मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| गजगौरीव्रत शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - गजगौरीव्रत शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती गजगौरीव्रत Translation - भाषांतर गजगौरीचें आख्यान । करा श्रवण । चतुर सुज्ञान । निरोपतो आता । गांधारीनें वाण वाटलें । भारती लिहिलें । ऐक गुणवंता ॥ध्रु०॥चांडाळ होता दुर्योधन । आणि दुश्यासन । तिसरा तो कर्ण । जमले एके ठाई । पाप बुद्धिचा सागर । कपटाचें घर । अंत्य त्या नाहीं । एक आगळे शंभर । भाऊ कसे घर घेऊं जसे बागुल बावू । करती नवलाई ॥अहंकार होता मनीं । तशांत नारद मुनी । आले लवलाही । सिंहासनीं नारद बसवोनी । पुजा करोनी कर दोन्ही जोडोनी लागली पाईं । जन्मोजन्मी असें असावें । कमि नसावे । उपाय करूं काई ॥तेव्हां बोलले नारदमुनी । सांगे वृत्तांत निवडुनी । तुम्हीं शंभर बंधु मिळोनी । माता गांधारी तुमची जननी । गज मृत्तिकेचा करोनी । माता गांधारी वर बसवोनी ।मिळवणी - सहज लाविली हो कळा । महान सबळ चढेल तुझ्या हता ॥हेचि आहे स्वप्न एक वर्म । करी हेंचि कर्म । अंधाचे सुता । कळ लावुनी नारदमुनी । गेले निघुनी । बन्धु मिळुनी चिखल खुप केला । गाड्या परि हत्ती सजविला । खूप सजविला । जीव नाही त्याला लागला ॥गांधारी वर बसविती । अंबर गर्जती । वाद्यें वाजती । निघाली वाणाला । नगरांत सार्या वाण दिलें । एक राहिलें । आतां म्हणे चला । वाड्यासमोर आली गांधारी । हाक एक मारी । यावें बाहेरी । जावुबाईला । हें वाण माझें उसनं । हत्तिवर बसून । देतें मे तुजला ॥चाल - डाव्या पायाच्या आंगठ्यानं । लाविला वाण गांधारीनं । बोले दुर्योधन मोठ्यानं । गज फिरविला खोट्यानं । हाका मारी कुंती मोठ्यानं । नका जाऊ बाई थाटानं ।मिळवणी - गेली निघून घरीं गांधारी । कुंती मंदीरीं । चितांभव करी । पांडव गेले शिकारीकरितां । येई येई द्वारकानाथा । करूं काय आतां लागली चिंता । पंचबंधु आले मिळोनी । ऐकले कानीं । गांधारी हत्तिवर बसोनी । बाण दिले येऊनी ॥तसा हत्ति आम्ही एक करून । भीम खबर गेली यमुनेसी । यमुनेस पाडुन आट । माती लाट । महा प्रचंड दिले फेकुनी । तीन योजनें गांव त्रासला । सांगि धर्माला ब्राह्मण येऊन । केला विचार धर्मानं । भीमास बोलावून । वीर अर्जुन पत्र लिहून । इंद्रास पत्र पाठवा । तुमचा गज द्यावा । आम्हांला पाठवून । पत्र कसें लिहिलें होतें । ज्ञानी सकळ ऐका तें ॥ द्वारकानाथ हृदयांत । त्याचे चरण आम्ही वंदत । बाणासी पत्र बसवित । वर शिका प्रभुचा कर । गजगौरीचें आख्यान करा श्रवण ॥सोडी बाण तेव्हां अर्जुन । प्रभुस स्मरून । मोठे गर्जुन ऐसे पाहता । ब्रहस्पती देवाचा गुरु । नारदमुनी । धरून पत्र सत्वर वाचुन पाहती । पत्राखाली उत्तर लिहिली । परत बाण देती । गर्व आला चित्तीं ॥बाण आला हस्तिनापुरीं । अर्जुन क्षेत्री घेवुनी करीं । धर्मा दाविती । हत्ति आणणार कोण जावुन घेवुनी । खेद फार चित्ता । धर्म बोले तया घडीं । बाणाची शिडी करून तातडी । लावावी आकाशाप्रती । भीम बन्धु आहे बलवान । येईल घेऊन । इंद्राचा हत्ती ॥चाल - बन्धुच्या आज्ञेपमाणें । शिडी करतां आला अर्जुन । भीम गेला वर चढून । मुखी कृष्ण कृष्ण गान ॥द्वारपाळ होते द्वारीं भिडुनी । बोले भिमास चढून ॥मिळवणी - तूं आहेस कोणाचा कोणा । देतों जिवदान । जावें येथून निघून चालता । भीम हसला आपले मनीं । द्वारपाळ दोन्ही घाली पालथा ॥चाल - भीम गेला इंद्राजवळी । पाहती सकळी । देव मंडळी । धन्य त्याला म्हणती । शिरीं कृपेचें छत्र कृष्ण मुख स्मरून । शस्त्र म्हणून आला वरती । सहा हात सुंभळे अंदले ।भीमास तेथें नेले । गज दाविले । घेवुन जा म्हणती । एक बुक्की त्यास मारीली । मस्ती त्याची गेली । पडता खालती । चारी पाय सोंड शेपुट । करून झटपट । बांधुन बळकट । भीम उचलून हो हत्ती ॥ घ्याया घुंगुर साग । बांधून भारा द्यावा मजप्रती ॥चाल - हत्ती आडकविला गदेशीं । साज मारीला खाकेशी । भीम आला हस्तिनापुराशीं । आनंद झाला धर्माशीं ॥ केला सनिगार ( शृंगार ) हत्तीशीं । वर बसविलें मातेशीं । दिले वाण सार्या नगराशीं । मग गेले कौरववाड्याशीं । जिचे उसने दिले तिसी । नर लाजली आपेसी ॥मिळवणी - ग्रंथीं आहे बहू विस्तार । म्हणून सारासार । हैबती कविश्वर । नाथहि स्मरता । तिथी मास सांगी काढून । बैसे ठासून कवित्व गाता ॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP