|
न. न. आंबोण ; कळणा , कोंडा , पेंड सरकी , वगैरेचे मिश्रण . विरजण ; दुधाचें घट्ट दहीं होण्याकरितां जें दुधांत थोडेंसें ताक मिसळतात तें . ( ल . ) एखाद्याचा गर्व उतण्यासारखी गोष्ट . पैशाची अफरातफर केलेली लपविण्यासाठीं सांगितलेली खोटी सबब , किंवा केलेलें ढोंग . अफरातफर ; गिळंकृत केलेलें द्रव्य . ज्यामध्यें बारीक सारीक दोष किंवा गोष्टी सहज लपवितां , जिरवितां येतात असें मोठ्या घडामोडीचें काम . बूड आलेली , खोट आलेली रक्कम . रोगट , अपरिपक्व धान्य . आंब्याच्या अढींतील गवताचे थर ; तंबाखू मुरण्याकरितां केलेली योजना ; पिकविण्याकरितां , मुरण्याकरतां किंवा उग्रता कमी करण्यासाठीं घातलेलें द्रव्य . [ मुरणें ] मुरवणें - न . मुरवण ( विशेषतः पहिल्या तीन अर्थी ) पहा . मुरविणें - सक्रि . मुरत घालणें ; धान्य , तंबाखू इ० पदार्थ दडपून ठेवणें . ( ल . ) जिरविणें ; गिळंकृत करणें ; मोठ्या खर्चाच्या बाबींत बारीक सारीक खर्च घुसडून लबाडीनें पैसा खाणें . फसवेगिरीनें पैसा खर्चणें ; खाणें .
|