मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| घरच्या आयाविषयीं शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - घरच्या आयाविषयीं शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती घरच्या आयाविषयीं Translation - भाषांतर ( लावणी ) आये घराचे अष्ट कोण तो आया कुठें द्यावा ।शिल्पशास्त्र बोलिलें दाखला तो ऐकून घ्यावा ॥ध्रु०॥घर बांधितां अष्ट आथांचें साधन आहे त्यासी ।कोण जागीचा कोण आया ऐका वचनासी ॥मध्यभागीं ध्वज आया मोजणी आणा नेमासी ।धूम्र आया देईजे ठिकाणा तो स्वयंपाकासीं ॥सिंह आया नेमकाचि मोजुनि दरवाज्याप्रत यावा ।शिल्पशास्त्र बोलिलें दाखला तो ऐकून घ्यावा ॥१॥पिछाडीचे दरवाजाप्रति देइजे श्वान आया ।चोराचें भय नाहीं योजून घालावा पाया ।वृषभ आया तो उत्तम योजून देणें ज्या ठाया ।म्हैस गाई अश्वादि ठिकाण तथें बांधाया ।मुळींच ऐसा पाया चतुरें योजून घालावा ।शिल्पशास्त्र बोलिलें दाखला तो ऐकून घ्यावा ॥२॥स्मर आया देईजे ठिकाणा तोच निजावयासी ।गज आया देईजे देवघर करणें देवासी ।ऐसे आये सात आतां ऐकावें आठव्यासी ।शेवटचा आठवा चतुरें आणावा ध्यानासी ॥ढंक आया बालती शेतखान्यासी परिसावा ।शिल्पशास्त्र बोलिलें दाखला तो ऐकून घ्यावा ॥३॥अष्ट आये याप्रमाणें एका घरामध्यें यावे ।महिना पाहुन उत्तम घर बांधून नांदावे ॥कवि हैबती म्हणे शिल्पशास्त्रामध्यें हें पाहावें ।हेच आठाघरीं आठ आये सांगतों चित्त द्यावें ॥ग्रंथ पाहिण्याविण शब्द कविवर न ठेवावा ।शिल्पशास्त्र बोलिलें दाखला ऐकून घ्यावा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP