शाहीर हैबती - गण
शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.
१
श्रीगजानना गणपति । मंगलमूर्ति । द्यावी मज मती
समारंभाला । हो । प्रसन्न व्हावें मजला ॥ध्रु०॥
तुझें नाम कोणी न घेती । शीघ्र कवि गाती । यश
नाहीं त्याला । फड प्रसंगाला । तिन्ही लोक सिद्ध
नाथ म्हणती । गंगा पार्वती । आवड सांबाला । हो ।
ब्रह्मा विष्णूला ॥१॥ कविराज म्हणे हैबति । नमुन
गणप्ति । कैलगी डफाला । हो । धाक वैर्याला ॥२॥
२
( कलगी - तुर्याच्या गाण्यांतील हैबतीबुवांचा गण )
गणराज यावें गणपती । करतों मी स्तुती । सभेमध्यें
तुजला । प्रसन्न व्हा मजला ॥ध्रु०॥
तुझें नाम कोणी न घेती । शीघ्र कवि गाती ।
यश नाहीं त्याला । फड प्रसंगाला । त्रिलोक
नाथ सिद्ध म्हणती । गंगा पार्वती - आवड
सांबाला । ब्रह्मा विष्णुला । कविराज म्हणे हैबति ।
कलगीवाला धाक वैर्याला ॥जी जी॥
ह्या गणांत खोच आहे व ती खोच प्रभावी आहे. हैबतीचा पक्ष कलगीचा, हें या गणांतील स्पष्ट वचनानें सिद्ध होतें.
३
गण गणपति सरस्वती नमो गण थोर । आधि नमितो
माता - पिता । तेथुनी जग सारें । मातोश्रीनें दूध पाजिलें ।
अमृताची धार । केला हाताचा तिनें पाळणा । माया
लोभ फार । केले नेत्राचे दिवे जिनें भोगले कष्ट फार ।
कवि हैबति म्हणे मायेचा मोठा उपकार ॥
ह्या गणांत कवीनें आपल्या मातापित्यांना वंदन केलें असून आईंचें ( मातेचें ) महत्त्व सांगून तिचा महिमा गाइली आहे. ( कोणी म्हणतात, कलगीला माया असें समजून तिचें महत्त्व रूपकांत दाखविलें आहे. )
N/A
References : N/A
Last Updated : March 16, 2017
TOP