Dictionaries | References

नाकावर टिचून

   
Script: Devanagari

नाकावर टिचून

   अगदीं बेधडक
   मुळींच न भितां
   न जुमानतां. समोर तोरा मिरविणें
   प्रत्यक्ष करुन दाखविणें. ‘बाजीराव साहेब फडणिविसांच्या नाकावर टिचवून स्वतंत्र अधिकार गाजवूं पहात.’ -अस्तभा १८. ‘पण तुम्हा पुरुषांच्या नाकावर टिचून आजपर्यंत कोणीच स्वतंत्र स्त्रीराज्य स्थापलें नव्हतें. -बाबं ३.१. ‘दादासाहबे, उद्यां त्या लोकांच्या नाकावर टिचून दारुन पिऊनच कचेरींत हजर व्हा!’ -एकच २.३

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP