फाल्गुन शुद्ध १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
शिवरायांची वाढती सत्ता !
शके १५१६ च्या फाल्गुन शु. १३ रोजीं मराठ्यांच्या सैन्यानें दंडाराजपुरीस वेढा घातला. शिवरायांनी स्वराज्याचा उपक्रम केला, त्याचा जाच बर्याच लोकांना झाला. औरंगजेब तर जळफळून गेला. पश्चिम किनार्यावर पोर्तुगीझ लोक व्यापार करीत, त्यांनाहि शिवाजीच्या वाढत्या प्रतापापासून त्रासच होऊ लागला. पाश्चात्य लोक ज्या शस्त्रविद्येंत निपुण होते ती विद्या हस्तगत करण्याची योजना शिवाजीची होती. पोर्तुगीझ, इंग्रज, वगैरे व्यापारी शिवाजीच्या शत्रूला दारुगोळा, हत्यारें, वगैरे साहित्य पुरवून मदत देत असत. याशिवाय लूट, जाळपोळ, इत्यादि प्रकार होऊन धार्मिक जुलूमहि फार होत असे. यामुळें त्यांना धाकांत ठेवणें हें शिवाजीचें कर्तव्यच होऊन बसलें होतें. याच भागांत राहणारा पीतांबर शेणवी याचा उपयोग करुन घेऊन शिवाजीनें पोर्तुगीझांची विद्या आत्मसात्केली. पश्चिम किनार्यावर वावरणार्या इंग्रज, सिद्दी व पोर्तुगीझ यांना धाकांत ठेवून आपला विजय कायम राखण्यासाठीं शिवाजीनें कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, इत्यादि नवीन दर्यावर्दी ठाणीं निर्माण केली. सन १६७४ च्या ऑगस्ट महिन्यांत गोव्याच्या हद्दीला लागून असलेला विजापूरचा फोंडा घेण्यासाठीं शिवाजीनें अण्णाजी दत्तो यास फौजेसह पाठविलें. परंतु त्याचें फारसे चाललें नाहीं. तेव्हां स्वत: शिवाजी राजापुरास येऊन दाखल झाला. त्यानें फोंड्यास वेढा दिला. किल्ल्यावरील विजापूरचा अधिकारी महंमुदखान जीव बचावण्यासाठीं पळून गेला ! त्यानंतर अंकोला, शिवेश्वर, काद्रा, वगैरे ठाणींहि काबीज झालीं. पुढें कारवार, सदाशिवगड, सोंधे हे प्रदेशहि हस्तगत झाले. त्यांवर चौथाईचा हक्क सुरु होऊन धर्माजी नागनाथ नांवाचा अधिकारी नेमून सर्व व्यवस्था शिवाजीनें त्याकडे सोंपविली. येणेंप्रमाणें मराठ्यांचा दरारा सर्वत्र वाढल्यामुळें पोर्तुगीझांना चांगलीच दहशत बसली. शिवाजी राजाचा सर्वत्र वाढल्यामुळें पोर्तुगीझांना चांगलीच दहशत बसली. शिवाजी राजाचा सर्वत्र दरारा निर्माण होऊन अनाथांच्या रक्षणास कोणी वाली आहे, असें सिद्ध झाले.
- २७ फेब्रुवारी १६७५
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP