मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| अमृतसिद्धियोग शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - अमृतसिद्धियोग सहदेव - भाडळी ज्योतिषमतावर हैबतीबुवा घाडगे यांचीं कवनें. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती अमृतसिद्धियोग Translation - भाषांतर ( लावणी ) अमृतसिद्धि योग कैसा समजेल हें चित्तीं सहदेवासी सांगे भाडळी त्याच्री प्रचीती ॥ध्रु०॥रविवारीं तो हस्त आल्यावर कार्य होय पूर्तें ।रामानें उचलिलें धनुष्य अंगुष्टमात्रें ॥सोमवारीं मृग हा असतां सर्वही कार्याला ।बिभीषणासी राज्यीं स्थापिला चिरंजीव केला ॥मंगळवारीं अश्विनीवरती कार्या निघाले ।पार्थ उद्धवा ज्ञान दिधलें त्यांसी उद्धरिलें ॥बुधवारीं अनुराधा सुखाच्या असती निश्चितीं ।प्रल्हादानें नाम स्मरिलें एकाग्र चित्तीं ॥गुरुवारचा पुष्य बरवा ऐका हो ख्याती ।पांडवांनीं यज्ञ केला हरि झाला साथी ॥शुक्रवार रेवती स्थाइक कार्या तूं घेईं ।ध्रुवबाळानें तप मांडिलें अढळपदीं जाई ॥शनिवारीं रोहिणी कुंटिला ऐरावती मिळाला ।वाण देऊन शेजीचें भीमानें स्वर्गीं पोचविला ॥यांतुन पुष्य टाळीं विवाहीं सांवतसें तुजला ।भाडळीचें सांगणें हैबती मुखानें वदला ॥ऐसा योग उत्तम पाहुनी गमनादिक करिती ।सहदेवासी सांगे भाडळी त्याची प्रचीती ॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP