अगस्त्यगीता - मोक्षधर्मनिरुपण

अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.


अध्याय दुसरा
अगस्ती म्हणाले -
राजाने स्वत:ला त्रैवर्णिक (तीन रंगांचा) केले आणि अहं नावाचा तीन वर्णांचा पुत्र निर्माण केला.  ॥१॥
त्या मुलाला ज्ञानस्वरूप अशी मुलगी झाली आणि तिचा विज्ञानद हा सुंदर मुलगा झाला. ॥२॥
जाणण्यासारख्या सर्व वस्तूंना जाणणारे पाच पुत्र त्याला झाले. ते अक्ष इत्यादी नावांनी ओळखले गेले.
ही (ज्ञानेंद्रिये) जणू काही दस्यू होते आणि राजाने त्यांच्यावर नियंत्रण केले. ॥३॥
त्यांनी आपल्या अमूर्त रूपात राहाण्यासाठी राजाच्या देहातच निवासस्थान केले. नवद्वार, एकस्तंभ, चार मार्ग आणि अनेक छोट्या नद्या आणि डबकी असलेले ते नगर होते. ॥४-५॥
हे नऊजण त्या नगरात एकत्रितच प्रविष्ट झाले आणि लगेचच पशुपाल मूर्त पुरुष झाला. ॥६॥
नगरामध्ये स्थायिक झाल्यानंतर पशुपाल राजाने शब्दांचे चिंतन करुन तेथे वेद त्या नगरीत आठवले, ॥७॥
राजाने वेदात सांगितलेल्या व्रतांची, नियमांची आणि यज्ञांची व्यवस्था तेथे लावून दिली. ॥८॥
एकदा राजा अत्यंत व्याकूळ झाला आणि त्याने कर्मकांडाचे आवाहन केले. आणि नंतर योगनिद्रेमध्ये असलेल्या परमात्म्याने चार मुखे, चार हात आणि
चार पाय असलेल्या आणि वेदांना धारण केलेल्या पुत्राला आविर्भूत केले. तेव्हापासून इंद्रियगम्य वस्तू राजाच्या पूर्ण अधिकारात आली. ॥९-१०॥
हे महामते त्या समुद्रात तसेच त्या वनामध्ये त्याने त्याचप्रमाणे समुद्र आणि अरण्ये स्थापन केली. कर्मकांडाच्या आवाहनामुळे हत्ती आणि गवत
निर्माण झाले. ॥११॥
येथे अगस्त्यगीतेतील मोक्षधर्मनिरुपण नावाचा दुसरा अध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP