मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| संगीतशास्त्र शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - संगीतशास्त्र शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती संगीतशास्त्र Translation - भाषांतर ३२( चढ ) तूं काय गाशील भेद गायाला तुझी अक्कल समजु आली ।बाल संभाळून आत्ता शब्द तो अर्थाचा पडू नये खाली ।दिडच पैशामध्ये शेडजी, दीड लावणींत कवि अकल ।प्रसंगानुरूप शब्द वदावे तर ज्ञानाची मजा पटल ।रानदांडगा उगाच आपल्या शरिराकडे पाहुन नटला ।उदंड बोका पुष्ट माजला म्हण का वाघाशी झटला ।रवीपुढें काजवा मिरवितो गोड प्रकाशा आव घाली ।गलेलठ्ठ कुतरा कीं मांजर शहाणी चुलीच्या भोवताली ॥१॥कळल शहाणपण आता गावणा पुस पुसतो - सांगावी ।सहा राग हे कोठुन झाले खुण ठिकाणीं लावावी ।माता पिता कोण तयाची वस्ती सांग कोणे गांवीं ।नांवें मुख्य रागाचीं कोणती खुण शास्त्राची लावावी ।दिवस मास लक्षण कोणतें सांग कोण कोठुन झाली ।कोणी प्रगट रागाशी केलें कोणी मिळविलें सुरताली ।स्त्रिया एक एकाच्या सहा सहा त्याच रागाच्या छत्तीस ।ज्याचे त्याला करा वाटणी सहा सहा नांवें गणतीस ।नांवें न्यारी छत्तिसाचे भरतोस ।त्या कन्या कोणाच्या माता पिता कोणते वस्तीस ।कोणता मास कोणता संवत्सर कोण कोणे दिवशीं ज्याली ।तुला कळेना तरी शरण जा गुरुनाथ होईल वाली ।ब्रिद डफावर लावुन फिरतां आकडबाजी मिरवायाची ।काय करावी आक्कड असली वेळ अब्रु जायाची ।कविमताचेम कलम वेगळें खुण नाहीं गवसायाची ।प्रसन्न नाथ महाराज शिरावर पाहुन पळती तुरेवाली ।डफावर झडे फडके, गर्द मंडळ भवताली ॥३३ ( उत्तर ) ऐकुन घ्यावी आतां सांगतों उत्पन्न रागाची ।येक येका सदा कन्या छत्तिस रागण्याची ।भ्रम युगात शिव निद्रिस्त तें एका समयाला ।हृदयांतून हुंकार शब्द तो वदनास गे आला ।त्या शब्दापासुन पुरुष सहा आले जन्माला ।विद्याधर गंधर्व कन्यका सहा स्त्रीया सहाला ।त्या साहापासून सहा राग ते आले आकाराला ।सहा रागापासुन जन्म छत्तिस रागिण्याला ।स्त्रीया त्या कोणत्या सांगतों आणा ध्यानाला ।मातापित्यासहित परीसा नंवें सर्वाचीं ।शिव रामायणीं कथा सर्व कथली आहे याची ।जांबु द्विपीं श्रीराम पिता तो चंद्रमोळी त्यासी ।गौडा माता संभव शष्टीं मार्गेश्वर मासी ।पौष शुद्ध शष्टीस जन्म स्त्री मालता नामासी ।कन्या कौसुकी देवबाळ गांधारी ग्रहवासी ।मंडळी दशंती साहापुढें पाहा राग वसंतासी ।मन्व पिता माता गोत्री कुटचळीं सिंहल द्विपासी ।संभव माघे जन्म शुद्ध पौर्णिमा काल गुणासी ।जयवंती स्त्री कन्या धनाश्री वैराटी ज्याशी ।करमंजरा पदमंजरी कंसा देव गौडी साची ।क्रौंच द्वीपिं उत्पन्नता एका पुढें बहेरवाची ।जयत्पिता कोलाटी माण त्या संभव चैत्रांत ।वैशाखामधी शुद्ध एकादसीस माण त्यात ।सुपर्णिका स्त्री कन्या भैरवी उळळीत म्हणतात ।वेळ उळी गुर्जरी कर्णाटी हंसबाळी त्यांत ।ऐशा झाल्या साहापुढें पाहा पंचम रागांत ।शाला द्विपींश्रुत पिता माय आंघावळी नामात ।संभव जेष्ठी जन्म शुद्ध सप्तमी आषाढांत ।स्त्री दशकारी मुली थोटकी मोटकी म्हणतात ।तत्पदी नाटकी यम म्हारायण परत्परायाची ।कुशद्विपीं उत्पन्नता पहावी मेघ राजाची ।द्रावळी माता पिता श्रयंता पर्वत गांधारी ।श्रावणी संभव जन्म विणायक चतुर्थी निर्धारी ।