मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १ ला| अध्याय १५ वा स्कंध १ ला अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध १ ला - अध्याय १५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १ ला - अध्याय १५ वा Translation - भाषांतर ९७विप्रांलागीं सूत म्हणे अर्जुनाची । तत्कालीन स्थिति वर्णवेना ॥१॥महाकष्टें शोक आंवरुनि नेत्र । पुशीत पुशीत निज करानें ॥२॥वियोगविव्हल आठवी तें प्रेम । सद्गदवचन वदला धर्मा ॥३॥राया, मी जाहलों सर्वस्वी वंचित । एकाकी अच्युत त्यजूनि गेला ॥४॥विबुधविस्मयकारी माझें तेज । हरिलें समस्त श्रीहरीनें ॥५॥प्राणरहित तो पित्याचाही देह । होई अमंगल जैशापरी ॥६॥तैसें कृष्णावीण सकल हें विश्व । म्हणे वासुदेव पार्था दिसे ॥७॥९८वर्णूं तरी केंवी त्याचे उपकार । सभेमाजी यंत्र भेदियेलें ॥१॥हरुनियां दर्य क्षत्रिय वीरांचा । लोभ द्रौपदीचा, त्याची कृपा ॥२॥खांडववन तें अर्पिले अग्नीसी । जिंकूनि इंद्रासी त्याची कृपा ॥३॥रक्षितां मयासी मयसभा तेणें । निर्मिली प्रेमानें त्याची कृपा ॥४॥राजसूयामाजी पांडव वीरांनीं । जिंकीली अवनी त्याची कृपा ॥५॥भीमपराक्रमें जरासंधवध । होतां नृप मुक्त त्याची कृपा ॥६॥वासुदेव म्हणे भक्तांची सत्कीर्ति । वाढवी त्रिलोकीं त्याची कृपा ॥७॥९९अवभृथस्नानें पवित्र ते केश । ओढितांचि लाज राखियेली ॥१॥अपरात्रीं ऋषि भोजनार्थं वनीं । येतां चक्रपाणी रक्षी आम्हां ॥२॥पाशुपतप्राप्ती इंद्रासनलाभ । गांडीव धनुष्य जयामुळें ॥३॥भीष्मद्रोणादिक महामत्स्य जेथ । एकाकी समुद्र लंघिला तो ॥४॥प्रल्हादासमचि रक्षिलें आम्हांतें । आंवरुनि अस्त्रें अमोघ तीं ॥५॥अश्वांसी उदक पाजितां रणांत । रक्षिलें समस्त वीरांमाजी ॥६॥वासुदेव म्हणे सकळ विक्रम । व्यर्थ कृपेवीण वदला पार्थ ॥७॥१००इंद्रादिक देव वंदिती जयासी । सारथी मी त्यासी हाय केलें ॥१॥धिक्कार धिक्कार मज मूढाप्रति । सामान्य मी त्यासी लेखियेलें ॥२॥सख्या, पार्था ऐसें संबोधी जो मज । कोठें अधोक्षज पाहूं आतां ॥३॥आसन, शयन, भोजन एकत्र । कोठें माझा मित्र पाहूं आतां ॥४॥क्वचितकाळीं मजवांचूनि जेवतां । प्रेमें धिक्कारितां रुसला नाहीं ॥५॥अपराध माझे असंख्य जयानें । क्षमिलें प्रेमानें पित्यासम ॥६॥वासुदेव म्हणे प्रेमाची हे कळा । तुजविण गोपाळा कोण जाणे ॥७॥१०१पार्थ म्हणे राया, मीचि तो अर्जुन । जेणें भीष्म द्रोण जिंकियेले ॥१॥श्रीकृष्णवियोगें विक्रम तो माझा । झाला शून्य आतां लवही नुरे ॥२॥तेंचि माझें चाप, बाण, अश्व, रथ । राया, आजि व्यर्थ सकल झाले ॥३॥श्रीकृष्णस्त्रियांचे रक्षण न झालें । स्त्रीसम जिंकिलें मज गोपांनीं ॥४॥परस्परांप्रति ताडूनि लव्हाळे । यादव संपले ब्रह्मशापें ॥५॥मात्स्ययानें वधी दुर्बला-बलवंत । परस्पर नाश करिती वीर ॥६॥राया कृष्णबोध चिंतितों मी आतां । कुंठित हे वाचा होई माझी ॥७॥वासुदेव म्हणे आंवरुनि शोक । कृष्णचिंतनांत रमला पार्थ ॥८॥१०२सूत म्हणे पार्थ श्रीहरीचा भक्त । स्मरुनि कृष्णास शांति मानी ॥१॥काम-क्रोध त्याचे सकल विराले । आवरण गेलें अज्ञानाचें ॥२॥गीताज्ञानवृक्ष वाढला जोमानें । ब्रह्मभाव ज्ञानें प्रगट झाला ॥३॥गुण, गुणकार्य जाहलें विनष्ट । हरपलें द्वैत अंतरींचें ॥४॥ऐसा शोकहीन पाहूनि पार्थासी । धर्म मार्गे त्याचि जाऊं म्हणे ॥५॥आंवरुनि वृत्ति कुंती त्यागी देह । म्हणे वासुदेव कृष्ण स्मरा ॥६॥१०३कंटकानें जैं कंटक । तेंवी वीर भारभूत ॥१॥वधिले श्रीहरीनटानें । केलें कौतुक लीलेनें ॥२॥कार्य संपतांचि गेला । स्वस्वरुपीं स्थिर ठेला ॥३॥नाना नाटकी श्रीहरी । भक्तकाज ऐसें करी ॥४॥वासुदेव म्हणे देव । राहो अंतरीं सदैव ॥५॥१०४निजधामाप्रति जातां यदुनाथ । जाहला प्रवृत्त कलि एथें ॥१॥परीक्षितीप्रति अर्पूनि स्वराज्य । अनिरुद्धपुत्र मथुराधिप ॥२॥प्राजापत्य इष्टि करुनि अग्नीचा । समारोप साचा करीतसे ॥३॥पुढती निर्मम तेंवी निरहंकार । होऊनि नृपाळ सदना त्यजी ॥४॥मागोमाग त्याच्या द्रौपदी, भीमादि । सकलही जाती पांडववीर ॥५॥वासुदेव म्हणे युधिष्ठिर ऐसा । संयमूनि वाचा निघूनि जाई ॥६॥१०५उत्तर दिशेसी वीर ते कृतार्थ । श्रीकृष्ण चिंतीत क्रमिती मार्ग ॥१॥त्यागूनियां देह पुनीत जाहले । सद्गति लाभले भावबळें ॥२॥प्रभासीं विदुर पावला मोक्षासी । कथा हे जनांसी मोक्षप्रद ॥३॥प्रेमें हें ऐकतां ईशपदी प्रेम । जडूनियां, जन्म सार्थ होई ॥४॥वासुदेव म्हणे पावन चरित्रें । ऐकतां जीवातें समाधान ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP