न. - मधाच्या पोळ्यांतून निघणारा चिकट , घट्ट , चरबीसारखा पदार्थ ; मधूच्छिष्ट .
-
म्यान ; कोष ; तरवारीचें घर . मेण शिकल केली . - ऐपो ४३० . [ फा . मियान ] ( वाप्र .)
- जनावराच्या शरीरांतून किंवा वनस्पतीपासून काढण्यांत येणारा वरील सारखा पदार्थ ; तेलाची बेरी .
- ( कु . ) मासे मारण्याकरितां केलेलें विषारी औषध .
०करणें - म्यानांत तरवार घालणें ; कोषित करणें .
- ( ल . ) झाकणें ; वस्त्रादिकांनीं आच्छादित करणें . मेण कर आरसा , सख्यांनो , गुलाल भांगीं नका भरुं । - प्रला १३६ .
एका मेणांत दोन सुर्या सामावणें , एका मेणांत दोन सुर्या राहणें - कोणतेहि
दोन मोठे राजे , विद्वान , प्रतिष्ठित पुरुष , परस्पर विरोधी स्वभाव व
बुद्धि असलेलीं माणसें , प्रतिस्पर्धी हीं भांडण न करतां शांततेनें एकत्र
राहूं शकत नाहींत अशा अर्थीं वापरतात तुकयाची प्रतिष्ठा वाढतां तेथें ।
त्याचे मनीं द्वेष उपजत । म्हणे एका मेणांत दोन सुर्या निश्चित । समावती
कैशा परी ।
- एक काम दोघांकडे असल्यानें त्या कामाची होणारी दुर्दशा , अव्यवस्था या अर्थी .
वि . ( ल . ) मऊ व चांगला शिजलेला पदार्थ ( तांदूळ डाळ , इ० ). [ फा . मोम ] ( वाप्र . )
०काढणें ( ल . ) खूप चोपणें , झोडणें , मारणें .
०घालणें ( कु . ) मासे धरण्यासाठीं त्रिफळे , गेळफळ , निवळकांडें इ० कुटून पाण्यांत घालणें .
०स्वस्त - ( मनुष्य ) लठ्ठ व गुलगुलीत होणें .
होणें - ( मनुष्य ) लठ्ठ व गुलगुलीत होणें .
- नरमावून सौम्य , शांत होणें .
- शिजून मेणाप्रमाणें होणें ( भात , डाळ इ० ).
मेणाची चोटली कढयता ओढून चंद्रबळ आणणें .
मेणवणें , मेणावणें , विणें मेण , तेलाच्या तळची बेरी , तेलांत भिजविलेली चिंध्यांची राख इ० नीं सूप , टोपलीं इ० मढविणें ; त्यांस लेप देणें .
( ल . ) गोंडस , लठ्ठ बनणें . सामाशब्द .
०कट न.
( समई , तेलातुपाचें भांडें यांस चिकटून असणारी ) तेलाची घाण , मळ , चिकटा , बेरी ०कट वि. घाण तेलानें , तुपानें माखलेला ; मेणचट ; तेलकट ; ओशट ( वास ). [ मेण + कट ] मेणकटणें , मेणकुटणें अ.क्रि. मेणकट लागणें ; घाण तेलातुपानें माखलें जाणें ( भांडें ).
०कापड न. मेण लावलेलें एक प्रकारचें कापड .
मेण कुटला वि. अतिशय शिजविल्यानें मऊ व मेणासारखा झालेला ( भात ). [ मेण ]०कुटलें न. जास्त शिजविल्यानें बिघडलेला भात .
०गटी, ०गट स्त्री. जास्त शिजविलेल्या भाताचा मऊपणा व मेणचटपणा . [ मेणगट ]
०गुट होणें अ.क्रि. एकजीव होणें ; मिसळणें .
०गोळी स्त्री. - मेणाची गोळी .
- ( ल . ) मऊ , नरम , सौम्य मनुष्य .
०घुणा, ण्या वि. सौम्य , शांत , गंभीर मुद्रेचा पण मनाचा कुढा , लबाड मनुष्य ; न बोलणारा , आंतल्या गांठीचा इसम .
०चट वि. -
मेणगट ; कण्या न पडलेलें ( तूप ).
- मऊ व मेणासारखा शिजलेला ( भात ).
- गिच्च व पचपचीत ( शिजविण्यांत बिघडलेलें अन्न ).
- मंद ; ढील ; गयाळ ; सुस्त ; निर्जीव ; उत्साह , धैर्य , पाणी नसणारा .
- कृपण ; कंजूष ( मेणचाटणारा ).
०चोट,चोट्या वि. - नपुंसक ; निर्बल ; नामर्द .
- जड ; रेंगाळणारा ; मेंग्या मारवाडी .
- भोळसट ; भोळानाथ .
०तेल न. ( गो . ) तेलांत शिजविलेलें मेण ; ( स्त्रिया कुंकु लावतांना हें मेणतेल कपाळास लावून त्यावर पिंजर लावतात ).
०बत्ती स्त्री. मेणानें मढविलेली वात ; मेणाचा दिवा . [ फा . मोम , मूम + बत्ती ]
०बाजार पु. दररोज दुकानासाठीं पालें द्यावयाचीं व तीं रात्रीं काढावयाचीं अशीं दुकानें असलेला बाजार ; जुना बाजार . हा मुख्य रस्त्यांत नेहमीच्या दुकानाशीं समांतर ओळींत भरवितात . आयते तयार केलेले कपडे व जुनेपाने जिन्नस यांत विक्रीस मांडतात .
०बाजारी पु. -
मेणबाजारांतील दुकानदार , माल विकणारा .
- ( ल . ) पत नसलेला , बेअब्रूचा माणूस .
०बावली स्त्री. -
( ल . ) लहान , सुबक , नेटकी व चपल स्त्री .
-
गरीब , दुसर्याच्या तंत्रानें चालणारी नवरी , बायको .
०वला वि. ( प्र . ) मेणोला ; मेणा पहा .
०वात स्त्री. मेणबत्ती पहा .
मेणाचा वि. - मऊ ; अशक्त ; कमकुवत .
- नरम ; निर्जीव .
- अयोग्य ; अक्षम .
- धिक्कार , तिरस्कार दाखविण्याकरितां नेहमीं योजतात . उदा० तूं कोण मेणाचा मला सांगायला ?
मेणी स्त्री. - तेलकट काजळ ; मस ; घाण .
- केसांच्या वळलेल्या जटा .
- ( ठाणें ) काकडीची एक जात . - कृषि ४८२
मेणाळ स्त्री. ( जरतारी धंदा ) मेण असलेली , मेणयुक्त तार .
मेणी मोडशी स्त्री. जुनाट , फार दिवसांची मोडशी . [ मेण्या + मोडशी ] .
मेणें न. - ( कों . ) जिच्या चिकानें मासे आंधळे होऊन सहज सांपडतात अशी नदी इ० च्या प्रवाहांत टाकतात ती एक वनस्पति ; कांड्याहुरा .
- माशांना मारण्याकरितां , गुंगी आणण्याकरितां नदींत टाकलेटा चिकचिकीत द्रव्याचा पदार्थ .
मेणे डोळे पु.अव. डोळे आले असतां त्यांतून अतिशय पू वाहणारे , फार बरबरणारे डोळे ; बरबरीत , पुवाचे डोळे ; शेणे डोळे ; याच्या उलट काटे डोळे.
मेण्या वि. - मऊ ; दुबळा ; नामर्द ; गरीब .
- मंद ; धारिष्ट नसलेला ; निर्जीव . [ मेण ]
मेण्यामारवाडी पु. दिसण्यांत भोळा पण कावेबाज इसम ; सौम्य मुद्रेचा पण शठ मनुष्य .
मेण्या साप पु. - सापाची एक जात .
- ( ल . ) गुप्तपणें आकस धरुन नाश करणारा मनुष्य .
मेणें वावर न. ( रब्बीच्या पेरणीकरितां ) नांगरुन , खत घालून , राखून ठेवलेलें वावर . मेणोला , मेणोल वि. मेणा पहा .मेणा , ण्या वि. मेण , तेलाचा - तुपाचा गाळ ,
जाळलेल्या चिंध्या , शेण्यांची राख इ० कांच्या मिश्रणानें लेपलेला ( हारा
, टोपलें , सूप , पाटी , इ० ). [ मेण ]