ज्योतिका स्त्री कन्या कल्याणी आणि मधुकारी ।बंगालिका सोर्टी सारेटि भुपाळी अवधारी ।ऐशा झाल्या साहा पुढें तो नट राग विचारी ।जन्म तयाचा झाला पाहा काष्मिरांत अधिकारी ।पिता तयाचा विनट असा बालती प्रजा सारी ।माता ते मंगला साहावी सेवटची बारी ।आश्विन माशी शुद्ध सप्तमी संभव खुण याची ।कार्तिक मासी शुद्ध एकादशी तारेख जन्माची ।कमल विलासी वधु कन्यका x x बल माही जाण ।रंगाश्री असावरी येगदानी चौथी पाहणं ।गांधारी जयवंता यासा नामें अभिदान ।न्यारी न्यारी नांवें सांगितलीं या प्रमाण ।सहा राग छत्तीस ऐशा निर्माण ।शिवरामायणीं ग्रंथीं याचा लागेल ठिकाण ।कवि हैबती नाथ निरंजन वरदान ।कृपा हस्त आहे शिरीं देत कवितेसी मतिदान ।सवाई डफावर ब्रिद कविता शास्त्रसम्मताची ।वैरी पाहुन लाजती कविता निर्मळ अर्थाची ।३४ ( चढ ) तुम्ही चत्र बोलके विचक्षण बहुसूज्ञान । प्रश्न पुसतोंशोध करा कविमत तांत्रिक ज्ञान ॥ध्रु०॥कवि मताची किती पदें कोणती कसी याचीं नांवें ।कुण्या पदाचीं किती अक्षरें संमित रथ छंदा पहावें ।सर्व पदाची अक्षरगणती किती झाली आधि बोलावें ।किती पुरुष किती स्त्रिया किती न पुस्तक दाखले सांगावे ।कुण्या पदावर कविता करता कवन कोणत्या मतान ॥१॥क पासुन पस्तीस आक्षर एका खडीची जाणावी ।वो ची सत्रा एकून बावन मात्रुका खुण वळखावी ।क जातीचा कोण ख जात तयाची शोधावी ।क ख नातं एक एकाला कसी लागती तयाची पहावी ।ब्राह्मण क्षत्रीय वैश्य शूद्र आधि लावा याचा ठिकाण ॥२॥काळी गोरी रज तम सत्व निवड करून काढा याची ।त्यामध्यें आठरा वर्ण कोणते व खुण सांगा कविमताची ।एक एक अक्षर ते कैसी अटकल बोला वचनाची ।वजन ताजवा यांतच आहे जात कविता करण्याची ।शास्त्रमतामध्यें शोधून पहावे अनुभव युक्ति संधान ॥३॥तुम्ही कवि म्हणविता कवि अक्षरें दोनि कोठे असती ।शरिरी एके जांगी सांगा ज्ञानाची समजल स्फुर्ती ।कविराज हैबति कवन करी नाथ कृपा आहे पुरती ।छंद रसिक रड अक्षर वटिका समयोचित कविता स्मरती ।पिंगळ ग्रंथाविण कविता काय करावी आंधळ्यानं ॥४॥३५ ( उत्तर ) निवड करून सांगतों पदाची जो कवितेचा आधार ।कोणकोणतीं पदें कसी हा पिंगल ग्रंथीं आधार ॥ध्रु०॥पदें कविमताची पंधरा अक्षरें बावन जाण ।बावन अक्षरांत पद हीं पंधर नामें अभिधान ।सात पदें शुभ कविमताची आशुभ आठ अपकारन । शुभ अशुभ कोणती सांगतो ऐकून घ्यावें परिमान ।पुरुष नारी नपुसक किती निर्णय कथितों खचिताकार ॥को॥शुभ पदें कवणाची । अ आ इ ई । अरिष । अंडज ठावी ।धनक । आबोवा ।धनतन । भवखस । पद सात ही उमजावी ।अशुभ उरली । उयाली । झ ग च ख । छायट । ही परीसावी ।ढ ब य प । प र म ल । द ळ ढ । य क्ष ह थ । ही आठ झाली ऐकावी ।नव नारी नपुसक दोन ही बाकीची नर साचार ॥को॥क ख सुधा बावन आक्षरें यासी वडील ।ओंकार ख हा एक कविष्णु ख मधुसुदन अद्वैत पदी हाच दुसरी ।दोनी पुत्र ते ओंकाराचे बंधु प्रमाणें ही जमा धरा ।अ कारी ब्राह्मण । उकारी वैश्य । क वेधरा । ब कारी शूद्र ।व कारीं गोरा । ह कार काळी विचार ॥को॥आ उ म ही रज तम सत्व वडील । ओंकाराची याला ।कवि अक्षरें वो ची पोटी अनु हात स्थळ ओंकाराला ।तेथुन ही अक्षरें जन्मती वजन परम महान त्याला ।कवि हैबति म्हणे खरे खोटे पहा पिंगल ग्रंथाला ।प्रसन्न नाथ निरंजन झाला कृपाकरून करितो पार ॥को॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP