फाल्गुन वद्य १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
(१) बुक्कराय यांचें निधन !
शके १२९९ च्या फाल्गुन व. १ रोजीं सर्व हिंदुस्थानांत मुसलमानांचा धुमाकूळ सुरु असतांना दक्षिणेस तुंगभद्रेच्या तीरावर माधवाचार्यांच्या साह्यानें विजयनगरच्या विजयनगरच्या वैभवशाली हिंदुसाम्राज्याची स्थापना करणार्या हरिहर आणि बुक्क या बंधुंपैकीं बुक्कराय यांचें निधन झालें. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस इस्लामी संस्कृतीच्या टोळधाडी दक्षिणेंत धुमाकूळ घालूं लागल्या होत्या. शके १२४० मध्यें देवगिरीच्या यादवांचें राज्य बुडाल्यावर थोड्याच दिवसांत तेलंगणांतील वरंगळचें राज्यहि कायमचें नष्ट झालें. सर्व दक्षिण भारतांत हिंदूचा पाडाव होऊन मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली. याच सुमारास तुंगभद्रेच्या उत्तर तीरावर अनागोंदी नांवाचें एक छोटें राज्य होतें. शके १२४० वरंगळचें राज्य बुडाल्यावर त्याच्या पदरीं असलेले हरिहर आणि बुक्क हे बंधु अनागोंदीच्या आश्रयास आले. एकास अनागोंदीची दिवाणगिरी व दुसर्यास खजिनदारी मिळून दोघां बंधूंची लौकरच भरभराट झाली. परंतु पुढें सात-आठ वर्षांतच सुलतान महंमुद तघलक यानें अनागोंदीचें राज्य बुडविलें. आणि सर्व दक्षिण देश मुसलमानांना मोकळा झाला. धर्म बुडाला, स्वातंत्र्य गेलें, पुरातन राज्यें गेलीं, मंदिरें जमीनदोस्त झालीं, दैन्य, दारिद्र्य, दुष्काळ यांनीं सारा दक्षिण देश व्यापला ! अशा बिकट प्रसंगीं हरिहर-बुक्क या बंधूंनी शके १२५७ मध्यें विजयनगरीं हिंदुसाम्राज्याची मुहूर्तमेढ रोविली. विजयनगरचें साम्राज्य त्या वेळीं अत्यंत भरभराटीस आलेलें असून त्याच्याएवढें संपन्न राज्य दुसरें नव्हतें. "बुक्क मोठा पराक्रमी असून हिंदु धर्माचा मोठा अभिमानी व पुरस्कर्ता होता. पांच पांडवांत जसा अर्जुन तसा संगमाच्या पांच पुत्रांत बुक्क असें म्हणण्यांत येई. याची तरवार रणांगणावर नाचूं लागली म्हणजे मुसलमानांची तोंडें वाळून निस्तेज होत असत .... शत्रु राजांना हा वज्राच्या तडाख्याप्रमाणें भासे ..... याची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे यानें वेदभाष्य लिहिलें. ‘वैदिक सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे यानें वेदभाष्य लिहिलें. ‘वैदिक मार्गप्रवर्तक’ म्हणून जुन्या लेखांत याचा उल्लेख आढळतो."
- १४ फेब्रुवारी १३७८
-------------------------
(२) "बोध करुन माघारीं फिरविलें !"
शके १६८२ च्या फाल्गुन व. १ रोजीं पराक्रमी बंधु भाऊसाहेब व सुपुत्र विश्वासराव यांच्या निधनाची बातमी ऐकून नानासाहेब पेशवे पानपतच्या मार्गावरुन परत येण्यास निघाले. उत्तर हिंदुस्थानांत पानपतचा भयंकर संग्राम होत असतां नानासाहेब पेशवे निजामावर लक्ष ठेवण्यासाठीं नगरच्या बाजूस राहिले होते. दोनही फौजांची समीपता झाल्याची वार्ता तेवढी नानासाहेबांस समजली होती. पण पुढें कांहींच बातमी लागेना. महादोबा पुरंदरे यांच्या आग्रहानें पेशवे उत्तरेस जाण्यास निघाले. बरोबर जानोजी व मुधोजी भोसले, बाबूजी नाईक, गोपाळराव पटवर्धन, यमाजी शिवदेव, आदि मंडळी होती. भेलसा येथें बातमी समजली; - "दोन मोती गलत, दसवीस अश्राफत, रुपयोंकी गणति नहीं -" मागाहून हळूहळू हृदयद्रावक बातमी पेशव्यांचें कानीं आली. परंतु बातमींत मेळ नव्हता. एकदां समजावें भाऊसाहेबांची फत्ते कानीं आली. परंतु बातमींत मेळ नव्हता. एकदां समजावें भाऊसाहेबांची फत्ते झाली, पुन: ऐकावें मोड झाला. त्यामुळें एकंदर मंडळींची स्थिति फारच शोचनीय झाली. नानासाहेबांचें हृदय विदीर्ण होऊन गेलें होतें. शेवटीं - होळकर, विठ्ठल शिवदेव, नारोशंकर, वगैरे मंडळी भेटली. सर्व वृत्तांत निवेदन केला. श्रीमंतांनीं ऐकोन बहुत खेद केला. त्यांचा निश्चय कीं, दिल्लीस जाऊन गिलच्यांचें पारिपत्य करावें. अशी विचारणा करुन बंदोबस्त करीत असतां गोपिकाबाईंनीं बहुत बोध करुन माघारें फिरविलें." शेवटीं दु:खद मनस्थितींत नानासाहेब फाल्गुन व. रोजीं परत निघाले. "जावयाचा निदिध्यास प्रधान पंत यांनी धरिला. श्रीप्रयागीं जावें, तेथें नावेमध्यें बसून नांव बुडवावी ऐसें चित्तभ्रमेंकरुन बोलों लागले. तेव्हां सर्वांनीं चिन्हें ठीक दिसत नाहीं, ऐसा निश्चय करुन पुढें कूच झालें." नानासाहेबांच्या मनावर या विपत्तीचा मोठाच आघात झाला. त्यांचें वजन १७८ पौंडावरुन ११४ पौंडावर आलें. आणि ‘भाऊ भाऊ’ असा शोक करीतच स्वारी पुण्यास येऊन पोंचली. आणि त्यांतच त्यांचा अंत झाला.
-२१ मार्च १७६१
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP