मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय १२ वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय १२ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय १२ वा Translation - भाषांतर ७२राव म्हणे मुने, प्रत्यक्ष तूं ज्ञान । देहावरी भान नसे तुझें ॥१॥वेष हा अपूज्य अनादरकारी । भाषण निवारी सकल ताप ॥२॥तत्त्वांशी संबंध नसे व्यवहाराचा । वदलासी त्याचा अर्थ कथीं ॥३॥मुनि म्हणे राया, मृत्तिकेच्या स्कंधीं । विराजली माती पालखी ते ॥४॥रहुगुणनामें मृत्पिंडचि एक । बैसविला त्यास म्हणती राव ॥५॥पिंडावरी तया ठेवूनि अभिमान । राव मी म्हणून तुष्ट होसी ॥६॥वाहकांसी पीडा देऊनि पालक । प्रतिष्ठा हे व्यर्थ धरिसी नृपा ॥७॥वासुदेव म्हणे नि:स्पृह सर्वज्ञ । मुनींचें भाषण दिव्यांजन ॥८॥७३राया, सदय तूं अथवा निर्दय । करुनि विचार ठरवीं मनीं ॥१॥स्थावर जंगम पार्थिव हें सर्व । पावतें विलय पृथ्वीमाजी ॥२॥नामरुपाविण अन्य काय असे । केंवी व्यवहारातें सत्य मानूं ॥३॥पृथ्वी परमाणु सर्वचि हे माया । भ्रमामाजी जीवा पाडीतसे ॥४॥राया, एक आत्मज्ञान मात्र सत्य । महत्संगें लाभ घडे ज्याचा ॥५॥पुण्यकथागानीं दंग जे सर्वदा । निवृत्त सद्भक्तां करिती तेचि ॥६॥वासुदेव म्हणे मुनि नृपाळासी । चरित्र कथिती आपुलेंचि ॥७॥७४राया, विषयासक्त मन । भ्रष्ट करील हें जाण ॥१॥योगीयांसीही आसक्ति । भ्रष्ट करील हे चिंतीं ॥२॥राया, माझें पूर्ववृत्त । असे विस्मयकारक ॥३॥धरिली मृगाची आसक्ति । तेणें मृगदेहप्राप्ति ॥४॥आठवती पूर्वजन्म । कृष्णभक्तीनें ते जाण ॥५॥तेणें जनसंसर्गाची । नित्य मानीतसें भीति ॥६॥यास्तवचि ऐसा वेष । नृपश्रेष्ठा, रुचे मज ॥७॥नित्य साधुसमागम । तेंवी सत्कथाश्रवण ॥८॥करुनि व्हावें जीवन्मुक्त । वासुदेव ऐके बोध ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP