Dictionaries | References स सल्ला Script: Devanagari See also: सलह , सला , सल्ह् Meaning Related Words सल्ला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Peace; also armistice or truce; cessation or suspension of war or hostilities. 2 Counsel or advice. v सांग, दे, सुचव. 3 An ornament for the little finger or the little toe. सल्ला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f Peace; truce. Advice. A finger-ornament. सल्ला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादे कार्य योग्य पद्धतीने होण्यासाठी ठेवला गेलेला प्रस्ताव Ex. ह्याबाबतीत मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)See : सल्लामसलत सल्ला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . सला पहा . १ समेट ; तह ; युध्दतहकुबी . सल्ला ममता राजयांशीं करून ... - चित्र ७९ . २ उपदेश ; हितवाद मसलत . सल्ला ऐकेना झाला . बिघोड । - ऐपो १२६ . - क्रिवि . बरें तर . [ अर . सलाह् ] पु. बोटांतील वेढें , वळें ; आंगठी .पुस्त्री . १ समेट ; संधि ; तह ; एकोपा . आजवर चालत आला सला । - सला ३ . २ उपदेश ; मसलत ; विचार ; हितवाद . पुरंदरास तीन हजारांनिशीं रवाना करणें सला नाहीं . - रा १० . ७६ . हे सलाह , उत्तम लिहिली . - वाडदुवा ५०८२ . - क्रिवि . बरें तर ; तसें होऊं द्यां ; ठीक . सला तुमचें का होईना . [ अर . सलाह् ] अंदीस - पु . उत्तम विचार करणारा .०ऐन स्त्री. योग्य व इष्ट गोष्ट ; ऐनसलाह् . नबाब साहेब खेमेदाखल जाले हे सलाह ऐन पडली . - रा १९ . १०४ .०गार हितवाद सांगणारा ; मंत्री ; सचिव .०गारमंडळ न. सल्ला देणारी मंडळी .०कार गार - पु . सल्लागार ; मसलत देणारा ; दिलाची गोष्ट सांगणारा . - जोरा २९ .०तदबीर स्त्री. सल्लामसलत . जें होणें तें तफैंनच्या इतल्ल्यानें व सलाह् तद् बिरीनें व्हवें . - रा १० . १६७ .०मसलत स्त्री. विचारविनिमय ; खलबत ; हितवाद ; उपदेशे . ( क्रि० देणें ; सांगणें ; शिकवणें ).०दौलत वि. राज्यास इष्ट ; दौलतीस हितावह . दोघेहि फंदी व मकरी त्यांची उपेक्षा करणें सलाहदौलत नाहीं . - रा १९ . १०० .०नेक वि. हितावह ; इष्ट उपयुक्त ; योग्य . सलाहनेक असेल त्याची आपण आज्ञा करावी . - रा ५ . २०५ .०मामला पु. सलामसलत ; तहाची वाटाघाट . लढाई करावी , सल्ल्यामामल्याची गोष्ट करावयाची नाहीं . - ख ४४१२ .०वक्त वि. समयोचित ; प्रसंगास योग्य . आतां रहावें हें सलाहवक्त नाहीं . - खरे ८ . ४३५१ .०सैल पु. फेरफटका ; प्रवास वगैरे ; मुशाफरी ; स्वारी . तो दूर देश बंगाल मुलुख तेलंग गेलो सलासैल आलो करून । - पला ४ . १८ . [ सला + सहल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP