मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा| ईश्र्वर एकच प्रसंग अठरावा प्रशस्ति मनाच्या लीला मन ताब्यांत नाहीं तर दगा निश्र्चित मन जतन केल्यास ब्रह्मप्राप्ती विहंगम मार्ग त्रिकुट ते श्रीहाट कूच गोल्हाट व औटपिठ अर्धमातृका ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई समाधि समाधीची व्याप्ती समाधि-अवस्था-प्रकार नामस्मरणानुसंधान नामापाशी ईश्र्वर नाममहिमा कर्कोटक कथा कर्कोटक कथा निंदकामुळेंच साधुची मळशुद्धि साधूंस तळमळ यातिवंशाचा संबंध नाहीं वादिक भक्त दुकाळे साधू सोंवळें-ओंवळेपण शुद्ध वैराग्य हरिनाम श्रवण राम कोणता? - श्रावणकथा ईश्र्वर एकच कलियुगधर्म कलंकी अवतार ईश्र्वर निवाडा यमयातना-जीवास दंड सृष्टि-प्रलय ग्रंथसमाप्ति ग्रंथलेखनकाल प्रसंगसमाप्ति प्रसंग अठरावा - ईश्र्वर एकच श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत ईश्र्वरास नामें सहस्र पण ईश्र्वर एकच Translation - भाषांतर बेरदिलाल खइर । बहु अलाकुल सेन कादर । हें चौथ्या कलम्यांत पढती जाहिर । मुसलमान परियेसा ॥२४६॥जैसी एका शरीरास अनेक नांवें । तैशीं सहस्र नामें ओळखा भावें । परी एक मूळ नाम करावें ठावें । सद्गुरु सेवूनियां ॥२४७॥जैसें सांडूनियां श्रीमुखीचिया नांवा । गाला नाका काना बोभाती हावा । आळवितां कर चरण त्वचा सावा । जाब नेदीत कांहीं ॥२४८॥श्रीमुख ठावें न पडें बाष्कळपणें । अंगीं वेडे झकती वेड्यांच्या वचनें । भांग धोतरा खाऊन मातती अज्ञानें । प्रपंच पाखांड बुद्धि ॥२४९॥अंगीं अविद्या विषयाचा वारा । त्यावरी पिती पेंडा शिंदीसरा । बाष्कळ बरळतां सर्वेश्र्वरा । वंचलें पैं अग्र बुद्धि ॥२५०॥अजा मेंढी म्हैस गाय पवित्र । या चहूंचे क्षीर सेविलें साचार । बैल टोणगा मेंढा अजापुत्र । हे बंधु लागत क्षीरभागी ॥२५१॥जितुकें जारजामाजीं जन्मले । तितुक्यांचे एक गोत्र नातावलें । ओळखी न धरतां उन्मत्त भ्रमले । अविचारी बुद्धी ॥२५२॥जितुके अंडजखाणी तितुके एक गोत्र । श्र्वेदजखाणीचाहि तोचि विचार । उद्भीजखाणीचा ओळखे निर्धार । तेहि एकचि गोत्र पैं ॥२५३॥दुसर्याचा गळा कापी ते अवसर । ते वेळीं जरी गंवसे आपुला कर । तळमळ करी बोंबाचा दणत्कार । रांडापारें देखील ॥२५४॥भूक निद्रा मदन स्वार्थ वैरी । या पांचास नाहीं परमार्थ हेरी । आत्मज्ञानी होय तो यांस आवरी । येरें फाडफाडून खादलीं ॥२५५॥ऐसी हे केली परमार्थ विवंचना । विवेकें श्रोत्यांनीं आणावी मना । बोल न लावावा प्रश्र्निकपणा । स्वार्थबुद्धीनें ॥२५६॥हा निर्गम सांगेन आगम विचार । घरोंघरीं पाप होईल थोर । पाखांड भेणें निज योगेश्र्वर । मौनें लपतील ॥२५७॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP