Dictionaries | References

हिंग

   
Script: Devanagari

हिंग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : हींग, हींग

हिंग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  अफगाणिस्तान आनी इराणांत जावपी ल्हानशें खांदयेतल्यान एकठांय केल्ले गोम वा दूद जाका उग्र वास येता   Ex. हिंग रोसाक घालतात
HOLO STUFF OBJECT:
हींग
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmহিং
bdहिं
benহিঙ্গ
gujહિંગ
hinहींग
kanಇಂಗು
kasہیٖنٛگ
malകായം
marहिंग
mniꯍꯤꯡ
nepहिङ
oriହିଙ୍ଗୁ
panਹਿੰਗ
sanहिङ्गुः
tamபெருங்காயம்
telఇంగువ
urdہینگ

हिंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
हिंग हगणें To be wasting away under disease: also to pine away.

हिंग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Asafætida.
हिंग लावणें   Call or regard as one's own.

हिंग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एका झाडाचा अतिशय उग्र वास असलेला चीक   Ex. हिंग हा मसाला, फोडणी इत्यादीत घालतात.
HOLO STUFF OBJECT:
हींग
HYPONYMY:
हिंगडा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmহিং
bdहिं
benহিঙ্গ
gujહિંગ
hinहींग
kanಇಂಗು
kasہیٖنٛگ
kokहिंग
malകായം
mniꯍꯤꯡ
nepहिङ
oriହିଙ୍ଗୁ
panਹਿੰਗ
sanहिङ्गुः
tamபெருங்காயம்
telఇంగువ
urdہینگ

हिंग     

 पु. अति उग्र वासाचा एक चीक . हा मसाला , फोडणी इ० त घालतात . [ सं . हिंगु ]
क्रि.वि.  ( व . कुणबाऊ ) इकडे , हंगे ; हिंगे पहा . [ का . ई - हीगे ]
०लावणें   लावून विचारणें मानणें मोजणें - ( नकाराथी प्रयोग ) मानणें ; आदर देणें ; महत्त्व देणें ( हिंग महाग असल्यानें महत्त्वाच्या पदार्थांतच वापरतात , यावरून ).
०हगणें   रोग इ० नीं झिजणें ; रोडावत जाणें ; पिचत पडणें . हिंगडा - पु . १ हलक्या प्रकारचा हिंग ; वाईट हिंग . २ ( निंदार्थी ) हिंग . हिंगणें वाफणें - उक्रि . १ ( पदार्थास प्रथम हिंग लावून मग फोडणी देतात त्यावरून लक्षणेनें - नकारार्थी प्रयोग करून ) करावयाचें कृत्य अपुरें असणें ; आरंभहि नसणें . अझून शेत हिंगलें नाहीं वाफलें नाहीं ; इतक्यांत पट्टी काय म्हणून केली . रोजगाराचा ठिकाणा नाहीं अझून हिंगला नाहीं वाफला नाहीं . २ ( शेतजमीन ) वाफणें पहा . ३ शेत भांगलणें . ४ अजारांतून बरें होऊं लागणें . [ हिंग + वाफ ] हिंगतूप , हिंगधूप - पु . अव . नेहमीं होणारा संसाराचा किरकोळ खर्च ( विशेषतः देवधर्म , जेवणखाण इ० चा ). ( क्रि० जाणें ; उडणें ; खरचणें ). ( पैसा कसा उडतो हें दाखवितांना वापरतात ). हिंगतुपास - तुपाखालीं - वारी - त्यानें सर्व संपत्ति उडविली . हिंगरडूं , हिंगरूड - न . हिंग खाल्ल्यामुळें व्रणावर उठणारें बेंड ; हिंगुरडें . हिंगवणी - न . हिंग लावलेलें पाणी . हिंगाचा अंगारा - पु . बाळंतिणीचे पांचवे व सहावे दिवशीं हिंग व हळद पाण्यांत कालवून बाळंतिणीस व घरांतील मुलाबाळांस लावतात तो अंगारा . हिंगाचा खडा - पु . १ एखादी त्रासदायक , निष्कारण फाटे फोडणारी व्यक्ति , वस्तु . २ गडबडया , तल्लक माणूस . हिंगाचा वास - पु . संपत्ति , शक्ति , अधिकार इ० नाहींसें होऊन मागें राहिलेला निव्वळ लौकिक ; काप गेलें . भोंकें राहिली या अर्थी . म्ह० हिंग गेला पण हिंगाचा वास राहिला . हिंगाचें पोतें - न . वरील लौकिकवान् ‍ व्यक्ति . हिंगा , लोण्याचा - वि . ( ना . ) अशक्त व नाजूक प्रकृतीचा . हिंगाष्टक - न . सुंठ , मिरें , पिंपळी , ओवा , सैंधव , जिरें , शहाजिरें व हिंग या आठ औषधांचें समभाग चूर्ण . हें जठराग्नि प्रदीप्त करतें . [ हिंग + अष्टक ] हिंगु - पु . हिंग व त्याचें झाड . [ सं . ] हिंगुनिर्यास - पु . हिंग . हिंगुरडें - हिंगरडूं पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP