अगस्त्यगीता - अविघ्नव्रत
अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.
अध्याय नववा
अविघ्नव्रत
अगस्त्य म्हणाले -
आता हे राजा, मी तुम्हाला अविघ्नव्रतासंबंधी सांगतो, जे नीट आचरिले असता संकटे तत्काळ दूर होतात. ॥१॥
हे व्रत फाल्गुन चतुर्थीस करावे. भात आणि तीळ मिसळलेले अन्न केवळ रात्री घ्यावे. ॥२॥
याच पदार्थाचा होम करुन ब्राम्हणांनाही हेच दान करावे. असे चार महिने करावे आणि पाचव्या महिन्यात गणेशाची स्वर्णप्रतिमा करून पाच भांड्यांत दुधाचे पदार्थ आणि तीळ त्याची पूजा करून ब्राम्हणाला दान करावे. ॥३-४॥
हे व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात. अश्वमेध करताना सगर राजाला जेव्हा अडचणी आल्या तेव्हा याच व्रताने त्याने त्यांचे निराकरण केले. त्रिपुराचा नाश करताना रुद्राने हेच व्रत केले आणि समुद्र प्राशन करताना मीही हेच व्रत केले. ॥५-७॥
अन्य राजांनी ज्ञानी आणि तापसी लोकांनी अडचणी दूर करण्यास हेच व्रत केले. ॥८॥
गणेशाला शूर, धीर, गजानन, लंबोदर, एकदंत असे आवाहन करून पूजावे आणि होम करावा. अशाने संकटे दूर होतात. ॥९॥
हे व्रत केल्याने संकटे दूर होतात, शिवाय विनायकाची प्रतिमा दान केल्याने समाधान प्राप्त होते. ॥१०॥
अगस्त्यगीतेमधील अविघ्नव्रत नावाचा नववा अध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP