अगस्त्यगीता - पशुपाल आख्यान
अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.
अध्यास तिसरा
पशुपाल - आख्यान
भद्रश्च म्हणाला -
हे मुनी, माझ्या प्रश्नाच्या उत्तरात ही कथा तुम्ही सांगितली, परंतु हे कसे झाले आणि कोणी केले ते मला सांगा. ॥१॥
अगस्ती म्हणाले -
ही विचित्र कथा असून जगातील प्रत्येक वस्तूशी तिचा संवंध आहे. तुझ्या देहात, माझ्या देहात आणि सर्व जीवांमध्ये ती सारखीच आहे. ॥२॥
त्या कथेची निर्मिती करण्याच्या इच्छेने आणि त्यासाठी साधनांचा विचार करताना, पशुपालापासून चतुर्मुख आणि चतुष्पाद असा जो ॥३॥
निघाला तोच हिचा निर्माता आणि विस्तारकर्ता आहे. त्याचा पुत्र स्वर हा सत्याचा पुतळा मानला जातो. ॥४॥
त्याने वेदाचे महत्व चार पुरुषांना सांगितले आणि त्यामुळे तो आदरणीय झाला. ॥५॥
चौघांमधे पहिला चतु:श्रुंग आणि दुसरा वृष. तिसरा त्यांच्या मार्गाने गेला आणि चौथ्याने भक्तीपूर्वक त्यांचे अनुगमन केले. ॥६॥
त्या सर्वांनी सत्यमूर्तीची (स्वराची) कथा ऐकली. वृषाने त्यानंतर ब्रम्हचर्य अंगिकारले. ॥७॥
वृषाच्या प्रभुत्वामुळे माणसांमध्ये सेवकावर अधिकार गाजवणे, बैलावर स्वार होणे अशी क्षमता आली. ॥८॥
तो बोलत असताना त्याची मुले अचानक चौपट, एकपट आणि दुप्पट झाली. ॥९॥
स्थायी आणि परिवर्तनीय वस्तूंना पाहून त्या चतुर्मुखी पुरुषाने आपल्या जनकाला पाहाण्याच्या साधनांचा विचार केला. ॥१०॥
माझ्या वडिलांमध्ये जे उत्तम गुण होते ते स्वराच्या एकाही मुलामध्ये दिसत नाहीत. ॥११॥
वेद सांगतात की, मुलाच्या मुलाला आजोबाचे नाव देतात आणि स्वराच्या मुलाबाबत वेगळे कसे असू शकेल ? ॥१२॥
ते सद्गुण येथे मला कुठेतरी दिसले पाहिजेत. पण मी काय करावे ? अशा प्रकारे तो विचार करू लागला. ॥१३॥
अशा प्रकारे तो विचार करीत असताना एक अस्त्र त्याच्या पित्यापासून आले आणि त्याने घुसळून काढले. ॥१४॥
हे मंथन चालू असताना त्या चतुर्मुखाने नारळाच्या फळासारखे डोके वर येत असलेले पाहिले, जे दहा प्रकारे आच्छादित झालेले होते.
चतुर्मुखाने तिळाच्या रोपट्याप्रमाणे ते कापून टाकले. ॥१५-१६॥
मूळरहित असे जे झाले होते तेही त्याने कापले. ॥१७॥
त्या भागापासून अगोदर दहा आणि नंतर पाच निर्माण झाले. ॥१८॥
त्याने पुन्हा त्यांना कापले तेव्हा ते जळत होते. ॥१९॥
तेही कापल्यानंतर मूळ आकाराच्या एकद्शांश आकार असलेली वस्तू दिसू लागली. ॥२०॥
तीही कापल्यावर त्यातून अजून एक त्यासारखीच लहान वस्तू आली, जी शुभ्र आणि शांत होती. ॥२१॥
त्या वस्तूत परमाणुच्या आकाराचा आपला जनक त्याने पाहिला, जो अस्पष्ट होता. ॥२२॥
तो आणि त्याचाअ पिता स्वर, हे दोघेही नंतर आनंदित झाले. ॥२३॥
स्वर आणि पुरुष होता. त्याचे धड प्रवृत्ती आणि शीर निवृत्ती होते. ॥२४॥
अशा प्रकारे ही कथा निर्माण झाली आणि ती तुला सांगीतली. ॥२५॥
हा सर्व जगाचा थोडक्यात पहिला इतिहास आहे. हा जो तत्वत: जाणेल तो सत्यकर्मच करील. ॥२६॥
अगस्त्यगीतेमधील पशुपाल-आख्यान हा तिसरा अध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP