मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
यातिवंशाचा संबंध नाहीं

प्रसंग अठरावा - यातिवंशाचा संबंध नाहीं

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


सैय्यद ब्राह्मण उत्तम वंशीं । कार्य नाहीं याति नांवासी । जवादी जन्मली मांजराचे कुशीं । कैसी हीन कुळी म्‍हणावी ॥१५१॥
सैय्यद ब्राह्मण उत्तम याती । भ्रष्‍ट अनाचारे वर्ततीं । पवित्र परियेसा उत्तम कीर्ती । कवण वाढवी त्‍यांचीं ॥१५२॥
पहा बिबव्यातें दूर धरिती । गोडांब्‍या शुभ्र शेलीं बांधिती । मेवा म्‍हणोनियां भले सेविती । व्रत उपवास फळ आहारीं ॥१५३॥
अवगुण दंडूनियां पूजा । हे तंव परंपरा चालली वोजा । रंकाच संचितगुणें जाला राजा । विश्र्वजन तया वंदिती ॥१५४॥
तैसा निजभक्त भलतिये यातीचा । संचित गुरुत्‍वें जाला ईश्र्वराचा । दोष त्‍याच्या यातिकुळाचा । आठव करूं नये ॥१५५॥
पूर्वीं वेश्या करित होती अनाचार । तियेचा राजानें केला अंगिकार । मासाहेब म्‍हणती वजीर सरदार । वेश्येपण लोपूनिया ॥१५६॥
पृथ्‍वीचे अमंगळ ओहोळा । पहा तीर्थीं गंगा जाली एकवेळा । तैसे साधूच्या याति विटाळा । उरी नाहीं विश्र्व सोंवळें दिसे ॥१५७॥
आळंगिल्‍या चर्मकाची विखणें । नित्‍य लेपाळलीं त्‍या मांसानें । परिस लागतांचि होय सोनें । लोखंड मोलें मागों नये ॥१५८॥
सांगतां साधूचा वृत्तांत । होईल दृष्‍टांताची मात । आतां जनाचें वेगवगत्र । अज्ञान सांगो आरंभिलें ॥१५९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP