अगस्त्यगीता - शौर्यव्रत
अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.
अध्याय चौदावा
शौर्यव्रत
अगस्त्य म्हणाले -
आता मी तुम्हाला शौर्यनामक व्रताबद्दल सांगतो, जे केले असता भेकड मनुष्य देखील एकदम पराक्रमी होतो. ॥१॥
आश्वयुज महिन्याच्या शुद्ध नवमीस संपूर्ण दिवस उपवास करावा. सप्तमीस संकल्प करावा. अष्टमीस उपवास करावा आणि नवमीस आदरपूर्वक पिष्ट भक्षण करावे. ॥२॥
शक्तिशाली, महाभागा, आणि महातेजस्वी अशी जी दुर्गा, तिची भक्तिभावे पूजा करावी आणि ब्राम्हणांना भोजन द्यावे. ॥३॥
अशा प्रकारे वर्षभर व्रत करून व्रताच्या सांगतेला कुमारिकांना यथाशक्ती जेवण द्यावे. ॥४॥
यथाशक्ती सोने आणि वस्त्रे इ. द्यावीत आणि नंतर देवीची प्रार्थना करावी. हे देवी, मजवर प्रसन्न हो. ॥५॥
हे व्रत केल्यास राज्यभ्रष्ट राजाला पुन: राज्य मिळते. मूर्खाला ज्ञान मिळते आणि भेकडाला सामर्थ्य मिळते. ॥६॥
अगस्त्यगीतेमधील शौर्यव्रत नावाचा चौदावा अध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP