स्कंधारुढ स्थिर बघुनिया प्रेत येतां स्मशानी
झाला भाग्योदय मम असें डोंब चित्तांत मानी।
डोंबा प्रेत प्रमुदित करी जेंवि नित्य स्मशानी
तैसा दृष्टा सुजन भुवनी घेरिला संकटांनी ॥१॥
गर्तेमध्यें जर ढकलिले साधु म्यां पुण्यशील
स्वर्गद्वारे मिळतिल मला सर्व उन्मुक्तकील।
ह्या आशेने खल जन रची थोरळे गूढ ह्यांमुळेच ॥२॥
जो पापी तो मलिन सरणी आदरी स्वीय कार्या,
खोटें बोले वचन, फसवी लाज सोडोनि आर्या।
पापात्म्याची कृति असुखदा नित्य साधूंस होते,
कां पापत्मे जगिं उपजवी विश्वकर्ता अहो ते? ॥३॥
देखों हत्या खल करि यशोमानमैत्रीधनांच्या,
शक्ता त्यांच्या न परिगणनीं शारदेचीहि वाचा।
जी जी हत्या करि वरुनिया क्रूरचेष्टातिरेक
ती ती मानी त्रिदिवपथिं तो पाहिरी एक एक ॥४॥
हर्षे दस्यू विपिनिं बघतां एकला अध्वनीने,
हर्षे सर्प क्षुधित असतां भेक देखोनि पीन।
किंवा हर्षे जलिं बघुनिया नक्रही वारणातें,
तैसा हर्षे खल जन सदा देखतां सज्जनातें ॥५॥
स्वार्थासाठीं खल विभुमुखोद्गीर्ण चाटील लाला,
पीयूषाची विमल सरणी तीहि वाटेल त्याला।
स्वार्थासाठीं त्यजि खल अहो आपुलीं सर्व खंत,
पापात्म्याची सतत पदवी मानिती गर्ह्य संत ॥६॥
पापात्म्याचा स्तव करिल जो त्यास भीती न राहे,
पापात्म्याला धन वितरि जो त्यास तो गोड पाहे।
पापात्म्याला वळवुनि तया जो निरोधू घसेल
त्या दीनाला शरण न कुणी ह्या जगी आढळेल ॥७॥
ज्याच्या पोटी खर विष, मुखी आज्य हय्यंगवीन
त्य कुंभाचे परि खल असें कोण बोले कवी न?।
मृद्वी वाणी खलजनमुखीं, द्वेष चित्ती निगूढ,
त्या पापात्म्यावरि भरवसां कोण ठेवील मूढ? ॥८॥
कीर्ति प्रेष्ठा समजुनि सदा रक्षितो संत तीस
तीतें नाशी खल वृक जसा छागलीसंततीस।
खोटया वार्ता उठवुनि करी दृष्ट सत्कीर्तिहानी,
स्वलोकाची सरल पदवी तीचि तो काय मानी! ॥९॥
साधुच्छिद्रें करुनि उघडी थोर तो हर्ष भोगी,
ब्रम्हानन्दीं अभिरत असा तो गमे शुध्द योगी।
पापात्मा वाकशर जनयशीं प्रेरितां हर्ष तैसा-
पावे काक क्षत डवचितां चंचुनें नित्य जैसा ॥१०॥
पिंडासाठी सतत हलवी श्वा अहो स्वीय पुच्छ,
पायीं लोळे जरि ढकलिला दूर मानोनि तुच्छ।
पापात्माही श्वचरित करायास हो नित्य सज्ज,
स्वार्थासाठी नरपदरजा चाटि तो वीतलज्ज ॥११॥
लावालावी करुनि, धनिकां शंसुनी मद्यपान।
आत्मस्तोत्रें करुनि अनृतें श्रेष्ठपात्राधिकार,
देशद्रोहा करुनि खल तो मेळवी सौख्य फार ॥१२॥
पापात्म्याला विदित असतां लोकमार्गस्थ गती
तो दृष्ठत्वें कळवित नसे, तो खरा दु:खकर्ता।
पापत्म्याला सतत सुखवी लोकगर्तानिपात
दैत्या जैसा मुनिवरतपीं घोर होतां विघात ॥१३॥
पापात्म्याला न परिसवतें पंडिताची प्रशंसा,
धिक्कारी तो अविरतें नरा सर्वलोकावतंसा।
खोटयानाटया पिकवित असे कीर्तीनाशार्थ कंडया,
वंद्याचारां ठरवित असे तो सुनारीस रंडया ॥१४॥
ध्वांक्षा जेवीं पशुतनुवरी स्फाटेदुर्गेधि रानी,
पापात्म्याला सुखवि भुवनीं तेविं सत्कीर्तीहानी।
निंदावाक्ये जनहृदय तो दिसतो मर्त्य साधुस्वभावी
त्यातें गांजी, अनवरत तो नाडि, पीडि, सतावी।
त्याचा साधुच्छ्ल करुनिया अंतरात्मा सुखावें,
ह्यासाठी तो छल करितसे साधुचा सर्व भावें ॥१६॥
पापात्म्याला दुरित करणें वाटतें स्वर्गदायी,
पुण्यातें तो तुडवित असे आपल्या क्रूर पायीं।
सारे केश स्फुट गणवती गर्दभांगावरील,
पापात्म्याला कुटिलकृतिंची कोण संख्या करील? ॥१७॥
स्वार्थासाठी खल जन करी सज्जनाची चहाडी,
पाडी दु:खी अनृत वचने सज्जना व्यर्थ नाडी।
पापात्म्यांशी कधिहिं न तुम्हे येउं द्यावा प्रसंग
ऐसें विद्याधर कथितसे, कीं न हो शांतिभंग ॥१८॥