Dictionaries | References ओ ओंवी Script: Devanagari See also: ओवी Meaning Related Words ओंवी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ मराठींतील चार चरणांचा एक छंद . महाराष्ट्र संतकवीचा हा छंद अत्यंत आवडता आहे . यांत वर्ण व मात्रा यांची संख्या अनियमित असते तथापि अष्टाक्षरी - औटचरणी व अष्टक्षरी - त्रिचरणी असे दोन प्रकार साधारणपणें पाडतात . ' पहिली माझी ओंवी । पहिला माझा नेम । तुळशीखालीं राम । पोथी वाचे ॥ ' हा पहिला प्रकार . ' आकाशीच्या अंतराळीं । तारकांना तेज चढे । तुझी माझी प्रीति जडे ॥ ' हा दुसरा प्रकार . ' नागार्जुनाचा दाताऊ । राणेराओ श्रीचक्रधरू । ओवीं प्रबंधी कवे भास्करु । वर्णितुसें । - शिशु ७ . २ सदर छंदांत रचलेलें गीत बायका दळतांना , मुलांना थोपटतांना किंवा झोपळ्यावर बसून म्हणतात . ' तथा महाराष्ट्रेषु योषिद्भिर् ओंवी गेया तु कंडने । ' - मानसोल्लास ५ . २०५२ . ' ओविऐं गांताति यादवांची राणा । ' - दाव ३३ . ' जाल्यावर बसलें म्हणजे ओवी आठवते ' किंवा ' हातीं खुंटा आल्यावांचुन ओवी सुचत नाहीं .' ३ विणकामांतील प्रत्येक ताणा जींतून ओवला जातो व जिच्यामुळें विणतांना तो खालींवर केला जातो ती ; वही ; नेहमी ओव्या असा अनेकवचनी प्रयोग करतात . ओव्या गाणें -( ल .) भलतीच स्तुति करणें . ( सं . वे = विणणें ; दे . ओविंअमू ; म . ओवणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP