संतजनी ॥२॥तुका ह्मणी तुमच्या पायांच्या आधारें ॥ उतरेन पार भवनदी ॥३॥ ॥धृ०॥ ज्ञा०अ०१२ -- जेणें मी प्रीती करील कामनी शरिसा धरी ॥ एवढी थोरी ॥ जयास्थितीये ॥२२९॥भजन श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥आरत्या ---१ झाले समाधान । तुमचे देखि० २ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी० ३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन ---घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥अभंग नाटाचे-- मागणे हे एक तुजप्रती ।भजन--ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम प्रसाद--पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥शेजआरती --१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार २ चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम N/A References : N/A Last Updated : December 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP