रूपक अलंकार - लक्षण १७
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां हाच अनुगामी धर्म जेथें वाक्यांत सांगितलेला नाहीं असें उदाहरण :----
सकल पृथ्वीचे समृद्ध व अवर्णनीय असें भाग्य; लीलेनें ज्यानें जगाचें निर्माण केलें आहे अशा भगवान शंकराचें महान् ऐश्वर्य; वेदांचें सर्वस्व, देवांचें साक्षात् सुकृत, व अमृताचें साम्राज्य, असें तुझें पाणी (हे गंगे), आमचे अमंगल दूर करो.”
ह्या श्लोकांत, सौभाग्य व भागीरथी ( हे जे अनुक्रमें विषयी व विषय) त्या दोहोंमंधील, स्वत:च्या (म्ह० सौभाग्य व भागीरथी यांच्या) अभवाशीं व्यापक होऊन राहिलेले दुर्भाग्य, परम उत्कर्ष करणारे, इत्यादि साधारण धर्म सांगितले नसून केवळ सूचित आहेत व ते प्रतीयमान साधारणधर्म वरील श्लोकांतील आरोपाच्या प्रत्येक जोडींत अनुगामी आहेत; म्ह्णए ऐसअर्य व भागीरथीचें पाणी ह्यांच्यांतिल अनुगामी साधारण धर्म म्ह० ईश्वराचा असाधारण धर्म होणें हा; वदे व गंगेचें पाणी ह्यांमध्ल साधारण धर्म अत्यंत पवित्रपणा (शब्दश: अर्थ जतन करून ठेव्ण्यास योग्य असणें.) पुण्य व भागीरथीचें पाणि ह्यांमधील साधारण धर्म अत्यंत सुख उत्पन्न करणें; आण सुःदासाम्राज्य व गंगेचें पाणी ह्यांमधील साधारणधर्म अगदीं सामान्य मनुष्यापासून सर्वश्रेष्ठापर्यंत सर्व लोकांच्या जरेचें व मृत्यूचे हरण करण्यास समर्थ होणें, असे, एकामागून एक अनुगामी (पण श्लोकांत न सांगितलेले) साधारण धर्म आहेत.
बिंबप्रतिबिंबभावयुक्त साधारण शर्माचें उदाहरण, आम्ही, विशिष्ट रूपकाचे निरूपण करण्याच्या प्रसंगानें, पूर्वींच दिलें आहे.
आतां उपचरित म्हणजे लाक्षणिक साधारण धार्मचें उदाहरण हें :---
“सतत दुसर्याच्या कार्यामध्ये रत अशा सज्जनांची वाणी अत्यंत माधुर्यानें युक्त होण्याच्या बाबतींत साक्षात् अमृतच असते. अशा सज्जनांचें मन हा समुद्रच असतो. आणि त्यांचें यश हे शरद् ऋतूंतील निर्मळ चंद्राचें चांदणेंच असतें.”
ह्या श्लोकांतील अमृताच्या रूपकांत, विषय जी वाणी तिच्यांतील अत्यंत माधुर्यानें युक्त असणें हा साधारण धर्म उपंचरित (लाक्षणिक) असून तो शब्दानें सांगितला आहे. पण (श्लोकाच्या उत्तरार्धांत) समुद्रा वगैरेंच्या रूपकांत, गांभीर्य वगैरे साधारण धर्म उपरित असूनही, शब्दांनीं सांगितलेले नाहींत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP