मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १ ला| अध्याय १२ वा स्कंध १ ला अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध १ ला - अध्याय १२ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १ ला - अध्याय १२ वा Translation - भाषांतर ८०सूतालागी प्रश्न करिती शौनक । परीक्षितवृत्त सकळ कथा ॥१॥चरित्र तयाचें तेंवी ब्रह्मबोध । केंवी परलोक लाभला त्या ॥२॥सूत म्हणे धर्मा, क्षुधितासी अन्न । तैसाचि श्रीकृष्ण सकलां प्रिय ॥३॥गर्भांतचि सूक्ष्मरुपें भगवान । करीं संरक्षण, सभोंवतीं - ॥४॥पाहूनि, तयातें कोण ऐसें वाटे । संरक्षूनि मातें गुप्त होई ॥५॥सुदैवें सुवेळीं जन्मला बालक । नाम ‘विष्णुरात’ ठेविलें त्या ॥६॥वासुदेव म्हणे बहु दानधर्म । करुनियां धर्म संतोषला ॥७॥८१धर्मप्रश्ने विप्र कथिती जातक । प्रजासंरक्षक बालक हा ॥१॥मनुपुत्र इक्ष्वाकूचि हा प्रजेसी । रामचि विप्रांसी, दाता शिवि ॥२॥यज्ञकर्ता जेंवी दुष्यंताचा पुत्र । धनुर्धारी वीर पार्थचि कीं ॥३॥अग्नि, सागर तैं हिमाचल बलि । बाळ क्षमाशाली भूमीसम ॥४॥प्रजाहितदक्ष प्रजेचा पालक । निग्रहकारक कलीप्रति ॥५॥अंती मृत्युवृत्त ऐकूनियां ज्ञान । शुकोक्त लाभून मुक्ति पावे ॥६॥वासुदेव म्हणे कथूनियां ऐसें । विप्र स्वस्थळातें निघूनि जाती ॥७॥८२सूत म्हणे ऐका बाळपणीं बाळ । परीक्षी सकळ जनांप्रती ॥१॥संरक्षिले जेणें कोठें तो दिसे कीं । नांव ‘परीक्षिती’ पडले तेणें ॥२॥असो, ज्ञातिवधपापें धर्मराज । सज्जला यज्ञार्थ नाइलाजें ॥३॥हिमगिरींतूनि मरुत्ताचें धन । आणूनियां तीन यज्ञ करी ॥४॥ऐसें ईश्वरासी करुनि संतुष्ट । कृष्णाज्ञेनें राज्य करी धर्म ॥५॥पांडवांच्या प्रेमें श्रीकृष्ण त्या स्थानीं । राहियेला कांहीं मास प्रेमें ॥६॥वासुदेव म्हणे पुढती श्रीकृष्ण । अर्जुना घेऊन स्वगृहीं गेला ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP