अगस्त्यगीता - कांतिव्रत
अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.
अध्याय सातवा
कांतिव्रत
अगस्ती म्हणाले -
आता मी तुम्हाला कांतिव्रताबाबत सांगतो, जे केल्यामुळे पूर्वी चंद्राला त्याचे तेज प्राप्त झाले. ॥१॥
हे सर्वज्ञात आहे की, द्क्षाच्या शापामुळे चंद्राला क्षय झाला आणि हे व्रत करून त्याने आपली शोभा परत मिळवली. ॥२॥
हे राजा, कार्तिक शुक्ल द्वितीयेस विष्णुची बलकेशवरुपात पूजा करीत नक्त करावे. ॥३॥
पायांना बलराम समजून आणि डोक्याला केशव समजून पूजा करावी. ॥४॥
विष्णुची अशी पूजा करून चंद्राची दोन कलांची स्वर्णप्रतिमा अर्ध्यादी आणि मंत्रानी पूजावी. ॥५॥
मी श्रेष्ठ अशा सोमाला वंदन करतो जो यज्ञाचा मुख्य स्वामी आहे, अमृत धारण करणारा आहे आणि श्रेष्ठ नियामक आहे. ॥६॥
रार्त्री शिजवलेले यव आणि तूप खावे. फाल्गुनापासून चार महिने फक्त दुधाचे पदार्थ खावे आणि साळींनी होम करावा आणि कार्तिकात यवाचा होम
करावा. आषाढापासून पुढे चार महिने तिळाचा होम करावा. ॥७-८॥
तसेच तिळाच्या पदार्थाचेच भक्षण करावे. वर्षाच्या समाप्तीला चंद्राची स्वर्णप्रतिमा पांढर्या वस्त्रजोडीने झाकून पांढर्या फुलाने पूजावी आणी हे
सर्व ब्राम्हणाला दान करावे. ॥९-१०॥
वर्षाच्या समाप्तीला चंद्राची रौप्यपतिमा करून याच प्रकारे श्वेत वस्त्रासह दान करावी. ॥११॥
दान करण्यापूर्वी त्या ब्राम्हणाचा विशेष स्त्कार करावा.
हे सोमरुपातील नारायणा, तुझ्या कृपेनेच कोणी शोभयमान होतो. शिक्षित आणि आकर्षक होतो. मी तुला वंदन करतो. या मंत्रासह ब्राम्हणाला
दान द्यावे. ॥१२-१३॥
हे दान देताक्षणीच व्रती तेजस्वी होतो. फार पूर्वी सोमानेच हे व्रत केले आणि विष्णू त्यावर प्रसन्न झाले. आणि त्याने त्याला क्षयापासून मुक्त केले
आणि त्याला अमृत नावाची कला दिली. ही कला सोमाने रात्री प्राप्त केली आणि तो सोमत्वाला केला. तसेच त्याने द्विजराजत्वही प्राप्त केले. ॥१४-१६॥
अश्विनीकुमारांना द्वितीयेला सोमभक्षक मानावे. ते शेष आणि विष्णु म्हणून ओळखले जातात. ॥१७॥
हे राजा, विष्णुपेक्षा श्रेष्ठ कुठलाही देव नाहे. इतर सर्व देव विष्णुचीच भिन्न नामरूपे आहेत. ॥१८॥
अगस्त्यगीतेमधील कान्तिव्रत नावाचा सातवा अध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP