|
स्त्री. १ घसा ; घशाचा बाहेरील भाग ; घांटी ; कंठ , कंठमणि . गेलें घांटीं झालें माती . २ गळा ; कंठ ; आवाज . [ सं . घाट ] ( वाप्र . ) घांटीं फुटणें - १ ( मुलाच्या ) आवाजांतील कोमलता जाऊन तो मोठा , प्रौढ होणें ; हें ( मुलगा ) वयांत येण्याचें लक्षण आहे . घांटीं फुटला = बदसूर झाला . २ ( गाणार्याचा ) आवाज घोगरा होणें ; स्वरभेद होणें ; स्वर बिघडणें ; आवाज चिरकणें , बसणें ; घांटीं शेंदूर ओतणें - ( पेय , खाद्यपदार्थांत मिसळून ) शेंदूर गिळावयाला , खायला लावणें ; प्रतिपक्षीय गवयाचा कंठ बिघडविण्याकरितां ही युक्ति करतात . सामाशब्द - स्त्री. १ घंटा ; जनावराच्या गळयांतील घंटा . वाजती शंख घांटा । मी जाते वैकुंठा । - मसाप २ . १ . २२ . २ ( उप . ) गुप्त गोष्ट सर्वांना सांगत सुटणारा , चोंबडा , चहाडखोर माणूस , बोंबल्यागणेश ; जिभेचा , कानाचा हलका ; लुतरा ; गजघंटा . [ सं . घंटा ] ( वाप्र . ) घांटेखालीं उभें राहणें - ( शपथेचा एक प्रकार ) शपथ घेणें . सामाशब्द - ०कार वि. ( गो . ) घंटा ओतणारा शिल्पकार . [ घांट + करणें ] ०कोर स्त्री. गळयाचा भाग ; नरडी . असें कुभांड करून दांड होऊन भांड धरिसी घाटकोर । - होला ३७ . [ घाट + कोर = कड , बाजू ] ०रोग पु. गुरांना घशांत होणारा एक रोग . [ घांट + रोग ] ०पट्टा पान - पुन . ज्याला लहान लहान घंटा , घुंगरु अडकविलेले असतात , किंवा एकच लोखंडी , पितळी घांट , बांधलेली असते असा बैलाच्या गळयांत बांधण्याचा चामडयाचा , गोणपाटाचा पट्टा . [ घांट + पट्टा - पान ] ०सर्प पु. घशांत होणारा एक रोग ; घटसर्प . हा कफदोषामुळें होतो , ह्यानें गळयांत लांबट व जाड अशी सूज उत्पन्न होऊन अन्नमार्ग बंद होतो . इं . डिफ्थोरिया . ०पारधी पु. घंटानादानें हरिणास फसवून , त्यास फासांत अडकविणारा पारधी . घाटपारधी पाश पसरी । त्यावरी तो मृगांते घरी । - एभा २६ . २३६ . [ घांट + पारधी ] ०सर पु. १ बैलाच्या गळयांतील लहान लहान घुंगरांची , घंटांची माळ ; घुंगुरमाळ . २ बैलाच्या गळयांतील घुंगुरमाळ जींत ओविलेली असते ती दोरी . [ घाट + सर = दोरा , माळ ]
|