स्कंध ५ वा - अध्याय २५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१४९
पाताळाच्या खालीं त्रिंशति सहस्त्र । योजनें अनंत नागश्रेष्ठ ॥१॥
दृश्य-द्रष्टयाचें तो करी आकर्षण । तामसी ते जाण प्रभुकला ॥२॥
राईंसम त्याच्या मस्तकीं हे धरा । इच्छितां संहारा भ्रुकुटी भंगी ॥३॥
तदा संकर्षण रुद्र तैं प्रगटे । वर्णन शेषाचें अपूर्वचि ॥४॥
नाग नागकन्या वंदिती तयासी । नील वस्त्र त्यासी शोभा देई ॥५॥
वैजयंती माळ शोभे त्याच्या कंठीं । अभिमानग्रंथि स्तवितां सुटे ॥६॥
वासुदेव म्हणे ब्रह्मसभेमाजी । नारद वर्णिती शेषाप्रति ॥७॥

१५०
अवलोकी शेष यदा त्रिगुणांसी । तदा उत्पत्त्यादि योग्यता त्यां ॥१॥
अनादि अनंत शेष भगवान । अघटित कर्म भक्तांस्तव - ॥२॥
करी, पाहून तें सिंह शिके शौर्य । करितां नामोच्चार पाप हरे ॥३॥
सर्वाधारासी त्या त्याचाचि आधार । धरा चल स्थिर त्याच्यायोगें ॥४॥
राया, कर्मासम फल हें तात्पर्य । कथी वासुदेव पुढती ऐका ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP