मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| चुडा कटाव शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - चुडा कटाव शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती चुडा कटाव Translation - भाषांतर गोकुळामध्यें कृष्ण नांदतो बहु आनंदानें । मातेच्या उसन्या साठीं देवानें घेतलें लहानपण ।वैराळाचें रूप घेऊनी निघाले भगवान । कौंसाच्या गांवांत जाऊनी देवांनीं केला मुक्काम ।चुडा भरा बायांनो, आवघ्या जडितांचं लेणं । मिळून नगरच्यानारी चुड्य़ाचें करती खंडण ।उघड उघड पेटारा तुझा दाव सोनेरी । एका एका चुड्याचें मोल तुम्ही सांगा खरोखरी । सव्वा लाख सोने टक्के ऐक सुंदरी । कोठें सूर्याचें तेज पडलें त्या चुड्य़ावरी ।शाक शाक पेटारा चुडा तुझा मोलाचा भारी । आम्ही गरीब गवळ्याच्या सुना दुबळ्या संसारीं ।तुझा चुडा लेईल ती भाग्याची नार । भाग्याची नार कमळजा कौंसाची थोर ।तशीच खबर गेली कमळजेच्या वाड्यास । कोण देशीचा वैराळ आला आपल्या नगरास ।जा गं जा गं दासिंनो घेऊन यावे वैराळासी । सवें आणावें वैराळासी चुडा मी भरतें मनगटासी ।चाल - कमळजेचा शब्द ऐकला । हुडकुं लागल्या वैराळाला ।उभा होतां माणिक चौकाला । बोलती त्याला घराकडे चला ।पुढें दासी मागे वैराळ आणले वाड्यासी ।उठून तिनें चंदनाचा पाट टाकला बसायासी ।कोण गांव कोण नांव, कुठले रहिवासी ।तुझे सारखा भाचा माझा नांदे गोकुळासी ।नाहीं गांव नाहीं ठाव आम्ही मुलुखाचे रहिवासी ।चुडा भराया आम्ही हिंडतो दाही देशीं ।उघड उघड तुझा पेटारा दाव सोनेरी । एका एका चुड्याचें मोल तुम्ही सांगा खरोखरी ।सव्वा लक्ष सोनें टक्के ऐक सुन्दरी । कोठें सुर्याचें तेज पडलें त्या चुड्यावरी ।तेव्हा कमळजेनें हात दिला देवाचे हाताशीं । देवाचे हातासी चुडा मी भरतें मनगटाशीं ।चाल - देवानें फिरविली माव, लाविली कळ त्या मनगटाशी ।घाबरी नार तेव्हां बोले वैराळाशीं ।आरे आरे वैराळा, चुडा तूं माझा सैल कर । चुडा सैल कर मनगटीं लागली कळ फार ।जा गं जा गं दासींनो आणा कुणी विळा खिळा सुरी ।चुडा कापण्याचें खङ्ग माझें राहिलें घरीं ।उठून तांतडी कमळजा गेली पतीच्या महालासी ।उशाखालचें खङ्ग आणुन दिलें वैराळासी ।अहो अहो मामी जावुन सांगा मामासी । गोकुळचा मी ।कृष्ण देव आलों युद्धासी ।अहो अहो महाराज, तुम्हांशीं काळझोप आली ।उशाखालचें खङ्ग चोरी भाच्याने केली ।कौंस गडबडून उठून त्यानें पाहिलें कृष्णाला ।पाहुन देवाचें मुख कौंस चिंतागती झाला ।अरे अरे भाच्या तू नको मारू मजला ।तुझ्या घरचा बंदी होऊनी राहीन दरवाज्याला ।कौंस जेव्हां पळूं लागला हाक मारून उभा केला ।एका हातानें शीर उडविलें पडलें चरणीला ।तसेंच शीर घेऊनी गेले बंदीशाळेला ।कृष्ण ओवाळीता शीर त्यानें ठेवलें आरतीला ।एकुलता एक बंधु त्वा कैसा मारीला ।सहा मुलें मारलीं तुझीं तेव्हां कष्टी नाहीं झाली ।एका शिरासाठीं आई तूं घाबरली ।ऐसा वैरी मारिता दोष नाहीं जननी ।कवि हैबति म्हणे आनंद झाला गोकुळ अंगणी ॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP