रूपक अलंकार - लक्षण १८
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां केवळ शब्दरूप साधारण धर्म असल्याचे उदाहरण हें :---
“अक्ष संघातांनी युक्त [(१) इंद्रियांच्या समूहांनीं युक्त (२) बिजसमूहानें युक्त,] सर्वदा सरोग [(१) स + रोग = रोगग्रस्त (२) सर: = ग = सरोवरामध्यें असलेलीं] अशीं प्राण्यांचीं शरीरें साक्षात् कमळेंच आहेत यांत संशय नाहीं.”
ह्या श्लोकांत, सरोग वगैरे शब्दरूप साधारण धर्म शब्दानें सांगितलेले आहेत म्ह० लुप्त नाहींत आणि म्हणूनच ते समजतात. ते शब्दानें सांगितले नसते तर, ते साधारणधर्म म्हणून समजलेच नसते. वरील दोन साधारण धर्म श्लिष्टशब्दरूप असून, त्यांपैकीं पहिला अभंग श्लेष व दुसरा सभंग श्लेष आहे.
अशाच रीतीचा साधारण धर्म ज्या ठिकाणीं हेतु अथवा कारण म्हणून सांगितला असेल त्या ठिकाणीं हेतुरूपक होतें. उदाहरणार्थ :---
“हे प्रभो, पाच बोटे असलेला तुझा हात साक्षात् कल्पतरूची शाखा आहे. तो तसा नसता तर, त्याच्या योगानें सर्व मनोरथ पूर्ण कसे झाले असते ?”
अशाच रीतीनें :---
“प्रियकराच्या विरहानें कोमेजून गेलेला तुझा गाल हे सुंदरी, कामव्याधीमुळें साक्षात् निर्मळ मृगांक आहे. [मृगांक शब्दांचे दोन अर्थ (१)
चंद्र व ९२) कापूर; आणि मनोभवव्याधिमत्त्व ह्याचे तीन अर्थ :--- (१) कपोलाकडे - कामव्याधियुक्त, (२) चंद्राकडे - कामव्याधि उत्पन्न करणारा, (३) कापराकडे - मनांत उत्पन्न होणार्या व्याधीला हटवणारा.]
ह्या श्लोकांत श्लेषानें मृगांक या शब्दांचे चंद्र व कापूर असे दोन अर्थ करून त्या दोघांचा कपोलावर तादात्भ्यारोप केला असल्यामुळें, हें द्विरूपक आहे व तें द्विरूपक निरवयव आहे (म्हणजे तीं दोन्हीं एकेकटीं स्वतंत्र रूपकें, एकाच कपोल या विषयावर, केली आहेत.) ह्या तिघांनाही लागू पडत असून, श्लिष्ट आहे. अशा रीतीने, रूपकाचे इतर प्रकारही समजून घ्यावें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP