प्रसंग अठरावा - समाधि-अवस्था-प्रकार
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
माया शक्तीच्या संगे जाणा । समाधी घेतल्या सगुणा । लक्ष चौर्यांशीच्या भ्रमणा । स्थूळ समाधि ॥५९॥
या वेगळ्या एकविस समाधी । त्या स्मशानवैराग्यें उपाधी । जीवास पडों नेदितील शुद्धि । तर्कासंगें ॥६०॥
एकविस उमटती लहरी । त्यामाजी सहज समाधि बरी । सद्गुरुकृपा होय पूर्ण पुरी । तरीच लागेल बापा ॥६१॥
ऐशा या समाधीच्या संगें । माझीं मज सानीं मोठीं सोंगें । परी निवांत अष्टहि अंगें । स्वयंभपणें ॥६२॥
ऐका समाधिच्याहि अवस्था । अनुहातीं ईश्र्वराची सुषुप्ता । तिचाहि आनंद गुणवंता । समान नोहेचि कांहीं ॥६३॥
सिंधु असे स्वयंभपणें । तरंगासी होय पहा येणें जाणें । तैसें हें माझें अवतरणें । देह समाधिलागीं ॥६४॥
लहरी गुरुकृपा समाधि जाणा । लाभली शेख महंमद विज्ञाना । गिळिलें आयागमन भाषणा । निर्वाण निजवावें ॥६५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP