Dictionaries | References

शहाणा

   
Script: Devanagari

शहाणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Shrewd, sagacious, knowing, intelligent, sharp, smart, clever. Pr. शहाण्याचें व्हावें चाकर पण वेड्याचें होऊं नये धनी; शहाण्याची एक बात मूर्खाची सारी रात; श0 नाडतो पोहणार बुडतो.

शहाणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Shrewd, sagacious, clever.

शहाणा     

वि.  अक्कलवंत , चतुर , धूर्त , बुद्धीमान , समजूतदार . हुषार .

शहाणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : विवेकी

शहाणा     

वि.  धूर्त ; हुषार ; बुध्दिवान् ‍ ; अक्कलवंत ; समजूतदार ; चतुर . जो बहुतांस मानला । तो जाणावा शाहणा जाला । - दा १५ . ३ . २६ . [ हिं - शियाणा - ना . कुण . शाणा ; सं . सज्ञानी , सज्ञान ] म्ह० १ शहाण्याचें व्हावें चाकर , पण वेडयाचें होऊं नये धनी . २ शहाण्याची एक बात , मूर्खाची सारी रात . ३ शहाणा नाडतो , पोहणारा बुडतो . शहाणाच मनुष्य एखाद्यावेळीं फसतो व पोहतां येणाराच मनुष्य अनेकदां अपघातानें बुडतो . ४ अति शहाणा त्याचा बैल रिकामा - आपल्या बैलास काम करावयास लाविले तर त्याला भूक लागून जास्त दाणावैरण आणावी लागेल , या भीतीनें बैलास रिकामें ठेवून त्याचें काम स्वतः करणारा ; स्वतःस शहाणा म्हणविणार्‍याचें कृत्य . ५ शाण्यांक तीन ठय , पिशांक एक ठय -( गो . ) शहाणा मनुष्य एखाद्यावेळीं पुष्कळ फसतो .
 पु. गायनशास्त्रांतील एक राग . या रागांत षड्‍ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत . कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत धैवत , वज , अवरोह संपूर्ण . गायनसमय मध्यरात्र . जाति षाडव संपूर्ण . वादी स्वर पंचम , संवादी षड्‍ज .
०सुरता वि.  १ हुषार व देखणा ; बुध्दिमान व सुरेख . २ ( सामा . ) चांगला हुषार . [ शहाणा + सुरत ] साडेतीन शहाणे - पेशवाईतील सुप्रसिध्द व्यक्ती . यांत , एक विठ्ठल सुंदर परशरामी ( निजामाचा दिवाण ), दुसरा दिवाकर पुरुषोत्तम ऊर्फ देवाजीपंत चोरघोडे , ( नागपूरकर भोसले यांचे दिवाण ), तिसरा सखाराम बापू बोकील ( पेशव्यांचे दिवाण ) व अर्धा नाना फडणवीस . ( चटकन् ‍ ध्यानांत यावींत म्हणून संक्षेपानें ) सख्या , देवा , विठ्ठला असेंहि म्हणतात . शहाण्याची खरबड - स्त्री . मद्दड ; मट्ट माणूस . शहाणी होणें - क्रि . ( व . ना . ) न्हातीधुती ; ऋतुमति होण . कांहो तुमची पोरगी शहाणी झाली कां नाहीं अजून ? .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP