प्रसंग अठरावा - विहंगम मार्ग
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ऐसें मनाचें केलें समाधान । मुखावरून हात उतरून । इशारते दान दाविलें मैदान । तें ओळखावें अनुभवीं ॥२०॥
उर्ध्वंगती विहंगमाची वाट । पश्र्चिम पंथें दीर्घ नीट । पुढें मीन मार्ग चोखट । देखियला ॥२१॥
तेथें महा थोर कपाट । मुंगीच्या डोळ्याएवढी वाट । औट मातृका सहस्र दळ नीट । तेथें तेजी उभा केला ॥२२॥
मग निशाणा घालूनियां घावो । यशवंत जाला आत्मारावो । मारूनियां दरवान संदेहो । गड घेतां जाला ॥२३॥
मग स्थिर होऊनियां मन । निश्र्चळ चालिलें ऊर्ध्वं गगन । पश्र्चिम पंथें जाऊन । साधिलें काज ॥२४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP