Dictionaries | References ख खडा Script: Devanagari See also: खडो Meaning Related Words खडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 by way of expiating his sin of having killed a cow by throwing a stone at her. खड्यासारखा निवडणें To cast out or reject as worthless. And खड्यासार- खा बाहेर पडणें To fall out or aside as worthless.Standing, perpetual, constant, not occasional. Ex. त्याचे दरवाज्यावर खडा पाहरा असतो. 2 Unclosed, not finally entered with the due detail and order--accounts: also not determined upon; standing over; not rejected nor accepted--a bill or draft. खडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pebble; a nodule. A gem.a Perpetual; standing.खडा टाकून पाहणें Just to feel one's way slightly in order to gauge the probability of accomplishing one's object.खडे खावविणें Oppress grievously; humble.खडे फोडणें To slander; blame, vilify.खड्यासारखा निवडणें To cast out as worthless. खडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गोटा , गोटी , लहान दगड ;ना. तुकडा ( तांदूळ , हिंग इत्यादी );ना. कायमचा , सततचा ( पहारा );ना. ताठ , उभा ;ना. रत्न . खडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दगडाचा लहान खंड Ex. अनवाणी चालल्याने पायाला खडे टोचले ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खडीWordnet:asmশিলগুটি bdअन्थाय सेरेब gujકાંકરી hinकंकड़ी kanಸಾಣೆ ಕಲ್ಲು kasکَنہِ پٔھلۍ kokफातुल्ली malചരല് mniꯅꯨꯡ꯭ꯃꯆꯦꯠ nepकङकड oriଗୋଡ଼ି panਬਜਰੀ tamசரளைக்கல் telకంకరరాయి urdکنکری , بجری , چھری , کنکریٹ noun दगडाचा बारीक तुकडा Ex. तीने तांदळांतले खडे काढले. HYPONYMY:खडा ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खडळWordnet:bdबाला अन्थाइ gujકાંકરી hinकंकड़ kanಸಣ್ಣ ಹರಳು kasکَنہِ پٔھلۍ kokशेंकरो malകല്ലിന്റെ ചെറിയ കഷണങ്ങള് mniꯅꯨꯡꯀꯨꯞ nepकङकड panਬਜਰੀ sanवालुका tamசிறுகல் telకంకర urdکنکڑ , کانکر noun एखाद्या टणक वस्तूचा खूप लहान तुकडा Ex. मला भातात आज खूप खडे आले. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাঁকর gujકાંકરી kasکَنہِ kokल्हान फातर oriଗୋଡି sanदृषत्कणः See : रत्न, उभा खडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( हिं .) १ ताठ ; उभा . २ कायमचा ; सततचा . ' त्याचे दरवाजावर खडा पहारा असतो .' ३ पोटीं तपशिलाच्या रकमा न लावितां लिहिलेलां पुरान केलेला ( हिशेब ); ४ अनिश्चित ठेवलेला ; पडुन राहिलेला ; जो स्वीकारला नाहीं किंवा परतहि केला नाहीं असा . ( चेक वगैरे ) ( हिं .) पु. १ ( कातोडी .) मळई ( जाळ्या ) ची बांबूची काडी . २ लेपाटी ( पांखरे मारण्याचें साधन ) यांतीलव टोंकदार बांबूची काडी .' - बदला १३२ . १५६ . पु. पात्याच्या शिवुन तयार केलेल्या , छत्रीस ज्या काडीवजा कांबी तासुन लावतात त्या प्रत्येकी . ( सं . खंड ) पु. १ लहान दगड ; गोटी ; गोटा ; घोड्यांचा बारीक तुकडा ; दगडाचा लहान खंड . २ कळी ( चुन्याची ); तुकडा ( नोंद , हिंग , कात , खडीसाखर इ०चा ); अलंकारांतील , अंगठीतल मणीं , रत्न , ' एकेक खडा निवडक हाती लागला . ' - विवि १० . ५ - ७ . १२७ . ३ मळाचा लहान पण कठिण गोळा ; ( सामा .) गठ्ठा ; गोळा ; पिंड . ४ गुळाची लहान ढेप . ( सं . खड ; सिं . खडो ) ( वाप्र .)०उडणें ( गुडगुडी ओढतांना तींतील खडा वर उडतो त्या वरुन ) सर्वस्वी संपणे , खर्च होणें . ( द्रव्य वस्तु ).०टाकुन घेणें -( पाण्यांची खोली ठोकळमानानें खडा टाकुन पाहतात यावरुन ) एखाद्या कामाचा कल जाणावयाचा असतां सहजपणें एखादा शब्द टाकून कामाची माहिती काढणें ; आपलें काम होईल कीं नाहीं याचा आजमास पाहणें . खडा न खडा माहिती असणें - एखाद्या कामांतील बारीक सारीक सर्व गोष्टी माहीत असणें .ठाव घेणें -( पाण्यांची खोली ठोकळमानानें खडा टाकुन पाहतात यावरुन ) एखाद्या कामाचा कल जाणावयाचा असतां सहजपणें एखादा शब्द टाकून कामाची माहिती काढणें ; आपलें काम होईल कीं नाहीं याचा आजमास पाहणें . खडा न खडा माहिती असणें - एखाद्या कामांतील बारीक सारीक सर्व गोष्टी माहीत असणें .०फुटणें खडक फुटुन पाण्याचा ओघ सपाटुन बाहेर येणे . ' नदीचा खडा अजुन फुटला नाही .' खडे खाणे - खस्ता खाणें ; कषाट करणें ; त्रास सहन करणें ( दगदगीच्या कामांत )०खावाविणे चारणें - त्रासदेणें ; सतावणें ; बेजार करणें .०घासणें फोडणे ( नावांनें )- १ एखाद्याची निंदा करणें ; तक्रार करणें . २ ( नांवाशिवाय ) खुप कषाट करणें ; दगदग करणें .०मोजणे खडे मांडुन हिशोब करणें ( कागदावर लिहितां येत नसल्यामुळे ). खड्या खड्यांनीं डोकें फुटणें - अनेक बारीकसारीक गोष्टीमुळें दिवाळखोर बनणें भिकेस लागणें . ( एकाच गोष्टीमुळें नव्हे ). खड्यांनी डोकें फोडणे - दगडांनी मारुन गाईला ठार केलें असतां प्रायश्चितादाखल त्या व्यक्तीचा दगडांनी डोके फोडुन वध करणें . खड्यासारखा निवडणें - १ एखाद्याला कुचकामाचा म्हणुन बाजुला सारणे . करणें ; निरुपयोगी ठरविणे . २ चटकन वेगळा काढणे . ओळखणें , राहतां राहतां सुशिक्षितांचा वर्ग राहिला व त्यांस मोर्लें यांनीं शत्रु म्हणुन खड्यासारखें निवडुन काढलें आहे .' - टिव्या ५ . खड्या सारख्या बाहेर पडणें - निरुपयोगी म्हणुन बाजुला सरणें . खडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खडा पहारासारखा पहारादेखरेखचांगला बंदोबस्त.खडा उडणेंगुडगुडी किंवा चिलीम ओढतांना आतील तंबाखु सरत आली म्हणजे तींतील खडा उडूं लागतो. यावरून एखादी वस्तु अथवा द्रव्य संपणें. खर्च होणेंपुरते संपणेंखलास होणेंबुडास जाणेंतळास जाणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP