मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| अमृतानुभव शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - अमृतानुभव शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती अमृतानुभव Translation - भाषांतर ( उत्तर ) गुरुकृपानुभव प्रत्यय परीसा उत्तर प्रश्नाचें ।ऐकावे रोकडे निगमसारात वामनाचे ॥ध्रु०॥त्रिगुणापासुनी तत्त्व एक ती एकावुन जाण ।पुत्र पिता महापिता एक एकावुन निर्माण ।प्राण जोत ब्रह्मीची इंद्रिय पत्रा प्रमाण ।दशवायो ब्रह्मासी विजाती ऐसें अनुमान । बंधुत्वें वर्तती नाहीं कोणामध्यें अभिमान ॥१॥बुद्धी कमळासन मनशशी हा प्रत्यय परिमान ।अंतःकरणाप्रति पुत्र शालक प्रमाणाचे ।एक एकाचे वचनीं ते आप्त एकमेकाचे ॥भ्रांत विमनस्व वनांत सर्वही आली ब्रह्मीहून ।पांच मिळून एक प्राण ज्याला म्हणती निर्गुण ॥२॥येणें जाणें एकवाट अद्वय मार्गें करून ।जीव प्रकृती शिव पुरुष ब्रह्मीं वस्ती पूर्ण ।नाद छंद ते आपण धरणीसी धरता आपण ।पाप पुण्य ते आपण शरीर चालविता आपण ।कुर्म पाहे ते नेत्रीं कर्कशु एके कर्णाचे ॥३॥झोपत जागे चित्त आहे चालवणें प्राणाचे ॥आला अंश ब्रह्मीचा परी तो ब्रह्मींच राहणार ।गेला नाहीं कुठें आहे जेथील तेथें सार ।तंतु तोचि आपण रू, आपण ऐसा निर्धार ।कोष्ट तोचि आपण शेला तो आपण साचार ॥४॥आपण आपला पुत्र वडील तो आपला विस्तार ।आपण आपला चेला आपण गुरुनाथ सार ।प्रश्नाचें उत्तर पाहावें वामन वचनाचें ।वसिष्ठ निर्णय ह्याचे सांगतो सिद्धलक्षणाचे ।निज ध्यास मानसीं हेत श्रीगुरुपदीं धरिला ॥५॥त्याच निश्चयें करून पार हा भवसिंधु तरला । ध्यास जसा आळींकेचा एकच तत्त्वी सरसरला ।भृंगी झाली आळींकेची हा समभाग हेत ठरला ।नाथपदीं हैबती ध्यान करिता हे स्तवनाचे ।कृपाहस्त मस्तकीं मतीबळ देता कवनाचें ॥६॥वरील कवन हें हैबतीच्या अमृतानुभवाचें कवन आहे. ‘ तत्त्व मसि ’ चा सिद्धान्त स्पष्ट करून, गुरूकृपेनें मे भव सिंधु तरलों, अळींकेचा गुरुकृपेनें भ्रमर झालों व तरलों, असा हैबती निर्वाळा देतो. N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP