मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १ ला| अध्याय ६ वा स्कंध १ ला अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध १ ला - अध्याय ६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १ ला - अध्याय ६ वा Translation - भाषांतर ४२व्यास नारदांसी मज वृत्त । कथावें समस्त घडलें जें तें ॥१॥कंठियेलें केंवी पुढील आयुष्य । पूर्वजन्मवृत्त स्मरतें केंवी ॥२॥कथावें तें सर्व कृपाळु होऊनि । व्यासा घेई ध्यानीं म्हणती मुनि ॥३॥एकुलता एक होतों मी मातेसी । पाळी ती मजसी अति प्रेमें ॥४॥योगक्षेमभार घ्यावा ऐसें इच्छी । शक्य तें तिजसी नव्हतें परी ॥५॥काष्ठपुतळी ती जेवीं पराधीन । तैसेंचि जीवन मानवाचें ॥६॥वासुदेव म्हणे ठेवील अनंत । तैसें या जगांत बसणें प्राप्त ॥७॥४३दुग्धदोहनार्थ जातां एके वेळीं । माता निवर्तली सर्पदंशें ॥१॥इष्टचि हे पाश तुटतां भक्तांसी । गेलों उत्तरेसी त्यजूनि स्थान ॥२॥पर्वत वनें तैं लंघूनियां देश । पाहिला प्रदेश एक रम्य ॥३॥श्रांत होऊनियां उदक प्राशूनि । बैसलों काननीं ध्यानालागीं ॥४॥कंठ रुद्ध झाले रोमांच ठाकले । अश्रुपूर आले नयनांतूनि ॥५॥प्रगटला चित्तीं कृष्णभगवान् । जाहलों मी धन्य दर्शनें त्या ॥६॥वासुदेव म्हणे कृपाळू श्रीहरी । संकटांत तारी सद्भक्तांसी ॥७॥४४पुढती एकाएकीं हृदयस्थ कृष्ण । पावे अंतर्धान तया वेळीं ॥१॥आर्तपणें तदा खिन्न मी जाहलों । अतृप्त राहिलों दर्शनानें ॥२॥वारंवार यत्नें आंवरुनि चित्त । बैसलों वनांत ध्यानमग्न ॥३॥पुनरपि व्हावें दर्शन हे इच्छा । कानावरी वाचा पडली तदा ॥४॥वासुदेव म्हणे आर्त भक्तांप्रति । संकटीं श्रीपती रक्षीतसे ॥५॥४५कर्णी आली नभोवाणी । बाळा, वचन घेईं ध्यानीं ॥१॥पुनर्दर्शन न तुज । आड येई हें शूद्रत्व ॥२॥भोगें पातक संपतां । सिद्ध होई एकाग्रता ॥३॥अन्यथा न सिद्ध ध्यान । दिधलें एकदां दर्शन ॥४॥हेतु वाढावी उत्कंठा । जेणें लाभ घडे मोठा ॥५॥जन्म भक्ताचा पावसी । पूर्वस्मरणयुक्त होसी ॥६॥वासुदेव म्हणे ऐसी । वाणी नारद निवेदी ॥७॥४६नभासम सर्वव्यापी परमात्मा । दुर्ज्ञेयत्व जाणा तैसेंचि त्या ॥१॥कृपा ऐसी तेणें करितां सर्व लाज । त्यागूनियां छंद धरिला त्याचा ॥२॥अनासक्तचित्तें नाम त्याचें गात । हिंडलों सर्वत्र भूमंडळीं ॥३॥अंतीं देह नष्ट होतां मुक्त झालों । श्वासासवें गेलों ब्रह्मोदरीं ॥४॥लोटलीं सहस्त्र महायुगें ऐसीं । जन्मलों मरीचि आदींसवें ॥५॥वासुदेव म्हणे नारद यापरी । निवेदन करी जन्मवृत्त ॥६॥४७अस्खलित ब्रह्मचर्यादिक व्रतें । पाळीत त्रैलोक्यें हिंडतसें ॥१॥अकुंठित माझी गतीहि सर्वत्र । नाद स्वत:सिद्ध वीणेचा या ॥२॥ईशदत्त वीणा ठेवूनियां स्कंधीं । हिंडतों श्रीरंगीं रंगूनियां ॥३॥आतां नित्य माझ्या हृदयीं मुकुंद - । दर्शनाचा लाभ सर्वकाल ॥४॥व्यासप्रश्नोत्तरें निवेदूनि ऐसीं । नारद व्यासांसी स्फूर्ती देती ॥५॥वासुदेव म्हणे स्वानुभवाविण । सकलही शीण साधनांचा ॥६॥४८घेऊनि निरोप सप्रेम व्यासांचा । नारद सुखाचा क्रमिती मार्ग ॥१॥ब्रह्मवीणा स्कंधीं टाकूनि यथेच्छ । लुटिती आनंद भजूनि ईश ॥२॥अहो धन्य धन्य देवर्षि नारद । शार्ड्गपाणीछंद जयालागीं ॥३॥ईशगुणगानें तेंवी वीणानादें । आतुर जगातें रंजवीती ॥४॥वासुदेव म्हणे भक्तप्रिय हरी । भक्तांवरी धरी कृपाछत्र ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP