मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| देवास प्रार्थना शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - देवास प्रार्थना शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती देवास प्रार्थना Translation - भाषांतर १दिनजनतारक सुखदाई । ए पंढरपुरची आई ॥विठ्ठला विषयलोभ मायाजाळीं । पडलों बहुत जंजाळी ॥संसारदुःखाची जाळी । गुंतलों जसा मीन जळीं ॥कामानळ हृदय जाळी । अंधार गडद तम जाळी ॥चाल - याविषयीं मनीं जरी धरिसी । तरी यांतुनि पार करिसी ।उद्धरसी अवघड कांहीं । घातली दृढ मिठी पायीं ॥१॥हरि तारिलेंसी बहुताला । तें ठाऊक आहे संताला ॥मी बुडतों या वक्ताला । मज काढि धरूनि हाताला ॥मजविषयीं आळस चित्ताला । आग लागो या संचिताला ॥चाल - तस्मात थोर प्रारब्ध । त्यानें तुज केलें स्तब्ध ।ही वाटे मज नवलाई । सर्वोत्तम शेषशायी ॥२॥चांडाळ पापी उद्धरले । हें माझें हृदयीं भरलें ॥मजविषयीं कठिणपण धरलें । तरि काय देवपण उरलें ॥नामानें पर्वत तरले । तें ब्रीद आज काय हरलें ॥चाल - परब्रह्म भगवंत । तुजहूनि कोण आहे बळिवंत ।किती गे अंत पाहसी विठाई । कटिवर गण आले ठायीं ॥३॥तुजवीण पंढरीराया । आहे कोण दुजा ताराया ॥करूनिया कर कृपाछाया । दे मजला निजपदीं ठाया ॥नुरवी सकळ हा भ्रम वाया । पुनरावृत्ति न लगे काया ॥चाल - लडिवाळ तुझा मी तान्हा । पाजी प्रेमप्रिति पान्हा ।वत्साप्रति जसि गाई । म्हणवुनि स्तुती हैबती गाई ॥४॥२स्वहित करून घ्या मनुजा कर्म असे नडवी ।स्वहित करावें परन्तु योग जन अडवी ।मुक्तिबंधन करावें परंतु मोह माया गडवी ।कवि हैबती म्हणे मायेचा फासा कोण सोडवी ।३ मूळ आधीं ओंकार बिंदु युक्त करा श्रवण ।शब्द चक्र बीज प्रचिती घ्या संमतिला लावुन ॥ध्रु०॥नसें नामरूप ब्रह्मनिरामय हा ज्याचा गुण ।शुद्ध ब्रह्मीं ‘ ब्रह्म मी ’ ऐसें झालें स्फुरण । ‘ अहं ब्रह्म ’ म्हणतांची ओंकार झाला त्यापासून ।तोचि पहा ओंकार पंच प्रकार दीर्घ पूर्ण ।भेदअभेदाविरहित सर्वगत तो भगवान् ।“ एकमेकाद्वितीयं ब्रह्म ” तैसी आहे ठेवण ॥१॥प्रथम तारक ज्ञात्वा रजोगुण ब्रह्मा अकार ।द्वितीयं इंद्र कवच तो सत्वगुणी विष्णू उकार । तृतीयं कुंडलाकार रुद्र तमोगुणी देव मकार ।अर्धचंद्र तोच चतुर्थ अभिदान त्यास ईश्वर ।पंचम बिंदु तोच सदाशिव साराचें सार ।सोहं ब्रह्म जे प्रणव पंच देवाचा हा ओंकार ।“ ऊर्ध्वमूल मधः शाखा ” वृक्ष ‘ उष्वा ’ आंत त्रिभूवन ॥२॥स्थूल देह ऋग्वेद वैखरी त्रिकूट ते विधिचें ।मात्रा रहस्य ऐका स्थूळ तें आहे जागृतिचें ।लिंग देह यजुर्वेद मध्यमा श्रीहाट विष्णुचे ।दीर्घ शून्य मातृका हें विवरण श्रीहाटस्थळिंचें ।पश्यंति सामवेद कारण गोल्हाट रुद्राचें ।मातृका सुफलित नेत्रीं स्थान सुषुप्तीचें ।त्यवरते त्यापरते त्याची धर आठवण ॥३॥औटपीट हा सोमेश्वर तो आले चौथेस्थानीं ।तो महा कारण देह अर्ध मात्रा आहे ते भुवनीं ।वेद अथर्वण परावाचा ही आहे ते ठिकाणीं ।तेथें दिव्य सुंदरी म्हणति जीस तुर्या कामिनी ।पंच बिंदु सदाशिव भ्रमर गुंफा स्थानीं । अनिर्वाच्य तें परात्पर ज्ञान देह उन्मनी ।अगाध महिमा तेथें त्रैलोक्याची सांठवण ।कविराज हैबति सदोदित नाथांचें करी ध्यान ॥४॥४नरदेहसाधन योनि लक्ष चौर्यांशी फिरतां । एकदां या नरदेहा आला ।येथें जरी साधन घडेना । तरी जन्म व्यर्थची झाला ।सर्व देहांमध्यें उत्तम नरदेह । जाणपणा अंगीं असतां ।ममता माया मोह भ्रमीं । लागुनी भ्रम पडला वेडा नसतां ।अंश ब्रह्मींचा असुनी तरी । प्रपंचाची जडली आस्ता ।क्षणिक अशाश्वत सत्य वाटलें । म्हणुनी चुकला सगळा रस्ता ।सोहं सोहं विसरुनी धरलें । कोहं शब्द को मार्गाला ॥ध्रु०॥‘ मनुष्याणां सहस्रेषु ’ यापरी आहे गीतावाणी ।सहस्रमनुष्यांमधि साधन करणार विरळा प्राणी ।तया सहस्रामधें निवडला लक्ष जयाचें हरिभजनीं ।भजनी नर सहस्रांत निवडला युक्तिवान ब्रह्मज्ञानी ।ब्रह्मज्ञान वेगळें घरोघर चाहुलीवर भुकनेवाला ॥ध्रु०॥‘ कश्चिद्देहांतर सिद्धिः ’ या सहस्र ब्रह्मज्ञानियांमध्यें कळला ।‘ यततामपि सिद्धानां ’ सहस्र सिद्धि एक हरिकडे वळला ।सिद्धिपुरुष नेमधारी जो का हरिस्मरणीं नाहीं चळला ॥१॥‘ कश्चिन्मां ’ भजनीचें तत्त्व नाकळे यदर्थि अडकळला ।जिव्हाळा नाहीं तरी मग काय करावें भजनाला ।व्याप्तितत्त्वता तत्त्व जाणता तोचि हरिस्वरूपीं स्थिरला ॥२॥त्यानें ओळख मागील धरली ज्योतिरूप ज्योतिंत जिरला ।जन्म सफळ लवणाचा पुतळा जळामध्यें जैसा विरला ।म्हणे हैबति धन्य तोचि अक्षय्य पदीं नाहीं सरला ॥३॥प्रसन्न नाथ महाराज मति देतसे कवनाला - कवित्वाला ।तेथें जरी साधन घडेना तरी जन्म व्यर्थचि गेला ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP