अगस्त्यगीता - पुत्रप्राप्तिव्रत
अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.
अध्याय तेरावा
पुत्रप्राप्तिव्रत
अगस्त्य म्हणाले -
हे राजा ! आता मी तुला पुत्रप्राप्तिव्रत संक्षेपाने सांगतो. ॥१॥
भाद्रपदाच्या वद्य अष्टमीस उपवास करून हे व्रत करावे. ॥२॥
संकल्प मात्र सप्तमीसच करावा आणि विष्णुची देवकीच्या मांडीवर पडलेल्या आणि गोपींनी घेरलेल्या कृष्णरुपात अष्टमीस पूजा करावी. ॥३॥
अष्टमीला पहाटे विष्णुची एकाग्र मनाने पूजा करावी. ॥४॥
नंतर यव, काळे तीळ, तूप आणि दही यांचा होम करावा. ब्राम्हणांना भोजन आणि दक्षिणा द्यावी. ॥५॥
नंतर व्रत करणार्याने प्रथम बिल्वपत्रे नंतर स्निग्ध पदार्थ आणि इतर अन्न आवडीप्रमाणे घ्यावे. ॥६॥
कृष्णपक्षाच्या दर अष्टमीस हे व्रत केल्यास संततिहीनास संतती मिळते. ॥७॥
फार पूर्वी संततिहीन अशा शूरसेन राजाने हिमालयात तप केले तेव्हा देवाने त्याला हे व्रत सांगितले. ॥८॥
त्याप्रमाणे त्याने हे व्रत केले आणि त्याला वासुदेव नामक पुत्र झाला. ॥९॥
या वासुदेवाने नंतर अनेक यज्ञ केले आणि त्यामुळे तो सज्जन शूरसेन राजा मुक्त झाला. ॥१०॥
हे राजा ! हे कृष्णाष्टमी व्रत मी तुला सांगितले. वर्षाअखेरी एक गायींची जोडी ब्राम्हणाला द्यावी. ॥११॥
पुत्रव्रत हे असे आहे. हे केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. ॥१२॥
अगस्त्यगीतेमधील पुत्रप्राप्तिव्रत नावाचा तेरावा अध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP