|
पु. १ ( विणकाम ) ( मागावर ताणून लांब केलेले ) .... भ सूत धागा . याच्या उलट बाणा . कां तांथुवाचा ताणा । तांथु घालिता .... णा । तो तंतूचि विचक्षणा । होय पटु । - ज्ञा १८ . ३६० . २ ( राजा . को . ) वेल ; वेली . ३ ( राजा . ) वेलाच्या प्रत्येक पर्वास फुटणार्या कोंवळ्या , तंतूपैकी प्रत्येक . यांनी वेल वृक्ष इ० कांस वेंटाळून धरुन राहतो ; पागोरा ; वेलाची फूट . ४ ( दुधाळपणा , भलेपणा इ० सद्गुणांना कारणीभूत घोडा , बैल इ० जनावरांचे ) बिजवट ; अवलाद ; मातृपरंपरा ; जात . ५ कोळ्याच्या घराचा , जाळ्याचा लांब तंतु . [ सं . तान = तंतु , धागा ; म . ताणणे ] ( वाप्र . ) ०काढणे ( माण . ) सूत मागावर घालण्याकरिता तयार करणे ; उभे दोरे लावून घेणे . सामाशब्द - ०पाजणी स्त्री. १ ताण्यास ताठपणा आणण्याकरिता खळ लावण्याची क्रिया . २ ( ल . ) जिकीरीचे , दगदगीचे , त्रासाचे काम . ३ त्रास , दगदग , जाच , कुतरओढ , ओढाताण या अर्थी जिवाची ताणपाजणी असाहि शब्दप्रयोग करतात . [ ताणा + पाजणे ]
|