फाल्गुन वद्य ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


"बाई ! मला उन्हाळ करित्येस ?"

शके १६७५ फाल्गुन व. ११ रोजीं मल्हारराव होळकरांचे एकुलते एक पुत्र, प्रसिद्ध अहल्यादेवीचे पति खंडेराव होळकर यांचें निधन झालें. खंडेराव यांचा जन्म शके १६४५ च्या विजयादशमीस झाला. खंडोबा हें होळकरांचें दैवत असल्यामुळें मल्हाररावांनीं मुलाचें नांव खंडेराव असें ठेविलें. शके १६५५ मध्यें यांचें देवी अहल्येशी लग्न झालें. अहल्याबाई व खंडेराव यांच्यांत दुर्दैवानें असावें तेवढें सख्य नव्हतें. खंडेराव व्यसनी असल्यामुळें सत्त्वशील अहल्येला जीवित कष्टमय स्थितींत काढावें लागलें. पतिसुख तिच्या नशिबांत एकंदर नव्हतेंच. शके १६७५ मध्यें मराठ्यांनीं डीगजवळील कुंभेरीच्या किल्ल्यास वेढा घातला. खंडेराव होळकर या वेळीं लढाईंत होते. तरी व्यसनामुळें त्यांच्या हातून नीट काम होत नसे. वेढा चालू असतांनाच "भोजन करुन खंडेराव मोर्चियांत निशाणापाशीं आला. तों एकाएकीं प्रळयवीज पडते तैसें होऊन गतप्राण पडला !" मल्हाररावांच्या एकुलत्या एक पोराच्या निधनानें ते तर वेडेच झाले. त्यांतून अहल्या सती जाण्याच्या तयारीस लागली. त्या वेळीं सुभेदार बोलले, "बाई, मला उन्हाळ करित्येस कीं काय ? तूं माझे पाठीवर आहेस, तर अहल्या मेली व खंडू आहे मला भरंवसा." आणि अहल्याबाईनेंहिइ सहगमनाचा विचार दूर केला. पतिनिधनानंतर अहल्याबाईनें आपलें जीवित धर्मकृत्यें करुन पुण्याईनें राज्यकारभार करण्यांत घालविलें ! खंडेरावांच्या मृत्यूमुळें मल्हाररावांना अतिशय वेदना झाल्या. त्यांतच त्यांनीं प्रतिज्ञा केली कीं, "सुरजमल जाटाचा शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती जयाप्पा जिंदे यांना शरण जाण्याचा विचार करुन जयाप्पांना निरोप, पाठविला, "आजचे समयीं तुम्ही वडील बंधु व मी धाकटा बंधु आहें, कळेल त्या रीतीनें बचाव करावा." यानंतर जाटास अभयदान मिळालें.

- १९ मार्च १७५४

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP