Dictionaries | References

साहेब

   
Script: Devanagari
See also:  साहिब

साहेब     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : साहब

साहेब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A lord or master. 2 A gentleman. Esp. understood of an English or a European gentleman. 3 A term of compellation corresponding with Sir, Mister, Mistress, Madam &c. 4 Used in comp. and as affixed to the name, title, or designation of the person; as पाटीलसाहेब, राजासाहेब, सुभेदारसाहेब, धनीसाहेब &c.; also as affixed to names and titles of respectful import; as बापू, नाना, राव, दादा, बाबा, and others, forming बापूसाहेब &c. 5 As affixed to a respectful female compellation it is often plural and in the neuter gender; as बाईसाहेब आलीं ताईसाहेब गेलीं.

साहेब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A master. A gentleman. A term of respect. A European.

साहेब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गौरवार्थी योजावयाचा शब्द   Ex. वकील साहेब हल्ली बरेच दिवस भेटलेले नाहीत
ONTOLOGY:
उपाधि (Title)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujસાહેબ
hinसाहब
kasسٲبۍ , جِناب
kokसायब
malസാഹിബ്
oriସାହେବ
panਸਾਹਿਬ
tamஜயா
telసహోద్యోగులు
urdصاحب , جناب
See : अधिकारी

साहेब     

 पु. १ स्वामी ; धनी ; मालक . २ अधिकारी ; वरिष्ठ . जैसा साहेब नमस्कारिजे । ओळखिल्या उपरि । - दा ११ . ९ . ७ . २ टोपीवाला ; इंग्रज ; युरोपियन . साहेबांचे तैं काळ । - संग्रामगीतें १३० . ३ प्रतिष्ठाबोधक संज्ञा . महाराज , श्रीमंत या अर्थी . ४ ( समासांत गौरवार्थी ) नांव , हुद्दा , टोपणनांव इ० पुढें योजतात . उदा० पाटीलसाहेब , नानासाहेब , रावसाहेब इ० ५ स्त्रियांच्या प्रतिष्ठानामापुढें उपयोग . केव्हां , केव्हां हा नपुंसक बहुवचनी होतो . उदा० बाईसाहेब आलीं , ताईसाहेब गेलीं . ६ देवासहि भक्तिपूर्वक लावतात . उदा० जगदंबेस आईसाहेब असें म्हणण्याची वहिवाट आहे . बंदे हुशार रहनाबे । साहेब राजी रखनाबे । [ अर . साहिब् ‍ ] काम , चाकरी - न . वरिष्ठाचें काम ; स्वामि सेवा ; सरकारी काम . साहेबकामांस नाहीं गेला । गृहींच सुखाडोनि बैसला । - दा १२ . १ . ५ .
 पु. स्नेही ; सोबती ; जोडीदार . वाजद - अल्लीखां दिवाण निजाम अल्लीचा फार मुसाहेब ... - रा १ . १६५ . ( मुखतार म्हणजे अनियंत्रित सत्ताधिकारी असा चुकीचा अर्थ मराठे समजतात ). [ अर . मुसाहिब ]
०किराण   किरान - नपु . सुयोगाचा स्वामी ; शुभग्रहांच्या युतीमुळें वैभवशाली . शहाजान साहेब किरान याणीं बत्तीस वर्षे बादशहात करून उपरांत राहिले . - वाडसनदा १४९ . [ अर . साहिब् ‍ किरान् ‍ ]
०जादा  पु. १ राजपुत्र . २ उमराव . इकडे प्रभु वाजिराय तिकडे फत्तेसिंग साहेबजादा । - अफला ४६ . [ फा . साहिब् ‍ + झादा ]
०नौबत  स्त्री. राजादिकांच्या स्वारींत पूढें हत्तीवर घालून चालविलेली नौबद , मोठा डंका . साहेबनौबत तुडुम् ‍ तुडुम् ‍ झडे । अमृत - ६४ .
०मवसूप   मवसूफ - साहेबमजकूर . येविशींचा सिध्दांत करुन सरकारास साहेब मवसूफ यांणीं दाखवला . - इनाम १०९ . [ फा . साहिब + मौसूफ ]
०मुलूख   मुलूक - पु . खुश्कीवरील मालक , राजा . आम्हांसी जो साहेब - मुलूख असेल तो दुश्मनी करूं शकत नाहीं . - ऐटि १ . ६० .
०यख्तियार  पु. अधिकारी .
०रियासत  पु. राजा ; राज्यकर्ता . दक्षणचे सर्व साहेबरियासत यांचा एक जाला . - पया ४७३ . - रा १९ . १६ .
०लोक  पु. अव . इंग्रज ; युरोपियन .
०सुभा  पु. प्रांताधिप ; सरसुभा . एकेक पदरचा सेवकं साहेब सुभा । - ऐपो ३०४ .
०सेवा   साहेबकाम पहा . ते साहेब सेवेंत घसरले । - ऐपो २५० .
०हिम्मत वि.  धैर्यवान् ‍ ; साहसी . फत्ते - नसीब व साहेब - हिम्मत आहेत ; करितां हरएक प्रकारें फिरंगियाचे फौजेस तंग करितील . - चिरा १९ . साहेबी - स्त्री . १ सत्ता ; स्वामित्व . मुलुखांत साहेबी कारकुनाखेरीज कोणाची नाहीं . - सभासद २४ . २ मोठेपणा ; सर्वांनीं साहेब म्हणावें असा प्राप्त झालेला अधिकार , दर्जा . - वि . १ साहेब , युरोपियन असा प्राप्त झालेला अधिकार , दर्जा . - वि . १ साहेब , युरोपियन यासंबंधी ( वेष , रीत , अधिकार इ० ). २ द्राक्षाची एक जात ही लांबट व पांढरी असून फळ फार मधुर असतें . साहेबीण - स्त्री . १ साहेबाची बायको ; युरोपियन स्त्री ; मड्डम . २ प्रतिष्ठित स्त्री ; थोर कुलांतील स्त्री .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP