मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| देहावरील मळा शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - देहावरील मळा शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती देहावरील मळा Translation - भाषांतर मळा मळा म्हणवितां मळ्याची लांब आहे कळा ।निराकार निर्गुण निराकारांत झाला मळा ।औट हताची विहीर काढली पाणी वाहे झुळझुळा ।होता पूर्वीचा मळा, मळ्याला पैलाच जीव्हाळा ।आधार चक्रावर बांधला वरोटा हरी नाम सोळा ।निराकार आधार मायेचे मकार बनविले चकार करे चाळा ।पंच तत्त्वाचा नाडा सुंदर कर्ता आहे वेगळा ।मन पवन बैल स्थानीं मळ्याचा धनी वनमाळा ।शंभर वर्षांची गणीत आहे पाही नित्य कळा ।पाय नसुन मोट हाकितो तो मायेचा सोहळा ॥ध्रु०॥चार पाटानें पाणी वाहतें सात वाकु-द्याला ! नऊ दंड भीजवलें जागा कोर्डा कुठें राहिला ।चाल - पाणी मळांत वाहे झुळझुळा । सहस्र दळ मुखीं जिव्हाळा । देह औट हताचा मळा । ठाईं ठाईंलावल्या कला । मळ्याचा कर्ता धनी वेगळा ।मिळवणी - त्या मळ्याचा भाग निराआळ वर्णूं किती वेळां ।निराकार निर्गुण निराकारांत झाला मळा ॥१॥तिनशें साठ रोप मळ्यामधीं लाविल्या केळी । नाना तर्हेच्या खास लावल्या फुलांच्या करदळी ।दहा लक्ष मळ्यामधीं बोरी आणि बाभळी ।सवा लाखाची गणीत फळाची चार घड नारळी ।देह मळ्याचा राखन धनी एक तो किती वेगळा ।चाल - शंभर वर्षें झाला करार । पंचवीसांत भर येनार ।मग झाला त्याचा करार । त्याचा मृत्यु भुमित खाणार ।मिळवणी - कविराज हैबति नाथपदीं अखंडित लळा ।निराकार निर्गुण निराकारांत झाला मळा ॥२॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP