श्री वराह म्हणाले -
दुर्वासांच्या तोंडून धरणीव्रत ऐकून सत्यतप हिमालयाच्या उताराकडे गेला. ॥१॥
त्या स्थळी पुष्पभद्रा नदी, चित्रशीला नामक खडक आणि भ्रदवट नामक वड होता. तेथे आश्रम स्थापून त्याने उर्वरित आयुष्य चिंतनात घालवले. ॥२॥
धरणी म्हणाली, हजारो वर्षापूर्वी मी हे व्रत केले आणि आता ते विस्मृतीत गेले आहे.
तुमच्या कृपेमुळे मला पुन: त्याचे स्मरण होत आहे. ॥३-४॥
हे देवा, जर मनात इच्छा असेल तर जनं आणि जन्माचे स्मरण दोन्ही दु:खे देण्याच्या पलीकडेच ठरु शकतात.
आणि म्हणून भद्राश्चाच्या निवासस्थानी परतल्यावर अगस्तीने जे केले ते हे राजा मला सांग. ॥५-६॥
वराह म्हणाले -
जेव्हा मुनी परत आत्ले तेव्हा श्वेत्वाहन भद्राश्वाने त्यांची पूजा करुन त्यांना मोक्षधर्माबाबत विचारले. ॥७॥
भद्राश्च म्हणाला -
संसारातील अस्तित्वाचे वंधन कोणत्या उपायांनी तोडता येते आणि जीवनातील दु:खावर कशी मात करता येते हे मुनी, मला सांगा. ॥८॥
अगस्ती म्हणाले -
हे राजा, जे जवळ आहे आणि दूर आहे, जे दिसते आणि दिसत नाही त्याची कथा तू लक्षपूर्वक ऐक. ॥९॥
ज्या काळी दिवस, रात्र, दिशा, स्वर्ग, देवता आणि सूर्य हे कोणीही नव्हते, तेव्हा पशुपाल नावाचा राजा अनेक प्राण्यांना पाळून राहिला होता. ॥१०॥
एकदा तो पूर्वसमुद्र पाहाण्यास गेला. अथांग आणि अफाट अशा त्य सागराच्या किनारी सर्पांनी व्यापलेले एक अरण्य होते. तेथे सापांची वस्ती होती. ॥११॥
त्या ठिकाणी ८ वृक्ष आणि एक स्वच्छंद वाहती नदी होती. पाच मुख्य पुरुष तेथे उभे - आडवे भ्रमण करीत होते. पैकी एकाने एका प्रकाशमान स्त्रीला
धरले होते. ॥१२॥
त्या स्त्रीने आपल्या वक्षावर सहस्त्रसूर्याचा प्रकाश असलेल्या एका व्यक्तीस धारण केले होते. त्याला तीन वर्ण आणि तीन विभाग होते.
त्या राजाला पाहून ते सर्वजण शांत आणि स्तब्ध झाले आणि राजाने अरण्यात प्रवेश करताच एकमेकांत मिसळून ते एकजीव झाले. ॥१३-१४॥
नंतर सर्पांनी त्या राजाला वेढले आणि यांना मारून आपण आपली सुटका कशी करून घ्यावी अशा विचारात तो पडला. ॥१५॥
तो अशा प्रकारे विचार करत असताना श्वेत, रक्त आणी पीत असे तीन रंग असलेला दुसरा पुरुष त्याच्या शरीरातून निघाला. ॥१६॥
हावभाव करुन आता कुठे जातोस असे त्याने विचारत असताना त्याचक्षणी महत् उप्तन्न झाले. ॥१७॥
त्याने राजाला आच्छादिले आणि मनामधे सावध राहाण्यास सांगितले. त्यानंतर ती स्त्री त्यांच्यासमोर आली. (जी खरोखरी माया होती.) ॥१८॥
अशा प्रकारे तो मायेने वेढला गेला. त्यानंतर सर्व प्राण्यांचा अधिपती असलेल्या ईश्वराने त्याला आपल्या अधिकारात घेतले. ॥१९॥
नंतर दुसरे पाच पुरुष तेथे आले आणी त्यांनी याला वेढले. ॥२०॥
जेव्हा सर्प एकत्र होऊन आक्रमण करण्यास आले तेव्हा हे सगळे राजाच्या शरीरात लपले. ॥२१॥
त्यामुळे तो राजा अत्यंत तेजस्वी दिसू लागला. आणि त्याची सगळी पापे नष्ट झाली. ॥२२॥
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे आपल्या गुणांसह त्याच्यात एकत्र झाले. ॥२३॥
अशा प्रकारे हे राजा, पशुपालाने त्याच्याभोवती बर्याच कालपर्यंत वेढून असलेल्या सर्वांन तत्काळ एकजीव केले. ॥२४॥
त्या राजाचे ते युध्दातील सामर्थ्य आणि रूप पाहून तो त्रैवर्णिक पुरूष राजाला म्हणाला, ॥२५॥
हे राजा, मी पुत्र आहे. तुझे काय (काम) करावे ते सांग. ॥२६॥
परंतु आम्हीच पराभूत झालो आणि तुझ्याकडून पराभूत झालो तथा आम्ही आता तुझ्या शरीरात लपून आहोत. आता मी तुझा पुत्र झालो आहे, तेव्हा
इतर सर्व आपोआपच निर्माण होईल. ॥२७॥
असे सांगितल्यावर राजा त्या पुरुषाला म्हणाला, ॥२८॥
तू माझा पुत्र आहेस असे म्हणतोस आणि परिणामत: इतर सर्व निर्माण होते. परंतु मनुष्याला ज्या सुखाची इच्छा असते अशा कुठल्याही गोष्टीशी आसक्त अस्ण्याची माझी इच्छा नाही. ॥२९॥
असे म्हणून त्याने त्याल मुक्त केले, नंतर त्याच्यासह इतरांनाही त्याच्यांपासून मुक्त होऊन तो राजा त्यांच्यामध्ये एकटा राहिला. ॥३०॥
अगस्त्यगीतेतील मोक्षधर्मनिरुपण नावाचा पहिला अध्याय समाप्त ॥