शाहीर हैबती - गीतेवरील

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


अंतःकरणीं पुनरावृत्ती हारी पदी लावावी ।
लक्ष स्वरूपीं लावुन धुरंधर वाचा त्यागाची ।
योनी लक्ष चौर्‍यांशीमध्यें नरदेह उतम रे ।
सर्व जाणता आसुन आसती कां पडला भ्रम रे ।
विषय नादीं लावुन पाहा चुकला अनुक्रम रे ।
भ्रमीला मायाभ्रमीं म्हणोनी झाला बहु भ्रम रे ।
चाल -
निश्चल बुद्धी नाहीं । न उमजे हीत पण कांहीं ।
हित असो हृदयांत बुरीत मम कृती । गांवी
गीताश्लोक बोलले हरी ऐकावे आर्था ॥१॥
‘ सर्व धर्मान् परित्यज्य ’ सांडी मुदित स्वार्था ।
‘ मामेकं शरणं व्रज ’ मज शरण ये पार्था ।
सर्व धर्म त्यागोनि मदर्था माझिया हितार्था ।
पार टाकोनी भ्रम सारा करी परम स्वरूपीं धरी धारा ।
हीत असुन हृदय मम किती गावी ।
लक्ष ‘ अहंत्वा सर्वपापेभ्यो ’ असे बोले श्रीहरी तो ।
हे पार्था दृढजीवी धरी म्हणून सावध करितो ।
मदवचनीं विश्वास अर्जुना, मी त्या उद्धरितो ।
चाल -
मजला मनि धरती । ते निश्चळ उद्धरती ।
म्हणोनी ही शुद्ध मती । स्मरणी वागावी ।
लक्ष स्वरूपीं लावुन धुरंधर वाचा त्यागावी ॥२॥
‘ मोक्षयिष्यामि मा शुचः ’ मोक्ष झाला ।
तद्रुपता लाधली पाहा गेला निज ठाया ।
मनु सकळ या धनामध्यें धरूनी स्मरणाला ।
स्वस्थ आसा पद शरण ये, घे हरी रूप सौख्याला ।
चाल - हैबती पदीं मन ठेवी । नामामृत रस सेवी ।
गुरुपदीं नित्य नवी । ही शिस्त लावावी ।
लक्ष स्वरूपीं लावुन धुरंधर वाचा त्यागावी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP