मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
मनाच्या लीला

प्रसंग अठरावा - मनाच्या लीला

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


अरे अरे मना चतुरा । एकास दाविला चौर्‍यांशीचा फेरा । एकास नेलें मुक्तियाचिया द्वारा । दोहींकडे खेळसी तिळा तांदुळा ॥५॥
मना एकास केलें महा ॠषि । एका त्‍वां गोविलें व्यापारासी । एकाकून उमगविल्‍या शूद्री दासी । ऐसे मर्कट चाळे तुझे ॥६॥
मना तूं आपला आपण राजा । आपल्‍यास आपण रागेजसी वोजा । आपला आपण घेसी मोझा । आपला आपण चोर साव ॥७॥
मना झोंप करुनी निजसी अघोरीं आपण फिरसी परद्वारीं । स्‍वयें भोगिसी सोगया नारी । पहातां तूं कोणास न दिससी ॥८॥
पवन हेतुवरी फिरसी मना । बाहेर भीतरीं करिसी विवरणा । योगी नेणती तुझ्या खुणा । स्‍वप्न अवस्‍थेंत ठकियेलें ॥९॥
मना तुज ठेवूनियां घरीं यात्रे चालिले वारकरी । पावन नव्हेत अद्यापवरी । फुकट कुडी कष्‍टविली ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP